‘झी नाट्य गौरव’मध्ये दिवंगत अतुल परचुरेंच्या रुपात आला ‘हा’ अभिनेता, प्रेक्षकांना अश्रू अनावर
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक म्हणून दिवंगत अभिनेते अतुल परचुरे (Atul Parchure)यांच्याकडे पाहिले जाते. आज अतुल परचुरे जरीही आपल्यात नसले तरीही ते आपल्या वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये जिवंत आहेत. अतुल परचुरे यांनी १४ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.. अतुल यांनी कर्करोगाशी झुंज देऊन पुन्हा रंगभूमीवर कमबॅक केलं होतं. पण अचानक आलेल्या आजारपणात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अतुल परचुरेंच्या अचानक जाण्याने मनोरंजन क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली गेली.
प्रतीकने हटवलं वडील राज बब्बर यांचं नाव; सावत्र भाऊ आर्य म्हणाला, “स्मिता मां आमची…”
मराठी नाट्यसृष्टी, सिनेसृष्टी आणि टेलिव्हिजनसृष्टी अशा तिनही माध्यमांमध्ये अतुल परचुरे यांनी कामगिरी केली आहे. त्यांच्या जाण्याने मराठीसह बॉलिवूड इंडस्ट्रीत जी पोकळी निर्माण झाली आहे, ती पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. अभिनेत्याला श्रद्धांजली देताना मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूडमधील काही मोजक्या कलाकारांनी त्यांच्या जाण्याने त्यांच्यासोबतच्या आठवणीही शेअर केल्या होत्या. अशातच आता यंदाच्या ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’सोहळ्यातही अतुल परचुरेंना अनोखी आदरांजली वाहिली जाणार आहे. त्यांना आदरांजली वाहतानाचा व्हिडिओ ‘झी मराठी’ने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.
२४ तासांत ‘सिकंदर’च्या हजारो तिकिटांची विक्री, ॲडव्हान्स बुकिंगमध्ये झाली कोटींची कमाई
‘झी मराठी’ने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘झी नाट्य गौरव पुरस्कार’सोहळ्यामध्ये अतुल परचुरे यांना वाहण्यात आलेल्या आदरांजलीचा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शन दिलंय की “स्वर्गाचे दार उघडणार… स्वर्गीय अतुल परचुरे पुन्हा आपल्यात अवतरणार!” झी मराठीने अनोख्या पद्धतीने दिलेल्या आदरांजलीत अभिनेता अतुल परचुरेंची भूमिका अभिनेता अतुल तोडणकरने साकारली आहे.
व्हिडिओमध्ये, ‘झी नाट्य गौरव’च्या मंचावर अतुल परचुरेंसाठी स्वर्गाचे दार उघडलं जाणार आहे. यावेळी त्यांना त्यांचे मित्र “इथे स्वर्गात सेटल झालास का?” असा प्रश्नं विचारला जातो. त्या प्रश्नावर अतुल परचुरे उत्तर देताना म्हणले की, “अजून तरी नाही… अजूनही सोनियाची… घरच्यांची… मित्रांची… खूप आठवण येते. कधी कधी खाली जाऊन विचारावसं वाटतं. मोन्या (संजय मोने) कसा आहेस रे? तुझी खूप आठवण येते यार… बरं त्या अंड्याला (आनंद इंगळे) कुणीतरी सांगा… म्हणावं आत्ता तरी स्वत:चे किस्से सांग. सगळ्यात महत्वाचं तुम्ही सगळे पार्क क्लबमध्ये जमता ना? तिथे मी असतो, तिथं मी तुमच्या गप्पा ऐकतो. भेटत राहा रे… आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात…”
प्रोमोच्या शेवटी गेल्यावर्षी झालेल्या ‘झी गौरव’ पुरस्कारामधील काही खास क्षण दाखवले जातात. जेव्हा मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार मंडळींनी त्यांचा सन्मान केला होता. अतुल तोडणकरच्या भूमिकेत अतुल परचुरेंना पाहून उपस्थित सगळेच कलाकार भावुक होतात. यावेळी अनेकांच्या डोळ्यांतून अश्रू वाहतात. ‘झी नाट्य गौरव २०२४’ मध्ये अतुल यांच्यासह आनंद इंगळे, सुनील बर्वे, महेश मांजरेकर या कलाकारांनी ‘नटसम्राट’चे सादरीकरण केले होते. यावेळी संजय मोने, पुष्कर श्रोत्री, मोहन जोशी, भाऊ कदम, वैभव मांगले, चंद्रकांत कुलकर्णी या कलाकारांच्या हस्ते त्यांचा नाट्य गौरवच्या मंचावर सन्मान करण्यात आला होता.
वादाच्या भोवऱ्यात कुणाल कामराने शेअर केला आणखी एक व्हिडिओ, कोणाला म्हणाला ‘साडी वाली दीदी’ ?
अतुल यांनी कर्करोगावर मातही केली होती. काही वर्षांपूर्वीच त्यांना कर्करोगाचं निदान झालं होतं. त्यामुळे त्यांचं वजन फार कमी झालं होतं. गेल्या काही दिवसांपूर्वीच ते बरे झाले होते. कर्करोगातून ते बरे झाल्यानंतर त्यांचा सत्कार वैगेरेही करण्यात आला होता. त्यांचे सर्वच स्तरातून कौतुकही करण्यात आले होते. इतकंच नाही तर, ते एका नाटकाच्या माध्यमातून मराठी रंगभूमीवरही पदार्पण करणार होते. पण अखेर त्यांची शेवटची इच्छा ती अपूर्ण ती अपूर्णच राहिली आहे. त्यांना बरं वाटत होतं, म्हणून त्यांनी नाटकाला जोरदार सुरूवातही केली होती. ते रिहर्सललाही उपस्थिती लावत होते. मात्र अचानकच त्यांची तब्येत ढासळल्यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करावे लागले. पण त्यांची उपचाराअंती प्राणज्योत मालवली.