Salman Khan Threat: तारीख तिच, पुन्हा धमकी; सलमान खानचा जीव धोक्यात?
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सलमान खानला विशेष ओळखीची गरज नाहीये. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. सलमान खानचा चाहता वर्ग एकटा भारतातच नाही अख्ख्या जगभरात आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा भाईजान सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा आज (१४ एप्रिल) जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अभिनेत्याच्या घरावर गेल्या वर्षी याच दिवशी गोळीबार झाला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा अभिनेत्याच्या सुरक्षेसंबंधित प्रश्न निर्माण झाला आहे.
Salman Khan: ‘कारही बॉम्बने उडवून देणार…’, सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी
बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या कमालीचा चर्चेत आला आहे. ‘सिकंदर’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात राहिलेला सलमान खान त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सलमान खानला आज पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. सलमान खानची कार बॉम्बनं उडवून देण्याची धमकी पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, ही धमकी मुंबईच्या वरळीच्या वाहतूक विभागाच्या WhatsApp नंबर वर सलमान संदर्भात धमकीचा मेसेज आला आहे. मेसेजमध्ये कार बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीसोबतच त्याला घरात घुसून मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे अभिनेत्याच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
‘मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते…’ ऐश्वर्या राय बच्चन आणि जया बच्चन यांचा जुना VIDEO VIRAL
दरम्यान, वरळी वाहतूक विभागाकडून सलमान खान धमकी प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्याला धमकी मिळण्याचा प्रकार हा काही पहिल्यांदाच घडलेला नाही. यापूर्वी ही अभिनेत्याला अनेकदा जिवे मारण्याची धमकी आणि त्याच्या घरावर गोळीबाराचीही घटना घडली आहे. गेल्या वर्षी १४ एप्रिलच्याच दिवशी सलमान खानच्या घरावर दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. त्या गोळीबाराच्या घटनेमध्ये अभिनेत्याचा जीव थोडक्यात बचावला होता. अभिनेत्याच्या घराच्या भिंतींवर हल्लेखोराकडून गोळीबार करण्यात आला होता. गेल्या वर्षी झालेल्या गोळीबारची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. अभिनेत्याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणी दोघांना अटक केली होती.
कहने को जश्न-ए-बहारा है…; सोनम, तुझ्या निखळ सौंदर्याचे राज काय?
आज झालेल्या गोळीबार प्रकरणाची अद्याप सविस्तर माहिती समोर आलेली नाही. पोलिसांना सलमान खानच्या धमकी मेसेज कुठून आला ? मेसेज कोणी पाठवला ? या प्रश्नाचे उत्तरं सध्या तरी गुलदस्त्यातच आहे. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान गेल्या कित्येक वर्षांपासून बिश्नोई समाजाच्या निशाण्यावर आहे. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी रात्रीच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट)चे नेते बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येची जबाबदारीही बिश्नोई गँगनेच स्विकारली होती. बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूडचं नातं फार घनिष्ठ आहे. बाबा सिद्दीकी इफ्तार पार्टीचं आयोजन करायचे. त्या पार्टीसाठी बॉलिवूड इंडस्ट्रीतले सगळेच सेलिब्रिटी हजेरी लावायचे. अगदी सलमान खान आणि शाहरुख खानपासून सगळेच सेलिब्रिटी या पार्टीला उपस्थिती राहायचे.
‘छावा’ चित्रपटात कान्होजी शिर्केंची भूमिका का साकारली? सुव्रत जोशीने अखेर मौन सोडले
त्यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा सुद्धा सलमान खानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्याच्यासोबत शाहरूख खानलाही धमकी मिळाली होती. शाहरुख खानच्या घराची रेकी करण्यात आल्याचेही वृत्त समोर आलं होतं. गेल्या वर्षापासूनच सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर राज्य सरकारकडून त्याला वाय प्लस (Y+) सुरक्षा देण्यात आली आहे. सलमान कुठेही गेला तरी त्याच्यासोबत सुरक्षा रक्षकांचा आणि मुंबई पोलिसांचा कडेकोट पोलिस बंदोबस्त हा असतोच. त्याच्या आजूबाजूला पोलिसांचं आणि सुरक्षा रक्षकांचं रिंगण हे कायमच पाहायला मिळतं. सलमान खानच्या वांद्रे येथील घरालाही सुरक्षारक्षकांचा घेराव असल्याचं पाहायला मिळतो. तर, सलमानने आता वांद्रातील गॅलेक्सीमधील घराच्या गॅलरीलाही बुलेटप्रुफ काचा लावल्या आहेत. अशातच नेहमी कडेकोट सुरक्षेत फिरणाऱ्या सलमानची गाडी बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आल्याने अभिनेत्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.