Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालविवाहाच्या नावाखाली चाललेली सौदेबाजी, ‘कबूल है?’ गोंधळात टाकणाऱ्या लग्नाच्या गोष्टीचा ट्रेलर रिलीज

अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या प्रेक्षकांसाठी एक अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारी वेब सिरीज घेऊन येत आहे , ‘कबूल है?' ज्याचे दिग्दर्शन उमैर हसन, फैझ राय, प्रणव रेड्डी यांनी केले आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 22, 2025 | 07:41 PM
बालविवाहाच्या नावाखाली चाललेली सौदेबाजी, ‘कबूल है?’ गोंधळात टाकणाऱ्या लग्नाच्या गोष्टीचा ट्रेलर रिलीज

बालविवाहाच्या नावाखाली चाललेली सौदेबाजी, ‘कबूल है?’ गोंधळात टाकणाऱ्या लग्नाच्या गोष्टीचा ट्रेलर रिलीज

Follow Us
Close
Follow Us:

अल्ट्रा झकास मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म आपल्या प्रेक्षकांसाठी एक अंतर्मुख आणि अस्वस्थ करणारी वेब सिरीज घेऊन येत आहे , ‘कबूल है?’ ज्याचे दिग्दर्शन उमैर हसन, फैझ राय, प्रणव रेड्डी यांनी केले आहे. ही वेब सिरीज २३ मे २०२५ पासून विशेषतः मराठी भाषेत अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. या आधी ही सिरीज तेलुगू भाषेत प्रदर्शित झाली होती तेव्हा तिला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला होता.

हसवत, हसवत विचार करायला लावणारा ‘म्हणजे वाघाचे पंजे’चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, रंजक ट्विस्टमधून उलगडणार आकर्षक कहाणी…

‘कबूल है?’ ही कथा आहे हैदराबादजवळील तलाबकट्टा भागातील, जिथे दैनंदिन जीवनात गरिबी, अशिक्षा आणि सामाजिक विषमता यांचं वास्तव अनुभवायला मिळतं. या परिसरात राहणारा एक गरीब बाप आपल्या केवळ १२ वर्षांच्या अमीना नावाच्या निष्पाप मुलीचं लग्न एका श्रीमंत आणि वृद्ध व्यक्तीसोबत लावतो. परिस्थितीने विवश झालेल्या या कुटुंबाचा निर्णय जरी त्यांच्या दृष्टीने कठीण असला, तरी त्यामागचं शोषण आणि बालहक्कांवरचा घाला हळूहळू उघड होत जातो. या पार्श्वभूमीवर, तलाबकट्टा पोलीस स्टेशनमध्ये भानू नावाच्या एका तरुण आणि न्यायप्रिय पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती होते. भानू हा फक्त कायद्याचाच नव्हे, तर मानवतेचाही प्रहरी आहे. तो आपल्या तपासामध्ये मुलांची तस्करी, बालविवाह, बेकायदेशीर टोळ्यांचा वावर आणि पोलिस यंत्रणेमधील भ्रष्टाचार अशा अनेक धोकादायक गोष्टी समोर आणतो.

‘कबूल है?’ ही केवळ एका मुलीची गोष्ट नाही, तर हजारो अमीनांची व्यथा मांडणारी एक समाजाला काळिमा फसणारी कथा आहे. ही मालिका बालविवाह, लिंगभेद, गरिबी आणि समाजातील शोषणाच्या वेगवेगळ्या छटांवर प्रकाश टाकते. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले की, “या कथा मनात खोलवर परिणाम करतात आणि सामाजिक जनजागृती करतात. या सिरीजच्या माध्यमातून अल्ट्रा झकास पुन्हा एकदा अशा विषयांना व्यासपीठ देण्याच्या आपल्या बांधिलकीला अधोरेखित करत आहे.”

अवधूत गुप्तेचं भावस्पर्शी अल्बम रिलीज, ‘सोप्पं नव्हं माय’ गाणं ऐकलंत का ?

अल्ट्रा मीडिया आणि एंटरटेनमेंट ग्रुप हे गेली चार दशके भारतीय मनोरंजन क्षेत्रात अग्रगण्य राहिले आहे. व्हीएचएसच्या काळापासून आजच्या ओटीटी युगापर्यंतचा प्रवास त्यांनी जपलेला आहे. त्यांच्या १५० हून अधिक यूट्यूब चॅनेल्स आणि तीन प्रादेशिक ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे अल्ट्रा आजही स्थानिक भाषिक कंटेंटसाठी एक विश्वासार्ह प्लॅटफॉर्म बनले आहे. अल्ट्रा झकास मराठी ओटीटी आपल्याला ४,०००+ तासांच्या समृद्ध कंटेंटसह भावनिक, सर्जनशील आणि दर्जेदार मनोरंजनाचं व्यासपीठ देत आहे.

Web Title: Qubool hai movie ultra jhakaas ott released watch trailer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 07:41 PM

Topics:  

  • marathi movie
  • OTT Release

संबंधित बातम्या

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट! चित्रपटाचे सगळे शो Housefull, इतर चित्रपटांना टाकले मागे
1

‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट! चित्रपटाचे सगळे शो Housefull, इतर चित्रपटांना टाकले मागे

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित
2

‘लग्नाचा शॉट’चा टिझर रिलीज, प्रियदर्शिनी-अभिजीत या नव्या जोडीचा चित्रपट ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

‘क्रांतीज्योती विद्यालय’ मराठी प्रेक्षकांनी भरली! पहिल्या आठवड्यातच बजेटपेक्षा तिप्पट कमाई
3

‘क्रांतीज्योती विद्यालय’ मराठी प्रेक्षकांनी भरली! पहिल्या आठवड्यातच बजेटपेक्षा तिप्पट कमाई

रोमँटिक ट्रिपचं धोकादायक वळण! ‘प्रयागराज की लव्ह स्टोरी’ पाहा ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर
4

रोमँटिक ट्रिपचं धोकादायक वळण! ‘प्रयागराज की लव्ह स्टोरी’ पाहा ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.