Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maan Marathi Movie: शेकडो स्त्रिया, भेगाळलेली जमीन अन् संघर्षाची कहाणी! ‘मान’च्या मोशन पोस्टरने वेधलं लक्ष

Maan Marathi Movie: आशुतोष गोवारीकर, झी स्टुडिओज आणि रोहन मापुस्कर पहिल्यांदाच ‘मान’ या मराठी चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. स्त्रीशक्तीवर आधारित हा चित्रपट ४ जून २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 18, 2026 | 01:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

 Maan Marathi Movie: मराठी चित्रपटसृष्टीत एका नव्या आणि वेगळ्या विषयाची भर पडणार आहे. आशुतोष गोवारीकर, झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक रोहन मापुस्कर हे तिघे पहिल्यांदाच ‘मान’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे नुकतेच मोशन पोस्टर प्रदर्शित करून घोषणा करण्यात आली. विशेष म्हणजे, निर्माता म्हणून आशुतोष गोवारीकर यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. ‘मान’ हा चित्रपट ४ जून २०२७ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मोशन पोस्टरमधून स्त्रियांच्या संघर्षाची झलक

चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये भेगाळलेली जमीन आणि त्या जमिनीवरून एकाच दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या शेकडो स्त्रिया दिसत आहेत. या दृश्यातून स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्ष, कष्ट, जिद्द आणि एकजुटीची ताकद अधोरेखित होते. सामान्य स्त्रियांच्या आयुष्याकडे आणि त्यांच्या सामूहिक शक्तीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन ‘मान’ या चित्रपटातून मांडला जाणार असल्याचे पोस्टरवरून दिसते.

आशुतोष गोवारीकरांची पहिली मराठी निर्मिती

आशयपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या कथा प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी ओळखले जाणारे निर्माते आशुतोष गोवारीकर या चित्रपटातून पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याबद्दल बोलताना ते म्हणाले, “चित्रपटाची निर्मिती करताना मला नेहमीच अशा कथांचा शोध असतो, ज्या मनोरंजनासोबतच विचार करायलाही भाग पाडतात. ‘मान’ची संकल्पना माझ्यापर्यंत आली, तेव्हा त्यातील विषयाने आणि त्याच्या व्याप्तीने मला विशेष आकर्षित केले. मराठी भाषेशी आणि संस्कृतीशी माझं नातं कायमच जिव्हाळ्याचं राहिलं आहे. त्यामुळे निर्माता म्हणून माझ्या पहिल्या मराठी चित्रपटासाठी हा विषय निवडला जाणं माझ्यासाठी विशेष आनंदाची गोष्ट आहे.”

रोहन मापुस्कर करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

‘मान’चे दिग्दर्शन रोहन मापुस्कर करणार आहेत. या चित्रपटातून अनेक स्त्रियांचा जीवनप्रवास आणि त्यांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणाले, “अनेक स्त्रियांच्या जीवनप्रवासाचा आणि त्यांच्या भावविश्वाचा वेध घेणारा हा चित्रपट आहे. या विषयाकडे पाहताना त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा प्रवास, तिची धडपड आणि जगण्यातील बारकावे प्रामाणिकपणे पडद्यावर आणणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”

Marathi Actress Madhavi: ना ग्लॅमर, ना स्टारडम! कोकणात पोहोचताच मराठी अभिनेत्री रमली गावाकडच्या कामात; स्वतःच शेणाने सारवले घर

कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात

‘मान’ या चित्रपटाचे लेखन अमित मेहता आणि आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे, तर संवादलेखनाची जबाबदारी अरविंद जगताप यांनी सांभाळली आहे. झी स्टुडिओज आणि गोवारीकर पिक्चर्सची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते झी स्टुडिओज, सुनीता गोवारीकर आणि आशुतोष गोवारीकर आहेत. सध्या चित्रपटातील कलाकारांची नावे गोपनीय ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या चित्रपटात कोणते कलाकार झळकणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. ‘मान’ हा चित्रपट ४ जून २०२७ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Supriya Pilgaonkar: इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर होणारा एकमेव मराठी सिनेमा! सुप्रिया पिळगावकरांच्या ‘तू आहेस ना’ची घोषणा

Web Title: Maan marathi movie ashutosh gowariker rohan mapuskar cinema poster release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 01:15 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Dia Mirza: ‘अनुभव खूपच त्रासदायक..’; दिया मिर्झाची नवाजुद्दीनवर संतप्त पोस्ट, नेमकं काय घडलं?
1

Dia Mirza: ‘अनुभव खूपच त्रासदायक..’; दिया मिर्झाची नवाजुद्दीनवर संतप्त पोस्ट, नेमकं काय घडलं?

Marathi Actress Madhavi: ना ग्लॅमर, ना स्टारडम! कोकणात पोहोचताच मराठी अभिनेत्री रमली गावाकडच्या कामात; स्वतःच शेणाने सारवले घर
2

Marathi Actress Madhavi: ना ग्लॅमर, ना स्टारडम! कोकणात पोहोचताच मराठी अभिनेत्री रमली गावाकडच्या कामात; स्वतःच शेणाने सारवले घर

Supriya Pilgaonkar: इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर होणारा एकमेव मराठी सिनेमा! सुप्रिया पिळगावकरांच्या ‘तू आहेस ना’ची घोषणा
3

Supriya Pilgaonkar: इफ्फीमध्ये जागतिक प्रीमियर होणारा एकमेव मराठी सिनेमा! सुप्रिया पिळगावकरांच्या ‘तू आहेस ना’ची घोषणा

Bigg Boss 20:  बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीसाठी राडा! टास्कदरम्यान लव गिलने माही विजच्या हाताचा घेतला चावा?
4

Bigg Boss 20: बिग बॉसच्या घरात कॅप्टन्सीसाठी राडा! टास्कदरम्यान लव गिलने माही विजच्या हाताचा घेतला चावा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.