Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ramayana Movie Release Date : रणबीर कपूरच्या ‘रामायण’ची तारीख पुन्हा चर्चेत! ५ नोव्हेंबरला जगभरात बिगुल, भारतामध्ये कधी?

Ramayana Movie Release Date : नितेश तिवारी दिग्दर्शित रणबीर कपूरच्या ‘रामायण’ चित्रपटाच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाच्या तारखेत बदल झाल्याची माहिती समोर आली आहे. सोनी पिक्चर्स जर्मनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलनुसार, हा चित्रपट 'या' तारखेला जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 10, 2026 | 11:13 AM
Ramayana Movie Release Date (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Ramayana Movie Release Date (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जागतिक रिलीज
  • भारतातील रिलीज
  • भव्य स्टारकास्ट
Ramayana Movie Release Date : गेल्या दोन वर्षांपासून नितेश तिवारीच्या रामायण या चित्रपटाची चर्चा सर्वत्र होत आहे. या चित्रपटामध्ये मोठे कलाकार असल्याने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली असून या सिनेमाची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. आता एक नवीन अपडेट समोर आली. या चित्रपटाची परदेशातील प्रदर्शित करण्याची तारखेमध्ये पुन्हा बदल करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय रिलीज डेटमध्ये पुन्हा बदल करण्यात आला. याआधी हा चित्रपट 6 नोव्हेंबरला परदेशात रिलीज होणार होता, मात्र आता सोनी पिक्चर्स जर्मनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलने सांगण्यात आले की, रामायण आता एक दिवस आधी म्हणजे 5 नोव्हेंबर 2026 ला जगभरात थिएटरमध्ये येईल. Ramayana Movie Release Date :

भारतात हा चित्रपट कधी प्रदर्शित केला जाईल?

परदेशात 5 नोव्हेंबर फिक्स झाली असली तरी भारतातल्या प्रदर्शनाची तारीख अजून मेकर्सनी अधिकृतपणे सांगितले नाही. दिवाळी शुभ मुहुर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येऊ शकतो. ही माहिती सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रांनी एका मुलाखतीमध्ये दिली होती. परदेशात शुक्रवारी चित्रपट प्रदर्शित केला जातो यासाठी 6 नोव्हेंबर तारीख ठरवण्यात आली होती, मात्र आता 5 नोव्हेंबर 2026 ला जगभरात चित्रपट प्रदर्शित केला जाईल. भारतामध्ये दिवाळीमध्ये चित्रपट रिलीज होणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याचाच अर्थ आधी चित्रपट परदेशात प्रदर्शित होईल त्यानंतर भारतामध्ये असा काहीतरी प्लॅन करण्यात आला असेल.

4000 कोटींचा सिनेमा आणि 59000 स्क्रीन्सवर रिलीज

हा फक्त सिनेमा नसून हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट आहे. याचे चित्रपटाचे बजेट तब्बल 4000 इतकी असल्याने डोळे फिरतात. एवढ्या मोठ्या बजेटचा सिनेमा आजपर्यंत भारतात बनला नाही. त्यामुळे रिलीज सुद्धा तेवढाच मोठा असेल. मिळालेल्या माहितीनुसार हा सिनेमा जगभरात 59,000 पेक्षा जास्त स्क्रीन्सवर लागणार असल्याने हा एक विक्रमच होणार आहे. याआधी सिनेमाचा ऑफिशियल ट्रेलर 30 जुलैला भारतात पहाटे 4:15 वाजता ब्रह्म मुहूर्तावर ट्रेलर रिलीज झाला होता. त्यामुळे या सिनेमाला किती महत्त्व आहे हे समजते आहे.

या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे त्याची स्टारकास्ट.

  • रणबीर कपूर – भगवान श्रीराम
  • साई पल्लवी – माता सीता
  • यश (KGF फेम) – रावण
  • सनी देओल – हनुमान
  • रवी दुबे – लक्ष्मण
  • आपला मराठमोळा आदिनाथ कोठारे – भरत
  • अरुण गोविल – राजा दशरथ
  • इंदिरा कृष्णन – राणी कौशल्या
  • लारा दत्ता – कैकेयी
  • शीबा चड्डा – मंथरा
एवढी मोठी आणि अनुभवी टीम एका सिनेमात येणे हीच मोठी गोष्ट आहे. सनी देओलला हनुमानाच्या रूपात बघण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत. तर यश रावण कसा साकारणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.

एकंदरीत, रामायण हा फक्त सिनेमा नसून एक अनुभव असणार आहे. रिलीज डेट जरी एक दिवस मागे-पुढे झाली असली तरी प्रेक्षकांची उत्सुकता काही कमी झालेली नाही. आता सगळ्यांचे डोळे लागले आहेत ते दिवाळीच्या मुहूर्ताकडे, जेव्हा खऱ्या अर्थाने हा भव्य दिव्य रामायण आपल्या समोर येईल.

Web Title: Ramayana movie release date 2026 ranbir kapoor worldwide release rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 11:13 AM

Topics:  

  • Entertainement News
  • Ramayana Movie
  • ranbir kapoor

संबंधित बातम्या

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?
1

Entertainment News: न्यायासाठीचा संघर्ष, महिलांची नजर! ‘दायरा’ ते ‘पूजा मेरी जान’ काय सांगतात या कथा?

Case No. 99 Marathi Movie: ‘केस नं. ९९’मध्ये नेमकं दडलंय काय? ट्रेलर-पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता
2

Case No. 99 Marathi Movie: ‘केस नं. ९९’मध्ये नेमकं दडलंय काय? ट्रेलर-पोस्टरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
3

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
4

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.