Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar: ‘महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला’; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नानांच्या निधनाला वैयक्तिक हानी संबोधत महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान हरपल्याची भावना व्यक्त केली. नानांनी प्रेमाने 'काय क्रांतिवीर...' अशी मारलेली हाक आणि पाठीवर दिले

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 08, 2026 | 12:53 PM
'महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला'; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

'महाराष्ट्राचा स्वाभिमान हरपला'; नाना पाटेकरांच्या निधनाने एकनाथ शिंदे भावुक, राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

Follow Us
Follow Us:
  • नाना पाटेकरांच्या निधनाने महाराष्ट्र हळहळला
  • नानांची ती कौतुकाची थाप कधीच विसरणार नाही
  • एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, उदय सामंतांसह दिग्गज नेत्यांनी व्यक्त केला शोक
Nana Patekar: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातून शोक व्यक्त करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

‘महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा अभिमान हरपला’ – एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. नाना पाटेकर हे केवळ एक उत्कृष्ट अभिनेते नव्हते, तर अभिनयाची जिवंत शाळा होते. संवादफेक, मुद्राभिनय आणि भूमिकांमधील सहजता या सर्व बाबतीत त्यांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण केली होती, असे शिंदे यांनी म्हटले.

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक

नानांसोबतच्या वैयक्तिक आठवणी सांगताना शिंदे भावुक झाले. पुण्यातील त्यांच्या घरी दरवर्षी गणपती दर्शनासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या आठवड्यात गणपती दर्शनादरम्यान झालेली भेट शेवटची ठरेल, असे कधी वाटले नव्हते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘काय क्रांतिवीर…’ अशी प्रेमाने मारलेली हाक आणि पाठीवर दिलेली कौतुकाची थाप मी कधीच विसरणार नाही, असे शिंदे म्हणाले.
नाना पाटेकर यांनी शिंदे यांच्या दरे येथील निवासस्थानी भेट देऊन शेतीची पाहणी केली होती. गाळ उपसण्याच्या कामासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून शेतकरी आणि दुष्काळग्रस्त कुटुंबांसाठी त्यांनी केलेले कार्य महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, असे शिंदे यांनी नमूद केले.

‘आमच्या कुटुंबासाठी ही वैयक्तिक हानी’ – सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाने भारतीय कलाविश्व आणि समाजकारणाची मोठी हानी झाल्याचे म्हटले.
नाना पाटेकर यांच्या अभिनयातील सहजता, प्रभावी संवादफेक आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करत त्यांनी ‘नटसम्राट’, ‘क्रांतिवीर’ आणि ‘परिंदा’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिकांची आठवण करून दिली. नाना पाटेकर यांचे अजित पवार यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. कौटुंबिक सुख-दुःखाच्या प्रसंगी नाना नेहमी पाठीशी उभे राहत असत. त्यामुळे त्यांच्या जाण्याने संपूर्ण पवार कुटुंबासाठी मोठी वैयक्तिक पोकळी निर्माण झाल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

‘एक संवेदनशील आणि प्रखर कलावंत हरपला’ – सचिन अहिर

विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टी पोरकी झाल्याचे म्हटले. चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे नाना पाटेकर हे समाजाच्या दुःखाशी थेट जोडलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व होते, असे अहिर म्हणाले. ‘नटसम्राट’, ‘परिंदा’, ‘क्रांतिवीर’ आणि ‘अपहरण’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील. त्यांचा भारदस्त आवाज, संवादफेकीची आगळीवेगळी शैली आणि डोळ्यांतून व्यक्त होणाऱ्या भावना या त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती, असे त्यांनी सांगितले.

‘गिरणगावातील अस्सल मराठी माणूस गमावला’ – आशिष शेलार

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना करारी, प्रतिभावान आणि संवेदनशील कलाकार म्हणून श्रद्धांजली अर्पण केली. मध्यमवर्गीय कामगार मराठी कुटुंबातून पुढे येत नाना पाटेकर यांनी अपार मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अभिनयातील वेगळेपणा आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे ते कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहतील, असे शेलार म्हणाले.नाना पाटेकर यांना महाराष्ट्र शासनाच्या स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार २०१३ सह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने गिरणगावातील एक अस्सल, इरसाल आणि उत्सवप्रेमी मराठी माणूस हरपल्याची भावना शेलार यांनी व्यक्त केली.

‘माझ्यावर प्रेमाने रागावणारा माणूस निघून गेला’ – उदय सामंत

उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी नाना पाटेकर यांच्यासोबतच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. नानांसोबतचे संबंध केवळ सार्वजनिक जीवनापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे आणि मनापासूनचे मैत्रीचे नाते होते, असे सामंत यांनी सांगितले. ‘माझ्यावर प्रेमाने रागावणारा, चिडणारा एक आपला माणूस आज आपल्यातून निघून गेला,’ अशा शब्दांत त्यांनी दुःख व्यक्त केले. नाना पाटेकर यांचा परखड स्वभाव, माणसांकडे पाहण्याचा संवेदनशील दृष्टिकोन आणि योग्य वाटणाऱ्या गोष्टीसाठी ठामपणे उभे राहण्याची वृत्ती कायम स्मरणात राहील, असे सामंत यांनी नमूद केले.

अभिनयासोबत समाजकारणातही नानांचे योगदान

नाना पाटेकर यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय भूमिका साकारल्या. मात्र, त्यांचे कार्य केवळ चित्रपटसृष्टीपुरते मर्यादित नव्हते. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी शेतकरी, दुष्काळग्रस्त आणि गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी त्यांनी ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेटी दिल्या. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची आठवण अनेक नेत्यांनी आपल्या शोकसंदेशातून करून दिली. नाना पाटेकर यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसह सामाजिक क्षेत्रातही मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

Web Title: Nana patekar death eknath shinde sunetra pawar ashish shelar uday samant emotional tribute sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Bollywood
  • Eknath Shinde
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल
1

केवळ पडद्यावरच नाही, तर रिअल लाईफमध्येही Nana Patekar होते ‘कमांडो’; ‘या’ खेळात जिंकले Silver मेडल

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
2

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप
3

नाना पाटेकरांची शेवटची इच्छा काय होती? आज पुण्यातील डोणजे येथे शासकीय इतमामात अखेरचा निरोप

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष
4

Tanushree Dutta: ‘EVIL DEAD..’, नाना पाटेकरांच्या निधनावर तनुश्री दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत, ‘त्या’ शब्दांनी वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.