फोटो सौजन्य- सोशल मीडिया
‘पुष्पा : द राइज’ चित्रपटानंतर गेल्या तीन वर्षांपासून ‘पुष्पा २ : द रुल’ चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाला पुन्हा एकदा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षकांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. येत्या ५ डिसेंबरला ‘पुष्पा २ : द रुल’ भारतासह जगभरात रिलीज होणार आहे. चित्रपट प्रदर्शनाला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले असून चाहते सध्या ट्रेलरची वाट पाहत आहेत. ५०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला फहाद फाजीलला आणि रश्मिका मंदान्नाला किती फी मिळाली? जाणून घेऊया…
अल्लू अर्जुन सध्या सर्वाधिक मानधन घेणारा भारतीय अभिनेता ठरला आहे. याआधी थलपथी विजय सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. थलापथी विजयला त्याच्या फिल्मी करियरमधील शेवटच्या चित्रपटासाठी २७५ कोटी रुपये फी मिळत आहे. त्यापेक्षा सर्वाधिक मानधन आता ‘पुष्पा २ : द रुल’साठी अल्लु अर्जुनने घेतलं आहे. अल्लु अर्जुनने ‘पुष्पा २ : द रुल’ साठी ३०० कोटी मानधन घेतले आहे. चित्रपटातील खलनायक फहद फाजिलला फक्त ८ कोटी रुपये फी मिळाली आहे.
एम ९ डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन ३०० कोटी रुपये मानधन घेणारा भारतीय अभिनेता बनला आहे. ज्याने थलपथी विजय तसेच शाहरुख खानला मागे टाकत स्वत:चा नवा विक्रम तयार केला आहे. अल्लू अर्जुनला टक्कर देण्यासाठी खलनायक फहद फाझिलने ८ कोटी रुपये मानधन स्वीकारले आहे. तर रश्मिका मंदान्नाने १० कोटी रुपये मानधन स्वीकारले आहे. १० कोटी रुपयांचे मानधन स्वीकारत रश्मिका मंदान्ना ए-लिस्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली आहे. या यादीत दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, करीना कपूरसह अनेक अभिनेत्रींचा समावेश होता.
नायक आणि खलनायकांच्या फीची तुलना केली तर खूप अंतर दिसेल. पण स्टार पॉवर ही खरी डील आहे. ‘पुष्पा २’ हा ‘पुष्पा’ पेक्षा खूपच वेगळा चित्रपट असणार आहे. चित्रपटात काहीतरी नवीन आणि मोठे घडणार आहे, हे नुकतेच एका रिपोर्टमधून समोर आले आहे. यावेळी चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत असलेला फहद फाजील अतिशय खतरनाक स्टाईलमध्ये दिसणार आहे, ज्यामुळे अल्लू अर्जुनच्या अडचणी वाढणार आहेत. पहिल्या भागाच्या शेवटी, रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुन लग्न करतात. अशा परिस्थितीत ती या चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. एकंदरीत सगळं काही पूर्वीसारखंच असेल, पण खूप वेगळ्या आणि नवीन गोष्टी यात पाहायला मिळतील.