'अभंग तुकाराम’ चित्रपटात अभिनेते अजय पूरकर मंबाजीच्या भूमिकेत
ज्याप्रमाणे मराठी साहित्याला विविध लेखकांनी समृद्ध केले. त्याचप्रमाणे संतांनी सुद्धा आपल्या भाषेला त्यांच्या अभंगातून अमृतासारखे गोड केले. यातीलच एक महान संत म्हणजे तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांच्या अभंगाना फक्त अध्यात्मिक नव्हे सामाजिक महत्व सुद्धा आहे. ‘जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधु ओळखावा, देव तेथेंचि जाणावा’ असे म्हणत त्यांनी समाजप्रबोधनाचे कार्य सुद्धा केले.
लवकरच ‘अभंग तुकाराम’ नावाचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात अभिनेते अजय पूरकर खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात ‘मंबाजी’ या नकारात्मक रूपात आपल्याला अजय पुरकर दिसणार आहेत.
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट येत्या ७ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे प्रस्तुतीकरण नामांकित पॅनोरमा स्टुडिओज यांनी केले असून, निर्माते कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक आहेत. तसेच मुरलीधर छतवानी आणि रवींद्र औटी यांनी सहनिर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे.
‘जिजाऊंपासून सिंधुताईंपर्यंत…’ झी मराठी अवॉर्ड्स २०२५ ने स्त्रीशक्तीला केला सलाम!
संत तुकोबांचा वाढता प्रभाव आणि जनमानसात मिळणारे प्रेम पाहून ज्या लोकांच्या मनात मत्सर निर्माण झाला, त्यामध्ये मंबाजी हा सर्वात आघाडीचा होता. सतत तुकोबांना त्रास देणे, कुरापती काढणे आणि त्यांचा छळ करणे हे त्याचे रोजचे काम झाले होते. त्याच्या नीच वृत्तीबद्दल संत बहिणाबाई यांनी आपल्या अभंगात वर्णन करताना लिहिले आहे “विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी” हे वर्णन मंबाजीच्या दुर्जन स्वभावाचे जिवंत दर्शन घडवते.
‘मंबाजी’ या आपल्या खलनायकी भूमिकेबद्दल बोलताना अजय पूरकर सांगतात, ‘याआधीच्या माझ्या बऱ्याच भूमिका सकारात्मक प्रवृत्तीच्या होत्या. आजवरच्या माझ्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन एक वेगळा प्रयत्न या चित्रपटातून मी केला आहे. ही व्यक्तिरेखा कमाल ताकदीची आहे. कलाकार म्हणून स्वीकारलेली ही व्यक्तिरेखा मला खूप महत्त्वाची वाटते. कलाकार म्हणून माझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये मी वेगळेपण कसं आणू शकतो हे महत्त्वाचं आहे. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील या भूमिकेच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली.
साडे बारा हजार फूट उंचीवर ‘मना’चे श्लोक’चं झालं शूटिंग, चित्रपट कधी होणार प्रदर्शित?
‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन संदीप शिंदे यांचे आहे. संकलन सागर शिंदे, विनय शिंदे यांचे आहे. रंगभूषा अतुल मस्के तर वेशभूषा सौरभ कांबळे यांची आहे. संगीत संयोजन आणि पार्श्वसंगीताची जबाबदारी मयूर राऊत यांनी सांभाळली आहे. यासोबतच अनेक कलाकार या चित्रपटाच्या निम्मिताने एकत्र आले आहेत.