(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध जोडपं रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूडच्या मोस्ट फेवरेट कपल्समध्येही दोघांच्या नावाचा समावेश आहे. रितेश-जिनेलिया म्हणजे, पॉवर कपल असंही म्हटलं जातं. पण, सध्या हे दोघेही खूप चर्चेत आहेत याचं कारण असं, की आयफा अवॉर्ड्स 2019 मधला तो व्हिडीओ जो खूप चर्चेत होता. या व्हिडीओवरुन बराच काळ, अगदी आजही चर्चा रंगतात. याचदरम्यान आता या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आता स्वतः जिनेलिया देशमुखने आपले स्वतःचे मत स्पष्ट केले आहे.
Class म्हणजे काय? ‘या’ Photosने जाणून घ्या… ‘दीपिका… तेरे आगे सब फिका’
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या बऱ्याच गोष्टींचे वेगवेगळे अंदाज लावले जातात. कधी त्याच्या हसण्याचा वेगळा अर्थ लावला जातो, तर कधी एखाद्या हावभावाचा वेगळा अर्थ लावला जातो. अनेक फक्त अर्थ लावण्यापुरतं प्रकरण मर्यादित राहत नाही, तर या गोष्टीच्या अफवा लगेच सोशल मीडियावर पसरतात. कधीकधी तर अफवा, चर्चा अगदी कळस गाठतात. असंच काहीसं रितेश आणि जिनेलियाच्याबाबतीत आयफा अवॉर्ड्स 2019 मध्ये घडलं. अभिनेत्री जिनेलिया देशमुख ही पती रितेश देशमुखबाबत एका प्रसंगावरुन अस्वस्थ असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आणि चाहत्यांनी लगेचच अंदाज बांधायला सुरुवात केली.
हा व्हिडीओ होता रितेश देशमुख आणि अभिनेत्री प्रीती झिंटा यांच्यातील संभाषणाचा होता. दोघांमधील संभाषणावेळी जिनेलिया काहीशी अस्वस्थ झालेली दिसली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. अशातच आता जिनेलिया देशमुखने मुलाखतीत या सगळ्याचे उत्तर दिले आहे. अभिनेता अरबाज खानच्या ‘पिंच’ या चॅट शोमध्ये बोलताना अभिनेत्री म्हणाली की, “मी बऱ्याच दिवसांना एखाद्या अवॉर्ड फंक्शनला उपस्थित होते. त्यामुळे सुंदर ड्रेस आणि हाय हिल्स घालून तयार झालेले. पण, त्यावेळी अनेकजण भेटत होते, गप्पा मारत होते. अशातच काही वेळातच माझे पाय दुखायला लागले. तर, त्याचवेळी रितेश आणि प्रिती झिंटा दुसरीकडे बोलत होते. माझे पाय दुखत असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन आले, नेमके तेच दुर्दैवानं त्यावेळी कॅमेऱ्यात ते दिसले.” असे अभिनेत्रीने आता म्हटले आहे.
दीपिका पदुकोणचा स्टायलिश अवतार! लुई वुइटन फॉल विंटर २०२५ शोमध्ये झळकणार, फोटो पहाच!
लग्नानंतर जिनेलिया सिनेसृष्टीपासून दूर
बॉलिवूड अभिनेत्री जिनेलिया डिसोझा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न केले आणि विलासराव देशमुख यांची सून झाली. लग्नानंतर मात्र जिनेलिया सिनेसृष्टीपासून दुरावली गेली. तिनं काही प्रोजेक्ट्स केले, मात्र ती मोठ्या पडद्यावर दिसलीच नाही. “तू आता काम का करत नाहीस…?” असं नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेत्रीला विचारले असता ती म्हणाली की, “लोक काय बोलतात याला मी फारसं महत्त्व देत नाही. मला माझ्या मुलांसोबत वेळ घालवण्यात आनंद मिळतो. मी ठरवलं होतं की, माझ्या कुटुंबाला वेळ द्यायचा आणि मला अजूनही ते आवडतं.” असं तिने सांगितले.