(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी टीव्ही अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे.‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेमुळे ती घराघरात पोहोचली होती.रुचिराने आतापर्यंत अनेक निगेटिव्ह भूमिका साकारल्या असून त्यामुळे ती आता मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय खलनायिका म्हणून ओळखली जाते. तिचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी सातत्याने संपर्कात असते.मराठी टीव्ही अभिनेत्री सोशल मीडियावर चांगल्याच सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन आयुष्यातील अपडेट्स, फोटोशूट्स, लूक फोटो, आणि वैयक्तिक क्षण त्या चाहतेांसोबत शेअर करत असतात.मात्र, मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियावर बिकिनीतील फोटो शेअर केल्यास त्यांना अट्रोलिंगचा सामना देखील करावा लागतो. . अशाच अनुभवातून गेलेल्या अभिनेत्री रुचिरा जाधव हिने अलीकडेच यावर परखड मत व्यक्त केलं आहे.
कांतारा ते सैयारा, भारतात Netflixवर ट्रेंड करत असलेल्या ४ जबरदस्त चित्रपटांची यादी
अलीकडे दिलेल्या एका मुलाखतीत रुचिराने या ट्रोलिंगबाबत आपलं मत मांडलं असून, ती म्हणाली की स्वतःवर विश्वास ठेवणं आणि स्वत:चा अभिमान बाळगणं सर्वात महत्त्वाचं आहे. यावर बोलताना रूचिरा म्हणाली, “मी कृष्णाच्या मंदिरात पण जाते. समुद्रावरचे स्विम सुट किंवा बिकिनीमधील फोटो जर मला सोशल मीडियावर टाकावेसे वाटले तर मी ते टाकत असते.पण लोक या गोष्टी एकत्र करतात,या दोन वेगवेगळ्या पोस्ट आहेत ना! माझ्या इस्कॉन मधल्या मंदिराच्या फोटोखाली तुम्ही असं नाही म्हणू शकत की हिचं बाकीचं प्रोफाइल पाहा… ती सुद्धा मी आहे आणि ही सुद्धा मीच आहे. मला माझ्या दोन्ही बाजू कशा सांभाळायचा या माहित आहेत.
Star Pravah Marathi Serial : TRPच्या शर्यतीत दोन मालिकांनी मारली बाजी; वाचा संपूर्ण यादी
पुढे रूचिरा म्हणाली कुठे काय घालायचं हे मला कळतं, मी मंदिरात साडी किंवा ड्रेसही घालते. खरं तर मी जशी असेल तशी जाते.समजा कधी मी शूट वरून लवकर फ्री झाले तर मी तोंडावर स्कार्फ गुंडाळून जाते. मंदिरात आपण मेकअप वगैरे करून जात नाही. त्यामुळे शूट वरून सुटल्यावर जर मला वाटलं की मंदिरात जायचं आहे तेव्हा मी फक्त नीट प्रेझेंटटेबल कपडे आहेत ना याची दक्षता घेते. जीन्स पॅन्टमध्येसुद्धा मी मंदिरात जाते, डोक्यावर स्कार्फ गुंडाळते. तिथे गेल्यावर माझ्या मनातला भाव माझ्या देवासाठी महत्त्वाचा असतो हे मला माहित आहे.त्यामुळे मंदिरात जाताना मी काय घालायचं काय नाही हे मला कळतं.