(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पंजाबी गायक राजवीर जावंदा यांचे निधन झाले आहे. गायक ११ दिवसांपासून मोहालीतील एका रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. २७ सप्टेंबर रोजी हिमाचल प्रदेशातील बड्डीजवळ झालेल्या एका मोठ्या रस्ते अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. डोक्याला आणि पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला ताबोडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. राजवीरचे वय ३५ वर्ष होते आणि त्यांच्या निधनाच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
कसा झाला गायकाचा अपघात?
राजवीर जावंदा मोटारसायकलवरून शिमलाहून सोलनला जात असताना हा अपघात झाला. बड्डीजवळ त्याचा तोल गेला, ज्यामुळे त्याचा जीवघेणा अपघात झाला. गायकाला तातडीने स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले, परंतु तिथे पोहोचताच त्याला हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याने मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातही राजवीर ११ दिवस व्हेंटिलेटरवर होता आणि आयुष्यासाठी झुंज देत होता.
सेलिब्रिटींनी त्याच्या प्रकृतीसाठी केली प्रार्थना
राजवीरच्या निधनाने पंजाबी संगीत इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेनंतरही, दिलजीत दोसांझ, गिप्पी ग्रेवाल, अॅमी विर्क, नीरू बाजवा आणि कंवर ग्रेवाल यांसारख्या कलाकारांनी सोशल मीडियावर त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणाऱ्या पोस्ट देखील शेअर केल्या. हाँगकाँगमधील त्याच्या संगीत कार्यक्रमादरम्यान, दिलजीत दोसांझने गर्दीला राजवीरसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही केले.
हर्षवर्धन राणेच्या ‘Ek Deewane Ki Deewaniyat’चा ट्रेलर प्रदर्शित; दिसणार अनोखी प्रेम कथा
राजवीर जावंदा कोण?
राजवीर जावंदाने २०१४ मध्ये ‘मुंडा लाईक मी’ या गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले. पुढे गायकाने “खुश रे कर,” “तू दिसा पैंदा,” “सरनेम,” “सरदारी,” “आफरीन,” “डाउन टू अर्थ,” “लँडलॉर्ड,” आणि “कंगनी” सारखी हिट गाणी देखील तयार केली. संगीत क्षेत्रासोबतच, राजवीर यांनी पंजाबी चित्रपटांमध्येही स्वतःची ओळख निर्माण केली. “जिंद जान” आणि “मिंडो तसलीदारणी” सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका करून त्याने प्रेक्षकांची मने जिंकली.