'सिंघम अगेन'मध्ये दिसलेल्या मराठमोळ्या अभिनेत्याने रोहित शेट्टीचे मानले आभार; म्हणाला, "वंडरफूल चित्रपटाचा आणि ड्रीम टीमचा भाग..."
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई सुरू आहे. दहा दिवसातच चित्रपटाने २०० कोटींच्या आसपासची कमाई केलेली आहे. चित्रपटाने आठ दिवसांत १७५ कोटींची कमाई केली आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत बॉलिवूडची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यामध्ये मराठीतल्याही एका सुपरस्टारची वर्णी लागली आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता मोहन अंकित आहे. रोहित शेट्टीच्या ॲक्शनपॅक्ड चित्रपटात या मराठी कलाकाराचीही वर्णी लागली आहे.
हे देखील वाचा – पुरस्कार सोहळ्यांत छाप पाडणाऱ्या ‘ढाई आखर’ चित्रपटाचा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
अभिनेत्याने चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली आहे. चित्रपटात अभिनेत्याने दीपिका पादुकोणसोबत काम केलं असून त्याने चित्रपटाबद्दल खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, अभिनेत्याने ‘सिंघम अगेन’ चित्रपटाबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेता म्हणतो, “या वंडरफूल चित्रपटाचा आणि ड्रीम टीमचा भाग बनवल्याबद्दल मी आभारी आहे. माझं कास्टिंग करण्यासाठी आणि एक चांगल्या व्यक्तीला शंतनु भाकेलामी पहिल्यांदा थँक्यू म्हणतो. बाकी सगळ्या गोष्टींसाठी @gaurav.shah__asha_films धन्यवाद. क्षितीज पटवर्धन आणि टीमने उत्कृष्ट कथा लिहिल्याबद्दल धन्यवाद. भाई तू ग्रेट आहेस. @yunussajawal तुम्ही तर कमाल आहात. आणि स्पेशल धन्यवाद @vidhighodgaonkar. या सगळ्या कॉप युनिव्हर्सच्या मागे असलेला आणि या फॅमिलीचा भाग बनवून माझं युनिव्हर्स वंडरफूल बनवलेल्या रोहित शेट्टी सरांना धन्यवाद. सगळ्यांना मनापासून धन्यवाद…पुन्हा काम करायला आवडेल.”
रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम अगेन’या कॉप युनिव्हर्सचा तिसरा भाग थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. सध्या हा चित्रपट कलेक्शनच्याबाबतीत खळबळ माजवत आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त दबदबा निर्माण केला आहे. उत्तम कथा, स्फोटक ॲक्शन आणि मल्टीस्टारर यासारख्या घटकांमुळे हा चित्रपट हिट ठरला आहे. अजय देवगणने त्याच्या प्रसिद्ध ‘सिंघम’ अवताराद्वारे जबरदस्त पुनरागमन केले आहे. अशा प्रकारे हा चित्रपट कमाईच्या बाबतीतही नवनवे रेकॉर्ड बनवत आहे.