Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठरलं तर! कोटींची कमाई करणारा रजनीकांतचा Coolie ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित, नोट करुन घ्या तारीख

रजनीकांत यांचा सुपरहिट चित्रपट 'कुली' बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई केल्यानंतर आता ओटीटीवर येत आहे. 'कुली' कोणत्या प्लॅटफॉर्मवर आणि कधी रिलीज होणार, जाणून घ्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 05, 2025 | 09:10 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

Coolie OTT Release Date: रजनीकांत (Rajinikanth) यांचा सुपरहिट चित्रपट ‘कुली’ (Coolie) लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल होणार आहे. हा चित्रपट याच वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि केवळ २० दिवसांत त्याने ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवल्यानंतर आता ‘कुली’ ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज आहे.

‘कुली’ कोणत्या ओटीटीवर प्रदर्शित होणार?

जर तुम्ही अजूनही हा चित्रपट पाहिला नसेल आणि तो ओटीटीवर पाहण्याची योजना आखत असाल, तर तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. ‘कुली’ याच महिन्यात ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) वर प्रदर्शित होत आहे.

११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित

प्राइम व्हिडिओने त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांनी ‘देवा, सायमन आणि दहा यांच्या कथेसह झूमण्यासाठी तयार व्हा’ असे कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होईल. मात्र, सध्या तो हिंदी भाषेत उपलब्ध नसेल. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे.

‘कुली’ चित्रपटाबद्दल

१४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश कनगराज यांनी केले आहे, तर याचे निर्माते कलानिथी मारन आहेत. चित्रपटातील संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी दिले आहे. यामध्ये रजनीकांत यांच्यासोबत श्रुती हासन, नागार्जुन, सौबिन, उपेंद्र, सत्यराज, रचिता राम आणि पूजा हेगडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हा चित्रपट ॲक्शन-थ्रिलर प्रकारात मोडतो. यात विशाखापट्टणमच्या बंदरात काम करणाऱ्या एका कुलीची कथा दाखवण्यात आली आहे. ‘देव’ नावाचा हा कुली काही परिस्थितीमुळे बंडखोर बनतो. न्याय मिळवण्यासाठी तो वेगवेगळ्या लोकांना भेटतो आणि कथा अधिक रोमांचक होते. या चित्रपटात अभिनेता आमिर खान यांचाही कॅमिओ आहे. ‘कुली’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी ठरला आहे आणि आता तो घरबसल्या ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहण्यासाठी उपलब्ध होईल.

Web Title: Rajinikanths superhit film coolie to be released on ott soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 09:08 PM

Topics:  

  • Amazon Prime
  • Bollywood
  • Entertainment News
  • OTT Release

संबंधित बातम्या

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया
1

सुधा चंद्रनच्या खरोखरच अंगात आली होती देवी की केले ढोंग? नेटकऱ्यांनी केले ट्रोल, अभिनेत्रीने दिली प्रतिक्रिया

Karur stampede case: सीबीआयने Thalapathy Vijay ला पाठवली नोटीस, चौकशीसाठी बजावले समन्स
2

Karur stampede case: सीबीआयने Thalapathy Vijay ला पाठवली नोटीस, चौकशीसाठी बजावले समन्स

‘बाबा, काळजी करू नका…’, सासऱ्यांच्या निधनानंतर खचला जावई, शेअर केली भावुक पोस्ट
3

‘बाबा, काळजी करू नका…’, सासऱ्यांच्या निधनानंतर खचला जावई, शेअर केली भावुक पोस्ट

‘रणवीर सिंग आणि आयुष्मानने केला कास्टिंग काउचचा सामना’, समलैंगिक निर्माते आणि शाहरुख खानबद्दलही मोठा दावा
4

‘रणवीर सिंग आणि आयुष्मानने केला कास्टिंग काउचचा सामना’, समलैंगिक निर्माते आणि शाहरुख खानबद्दलही मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.