salman khan
‘आरआरआर’(RRR Movie) या चित्रपटाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. या चित्रपटातील थरारक ॲक्शन प्रसंगांनी या चित्रपटाला बांधून ठेवले आहे. गावकऱ्यांच्या गर्दीशी एकटा लढणारा राम असो की जंगलातील वाघाबरोबर आपल्या सर्व ताकदीनिशी लढाई करणारा भीम असो, त्यात अभिनेते राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) या कलाकारांनी खूप मेहनत घेतली आहे.
एस. एस. राजमौली यांच्या ‘आरआरआर’ या चित्रपटातील ॲक्शन प्रसंगांसाठी राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर या कलाकारांनी फिटनेस ट्रेनरकडून कठोर प्रशिक्षण घेतले आहे. एका कार्यक्रमात सुपरस्टार सलमान खानने (Salman Khan) याविषयी एक गोष्ट सांगितली आहे. तो म्हणाला की, आपला फिटनेस ट्रेनर राकेश उडियार हा तेव्हा एकाच वेळी मला आणि ‘आरआरआर’साठी राम चरणलाही प्रशिक्षण देत होता. त्यामुळे आम्हा दोघांच्या वेळा सांभाळताना त्याची खूपच तारांबळ उडत असे. तेव्हा सलमान खान एका चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र होता आणि राकेशकडून कठोर प्रशिक्षण घेत होता.
या घटनेवर भाष्य करताना ‘आरआरआर’च्या लाँच कार्यक्रमात सलमान खान म्हणाला, “या लोकांनी किती मेहनत घेतली आहे हे मला माहिती आहे. माझा स्वत:चा ट्रेनर मला सोडून चरणकडे जायचा. मला तारकच्या कामाची कल्पना आहे, त्याला किती कठोर त्रासातून जावं लागलं असेल हे मी जाणतो. तो आपल्याला थक्क करतो.”
एस. एस. राजमौलींबद्दल सलमान खान म्हणाला, “आज आपल्यात ते सर्वोत्कृष्ट आहेत आणि मी माझ्या सर्व चाहत्यांना आवाहन करतो की त्यांनी आरआरआर चित्रपट पाहावा.” झी सिनेमावर १४ ऑगस्ट रोजी रात्री ८.०० वाजता आरआरआर या चित्रपटाचा जागतिक टीव्ही प्रीमिअर होणार आहे.