Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बॉलिवूडकरांनाही राजेश मापुस्करांच्या ‘एप्रिल- मे ९९’ चित्रपटाची भुरळ, ‘या’ सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

‘एप्रिल- मे ९९’ चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशी, रितेश देशमुख यांनी चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: May 16, 2025 | 06:30 PM
बॉलिवूडकरांनाही राजेश मापुस्करांच्या ‘एप्रिल- मे ९९’ चित्रपटाची भुरळ, 'या' सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

बॉलिवूडकरांनाही राजेश मापुस्करांच्या ‘एप्रिल- मे ९९’ चित्रपटाची भुरळ, 'या' सेलिब्रिटींनी दिल्या शुभेच्छा

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली असून ही सुट्टी अधिक कुल करण्यासाठी धमाल-मस्तीने भरलेला ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मापुस्कर ब्रदर्सच्या या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ‘थ्री इडियट्स’च्या टीमने म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशी यांच्यासह महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून हा ट्रेलर शेअर करत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रेलरमध्ये मैत्री, भावनांची गुंफण आणि नात्यांची गोडी अनुभवायला मिळत आहे.

‘अशोक मा.मा.’ मालिकेत इंद्रनील कामतची एन्ट्री, भैरवीच्या आयुष्यात कोणते बदल होणार?

एप्रिल- मे महिना म्हटला की अनेक जण कोकणांत गावाला जातात. आपल्या माणसांमध्ये, मित्रांमध्ये, शेजारच्या घरी, कुठेही, कसेही मनसोक्त वावरता आणि बागडता येते. ना वेळेचे बंधन ना कुठे जायचे बंधन. मस्त हुंदडत अख्खे गाव पालथे घालायचे. याच जुन्या आठवणीं ताज्या करण्यासाठी ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. ‘एप्रिल मे ९९’ च्या ट्रेलरमध्ये कृष्णा, सिद्धेश आणि प्रसाद ही धमाल तिकडी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाली असतानाच त्यांच्या सुट्टीच्या प्लॅनवर पालक विरजण घालताना दिसत आहेत. या सुट्ट्यांमध्ये त्यांची भेट जाईशी होते. जाईला कोकण फिरवत, तिच्यासोबत दंगामस्ती, धमाल करत असतानाच या दरम्यान त्यांच्यात निर्माण होणारी मैत्री, मस्तीचे क्षण आणि काही भावनिक वळणे या ट्रेलरमधून उलगडताना दिसत असून कोकणातील पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट प्रेक्षकांना त्यांच्या बालपणात घेऊन जाणारी आहे. निसर्गरम्य कोकणचे दर्शनही या निमित्ताने घडत आहे.

 

काळवीट शिकार प्रकरणात Salman Khan हायकोर्टात राहणार हजर, ‘हम साथ साथ हैं’ कलाकारांवर होणार कारवाई!

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, “आपल्यापैकी अनेकांनी मे महिन्याची सुट्टी अशा पद्धतीने घालवली आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची जागा ‘व्हेकेशन्स’ने घेतली आहे. अर्थात बाहेर फिरायला जाण्यात काहीच गैर नाही. प्रत्येकाची सुट्टीची व्याख्या वेगळी असते. असे असले तरी प्रत्येकाने आयुष्यात अशी सुट्टी नक्कीच एन्जॉय करावी. दिवसभर गावात हुंदडत, विहिरीत डुबक्या मारत, सायकलवर अख्खे गाव पालथे घालत, खोडकरपणा करण्यातली मज्जाच काही और आहे. हेच दाखवण्याचा प्रयत्न ‘एप्रिल मे ९९’मध्ये करण्यात आला आहे. मोठ्यांना त्यांच्या सुट्टीची आठवण करून देणारा, लहानग्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीची खरी व्याख्या सांगणारा आणि संपूर्ण कुटुंब एकत्र एन्जॉय करेल असा हा चित्रपट आहे.”

 

नात्यांच्या गाठी, भावना आणि आठवणींचा हळुवार स्पर्श असणारा ‘अमायरा’चा ट्रेलर प्रदर्शित

निर्माते राजेश मापुस्कर म्हणतात, “ट्रेलर पाहाताना अनेकांना आपल्या घरातील कथा असल्याचा भास झाला असेल. हा चित्रपट प्रेक्षकांना जवळचा वाटण्याचे कारण म्हणजे आपल्यापैकी अनेक जण एप्रिल मेच्या सुट्ट्या एन्जॉय करायला दरवर्षी कोकणात जातात. कोकणातील उन्हाळ्याच्या सुट्ट्या अशाच गंमतीशीर आणि धमाल असतात. त्यामुळे हा चित्रपट पाहून तुम्ही पुढची उन्हाळ्याची सुट्टी अशीच प्लॅन कराल. यात चार किशोरवयीन मुले दिसत असली तरी ही गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांची आहे. मला खात्री आहे हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात नक्कीच यशस्वी होईल. मुळात ‘एप्रिल- मे ९९’ हा फक्त चित्रपट नसून आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या उन्हाळ्या सुट्टीचा अनुभव जिवंत करणारा, रम्य ते बालपण असं सांगत, बालपणात रमविणारा एक निखळ प्रवास आहे.”

 

“पण तुम्ही हिंदूंना का शिवीगाळ करताय?”, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांवर गायक जावेद अख्तर संतापले

‘एप्रिल मे ९९’मध्ये आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. येत्या २३ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

Web Title: Rohan mapuskar and rajesh mapuskar april may 99 marathi movie trailer rajkumar hirani r madhavan sharman joshi riteish deshmukh shared on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2025 | 06:30 PM

Topics:  

  • Bollywood
  • marathi movie
  • R Madhavan
  • Rajkumar Hirani
  • Riteish Deshmukh

संबंधित बातम्या

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार
1

फैसल खानने आमिरसह कुटुंबाशी तोडले संबंध; ‘बदनाम करण्याचे षडयंत्र’ रचल्याचा आरोप, कोर्टात जाणार

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित
2

बॉलीवूड गाजवणारे टॉपचे सुपरस्टार आधी चाळीत राहायचे, नावं पाहताच व्हाल चकित

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!
3

अब आएगा मजा! ‘कालीन भैय्या’ची खुर्ची हिसकावण्यासाठी ‘Mirzapur’ मध्ये दोन नवे शत्रू! ‘या’ कलाकारांची धमाकेदार एन्ट्री!

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा
4

Mukesh Khanna on Jaya Bachchan: ‘या बिघडल्या आहेत…’ मुकेश खन्ना यांनी जया बच्चन वर साधला निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.