(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अनुपम खेर त्यांच्या आगामी चित्रपट ‘तन्वी द ग्रेट’च्या प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. यापूर्वी या चित्रपटाने बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. संध्याकाळी पुण्यातील ‘नॅशनल डिफेन्स अकादमी’ येथे या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. २५,०० कॅडेट्स आणि अधिकाऱ्यांनी या चित्रपटाला उभे राहून दाद दिली. हे पाहून अनुपम खेर भावुक होताना दिसले आहेत. अनुपम खेर यांनी या क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि एक अद्भुत पोस्ट लिहिली. अभिनेते आणि दिग्दर्शक या अनमोल क्षणाबद्दल काय म्हणाले जाणून घेऊयात.
Dalai Lama Birthday: ‘हे’ चित्रपट आहेत दलाई लामा यांच्या जीवनावर आधारित; कथानक तुमच्या हृदयाला भिडेल
अनुपम खेर यांनी भावनिक पोस्ट लिहिली
इस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करताना अनुपम खेर यांनी लिहिले की, ‘हा माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षण आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये ‘तन्वी द ग्रेट’ला उभे राहून कौतुकाचा वर्षाव केला. अभिनेता/कलाकार म्हणून माझ्या ४० वर्षांच्या कारकिर्दीत, हा माझ्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय क्षण आहे. भारतातील तन्वी द ग्रेटचे हे पहिलेच प्रदर्शन आहे. ही अशी जागा आहे जिथे तरुण कॅडेट्सना प्रशिक्षण दिले जाते आणि ते सशस्त्र सेवा अधिकारी बनतात.’ असे त्यांनी म्हटले आहे.
‘रक्ताने माखलेला चेहरा अन्…’, रणवीर सिंगच्या ‘Dhurandhar’ मधील खतरनाक लूकने वेधले लक्ष
अनुपम खेर झाले भावुक
अनुपम खेर यांनी पुढे लिहिले, ‘माझ्याकडे फक्त आनंद आणि कृतज्ञतेचे अश्रू होते. हे कौतुक म्हणजे स्टुडिओमध्ये आम्हाला आलेल्या अडचणी, दुःख, निराशा आणि त्रासाला दूर करणारे आहे.’ असे ते म्हणाले. बोमन इराणी आणि शुभांगी दत्त चित्रपटाच्या प्रदर्शनात अनुपम खेरसोबत आले होते. दोघांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटाची कथा काय आहे?
‘तन्वी द ग्रेट’ ही ऑटिझमने ग्रस्त असलेल्या तन्वी रैनाची प्रेरणादायी कथा आहे. तिचे भारतीय सैन्यात भरती होण्याचे स्वप्न आहे. ती तिच्या आई आणि आजोबांसोबत राहते. तिचे स्वप्न आजोबा आणि तिची आई खूप मेहनत घेतात. सैन्यात सेवा बजावणारे तिचे दिवंगत वडील समर रैनाच्या स्मृतींनी प्रेरित होऊन, तन्वी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवू इच्छिते. आता तन्वीचे स्वपन पूर्ण होते का नाही हे संपूर्ण चित्रपट पाहण्यावरच समजणार आहे. हा चित्रपट १८ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.