भारतातील सर्वात महागडा सिनेमा, १६०० कोटींचं बजेट; चित्रपटाचा निर्माता कोण?
गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे ती, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या ‘रामायण’ चित्रपटाची… नुकताच या चित्रपटाचा प्रोमो रिलीज झाला. या रिलीज झालेल्या प्रोमोमधून चाहत्यांना चित्रपटाची भव्यदिव्यता पाहायला मिळाली. नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपट दोन भागांमध्ये रिलीज होणार आहे. चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ रिलीज होणार असून दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये रिलीज होणार आहे. ‘रामायण’ चित्रपट आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटाच्या निर्मितीवर निर्मात्यांनी बराच खर्च केला आहे. पण, हा खर्च करणारा आणि या महाग चित्रपटाच्या निर्मितीचं शिवधनुष्य पेलणारी व्यक्ती नक्की कोण आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया…
‘Tanvi The Great’ला राष्ट्रीय संरक्षण अकादमीने दिले स्टँडिंग ओव्हेशन, दिग्दर्शक अनुपम खेर झाले भावुक
भव्य दिव्य अवतारातला टीझर काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर रिलीज झाला. या चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणून धरली आहे. या बिगबजेट चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले असून चित्रपटाची निर्मिती नमित मल्होत्रांनी केली आहे. बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारे कलाकार चित्रपटामध्ये भूमिकेत आहेत. चित्रपटात प्रेक्षकांना अनेक दिग्गज कलाकार पौराणिक भूमिकांमध्ये दिसणार आहेत. तगडी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटामध्ये व्हिएफएक्स देखील अद्भुत आहे. सिनेमॅटोग्राफी आणि इतर गोष्टींचे तपशील पडद्यावर दाखवण्यासाठी पूर्ण नियोजन आहे. ‘रामायण’ चित्रपट केवळ कथेच्याच बाबतीत भव्य नाही, तर त्याच्या निर्मिती खर्चानेही सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. प्राइम फोकस स्टुडिओचे संस्थापक आणि सीईओ नमित मल्होत्रा यांनी जेव्हा चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले, तेव्हाच त्यांच्या भव्यतेची कल्पना आली होती.
‘रक्ताने माखलेला चेहरा अन्…’, रणवीर सिंगच्या ‘Dhurandhar’ मधील खतरनाक लूकने वेधले लक्ष
६०० कोटींच्या ‘कल्की 2898 एडी’ किंवा ५५० कोटींच्या ‘आरआरआर’ आणि ‘आदिपुरुष’ सारख्या चित्रपटांनाही ‘रामायण’ने बजेटमध्ये मागे टाकले आहे. ‘रामायण’हा आतापर्यंतचा भारतातला सर्वाधिक महागडा चित्रपट ठरणार आहे. आधी सांगितले जात होते की, या चित्रपटाचा बजेट अंदाजे ८०० कोटी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. मात्र, एका ताज्या रिपोर्टनुसार या चित्रपटाचे एकूण बजेट तब्बल १६०० कोटी रुपये इतके आहे. ऑस्कर विजेत्या VFX स्टुडिओ DNEG च्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत, हा चित्रपट एक नेत्रदीपक दृश्य नाटक (Visual Spectacle)म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या वृत्तानुसार, नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ चित्रपटाच्या दोन भागांसाठी निर्मात्यांनी १६०० कोटी रुपयांचा खर्च निश्चित केला आहे. त्यापैकी पहिला भाग ९०० कोटी रुपयांच्या बजेटवर, तर दुसरा भाग ७०० कोटी रुपयांवर बनवला जाणार आहे.