When aishwarya rai bachchan gets emotional after jaya bachchan welcomed her to family
विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन ही बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्री फक्त तिच्या फिल्मी करियरमुळे नाही तर, तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कमालीची चर्चेत आली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) एकमेकांपासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र अभिषेक आणि ऐश्वर्याने यावर्षी अनेक इव्हेंटला एकत्र येऊन घटस्फोटाच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. या सगळ्या चर्चांदरम्यान सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्या राय बच्चनचा आणि जया बच्चनचा (Jaya Bachchan) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये जया बच्चन आपल्या सुनेबद्दल बोलताना दिसत आहेत.
‘छावा’ चित्रपटात कान्होजी शिर्केंची भूमिका का साकारली? सुव्रत जोशीने अखेर मौन सोडले
जया बच्चन आणि ऐश्वर्याचा हा व्हिडिओ फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यातील आहे. ज्यामध्ये जया बच्चन पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर जातात. यादरम्यान, पुरस्कार स्वीकारताना, त्या आपली लाडकी सुनबाई ऐश्वर्याबद्दल बोलताना दिसत आहे. त्या तिचं कुटुंबात स्वागत करताना आणि तिचे कौतुक करताना दिसत आहेत. जया बच्चन आणि ऐश्वर्या बच्चनचा हा व्हिडिओ एका फॅन्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, व्हिडिओमध्ये जया बच्चन म्हणतात की, “मी पुन्हा एकदा एका अद्भुत आणि सुंदर मुलीची सासू झाली आहे. जिच्याकडे उत्तम मूल्ये, उत्तम प्रतिष्ठा आणि एक निखळ हास्य आहे. मी तिचे कुटुंबात स्वागत करते, मी तुझ्यावर कायम खूप खूप प्रेम करते.”
सासूबाईंकडून कौतुक ऐकताना ऐश्वर्याचे डोळे पाणावतात. ऐश्वर्याचे कौतुक करताना जया बच्चन यांच्याही डोळ्यामध्ये पाणी येतात. शिवाय, यावेळी अमिताभ बच्चन देखील भावनिक होताना दिसले. उपस्थितांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रु पाहायला मिळाले. ऐश्वर्याच्या अभिनयाचे आणि त्यातील कौशल्याचे कायमच तिच्या चाहत्यांनी भरभरुन कौतुक केले आहे. त्याशिवाय बच्चन कुटुंबीयांनीही केले आहे. बच्चन कुटुंबाचा हा थ्रो बॅक व्हिडिओ सोशल मीडियावर नेटकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आवडला आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, आशा आहे की हे प्रेम तुमच्या कुटुंबात कायम असंच राहुद्यात. कायमच नेटकऱ्यांच्या रडारवर असणाऱ्या जया बच्चन यांचे नेटकरी सध्या कौतुक करीत आहेत.
तारुण्य असावं तर असं… करीना कपूरच्या आरस्पानी सौंदर्याने नेटकरी स्वप्नात हरपले
ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या लग्नाला १८ वर्षे झाली आहेत. त्यांनी २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. या जोडप्याला बी-टाऊनच्या पॉवर कपलचा टॅग मिळाला आहे. अभिषेक व्यतिरिक्त, ऐश्वर्याचे अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्यासोबत असलेले नाते देखील खूप चांगले आहे. त्यांच्या कुटुंबात सर्व काही आलबेल आहे.