Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा संगम; ‘मी पाठीशी आहे’चा ट्रेलर प्रदर्शित

नव्या युगातील श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा 'मी पाठीशी आहे' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झालीय.

  • By चेतन बोडके
Updated On: Mar 12, 2025 | 02:34 PM
श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा संगम; 'मी पाठीशी आहे'चा ट्रेलर प्रदर्शित

श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्मचा अनोखा संगम; 'मी पाठीशी आहे'चा ट्रेलर प्रदर्शित

Follow Us
Close
Follow Us:

नव्या युगातील श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा ‘मी पाठीशी आहे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. येत्या २८ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट स्वामी समर्थांच्या अद्भुत लीलांवर आधारित असून त्यांच्या अस्तित्वावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हा एक प्रेरणादायी प्रवास ठरेल. ट्रेलरमध्ये सक्षम कुलकर्णी हा एका नव्या भूमिकेत दिसत आहे. आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांचा वेध घेणाऱ्या या चित्रपटात अध्यात्म आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम पाहायला मिळेल. हा एक कौटुंबिक चित्रपट असून ट्रेलरमध्ये माधुरी पवार हिच्या दमदार लावणीची झलक देखील पाहायला मिळत आहे.

उन्हाच्या झळांमध्ये थंडगार प्रेमाचा गारवा देणार ‘गुलकंद’ च पहिलं गाणं… ‘चंचल’ प्रेमगीत ऐकलं का ?

चित्रपटाचे दिग्दर्शक पराग अनिल सावंत म्हणतात, ” ‘मी पाठीशी आहे’ हा चित्रपट म्हणजे श्रद्धा आणि विश्वासावर उभा राहिलेला एक प्रवास आहे. स्वामी समर्थ हे केवळ एक दैवी शक्ती नाही तर अनेकांच्या आयुष्यातील मार्गदर्शक आहेत. त्यांचा आशीर्वाद आणि कृपा कशी जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते, हे आम्ही या कथेतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांना २८ मार्चला ही प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळेल. हा चित्रपट आम्ही बनवला नसून स्वामींनी ही कलाकृती आमच्याकडून साकारून घेतली आहे. ”

रितेशला या प्रसिद्ध अभिनेत्रीसह पाहून काय विचार करत होती जेनेलिया? व्हायरल व्हिडिओवर सोडले मौन!

ऑफबीट प्रॉडक्शन, नित्य सेवा प्रॉडक्शन आणि वेरा प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे कथा, संकलन आणि दिग्दर्शन पराग अनिल सावंत यांनी केले असून मयूर अर्जुन खरात, लक्ष्मीकांत गजानन कांबळे, ॲड. शुभांगी किशोर सोनवले, प्रमोद नंदकुमार मांडरे, शितल सोनावणे, ऋतुजा नरेंद्र कदम, अनिल गावंड आणि केतन कल्याणकर या स्वामींच्या सेवेकरांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. संजय नवगिरे, दिलीप परांजपे यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली असून संजय नवगिरे यांनी चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. तर चित्रपटातील गाण्यांना कबीर शाक्य यांना संगीत सेवा करण्याची संधी लाभली आहे. या चित्रपटात सक्षम कुलकर्णी, सतीश पुळेकर, अरुण नलावडे, सुहास परांजपे, वर्षा प्रभु, श्रीकांत पाटील, अश्विनी चवरे, प्रसाद सुर्वे, शितल सोनावणे, सूचित जाधव, श्रद्धा महाजन, राजवीर गायकवाड, वैष्णवी पोटे यांच्या प्रमुख भूमिका असून माधुरी पवार, संदेश जाधव आणि नूतन जयंत हे विशेष पाहुणे म्हणून झळकणार आहेत.

Web Title: Saksham kulkarni satish pulekar arun nalawade suhas paranjape prasad surve starrer mi pathishi ahe marathi movie trailer released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2025 | 02:34 PM

Topics:  

  • marathi actor
  • marathi actress
  • marathi film

संबंधित बातम्या

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO
1

१२ वर्ष लिव्ह-इन रिलेशननंतर अभिनेता सारंग साठ्येनं केले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले PHOTO

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!
2

‘वडापाव’च्या टीमसाठी साकारला भव्य वडापाव, हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थी व शेफ्सची कमाल पाककृती!

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना
3

मराठी अभिनेत्यानं पूर्ण केलं वडीलांचे 40 वर्षांचं स्वप्न पूर्ण, दुबईला नेऊन दाखवला भारत पाकिस्तान सामना

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री
4

‘लास्ट स्टॉप खांदा…’ चित्रपटाचे कलरफुल पोस्टर लाँच, श्रमेश बेटकरसोबत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.