Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर; जावेद अख्तर, राजू परुळेकर यांचा होणार विशेष सन्मान…

कायमच आपल्या अभिनयामुळे नाही तर, जावेद अख्तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे संगीतकार आता एका पुरस्कारामुळे चर्चेत आले आहेत. त्यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Apr 08, 2025 | 06:51 PM
नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर; जावेद अख्तर, राजू परुळेकर यांचा होणार विशेष सन्मान...

नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार जाहीर; जावेद अख्तर, राजू परुळेकर यांचा होणार विशेष सन्मान...

Follow Us
Close
Follow Us:

जावेद अख्तर यांनी आपल्या ७० आणि ८० च्या दशकातील सिनेकरियरमध्ये ‘अंदाज’, ‘यादों की बारात’, ‘जंजीर’, ‘दीवार’, ‘हाथी मेरे साथी’ आणि ‘शोले’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या आहेत. जावेद अख्तर हे एक सुप्रसिद्ध आणि प्रख्यात गीतकार असून माजी खासदार देखील ते आहेत. कायमच आपल्या अभिनयामुळे नाही तर, जावेद अख्तर आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे संगीतकार आता एका पुरस्कारामुळे चर्चेत आले आहेत. त्यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

६ वर्षांनंतर विशाल ददलानीने ‘इंडियन आयडल’ शो का सोडला? स्वतःच सांगितलं कारण

जावेद अख्तर यांच्यासोबतच राजू परुळेकर, संदिप तामगाडगे, डॉ. श्यामल गरूड, डॉ. अमोल देवळेकर, ॲड. दिशा वाडेकर यांनाही समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर (Samashti Award Announced) करण्यात आला आहे. दरम्यान, समष्टी ऊलगुलान हा पुरस्कार विचार, विद्रोह, शब्द, संवेदना आणि कृती यांचा संगम घडवणाऱ्या व्यक्तींना प्रदान केलेला आहे. काही तासांपूर्वीच समष्टी फाऊंडेशनने यंदाच्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांची घोषणा केली आहे. प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार तर राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांना ‘सत्यशोधक उपाधी’ ही प्रदान करण्यात येणार आहे.

राजकीय षडयंत्र अन् प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं कथानक; Raid 2 चा जबरदस्त ट्रेलर रिलीज…

‘सारं काही समष्टीसाठी’ या सोहळ्याचे यंदा आठवं वर्ष आहे. ११ आणि १२ एप्रिल २०२५ रोजी भायखळा येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात दुपारी १२ ते रात्री १० या वेळेत हा दोन दिवसीय सोहळा रंगणार आहे. या दोन दिवसांत कला, साहित्‍य, सिनेमा, सामाजिक आदी विविध विषयांवर चर्चा होणार आहे. या सोहळ्या दरम्यान ७ मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. साहित्य आणि भाषाशास्त्रात ५० वर्षांच्या दिलेल्या योगदानासाठी प्रख्यात गीतकार व विचारवंत जावेद अख्तर यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांना समष्टी ऊलगुलान पुरस्कार, आयपीएस अधिकारी संदिप तामगाडगे यांना नामदेव ढसाळ समष्टी पुरस्कार, प्रसिद्ध साहित्यिका डॉ. श्यामल गरूड यांना समष्टी गोलपीठा पुरस्कार, डॉ. अमोल देवळेकर यांना समष्टी निर्मिक पुरस्कार, तर ॲड.. दिशा वाडेकर यांना समष्टी मूकनायक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

” ‘संतोष’ चित्रपटाची कानपासून ऑस्करमधल्या एन्ट्रीपर्यंत चर्चा होते, पण भारतात मात्र…” किरण मानेंची पोस्ट व्हायरल

अक्षय शिंपी यांची हृदयस्पर्शी दास्तांगोई सादरीकरण, रसिका आणि कृतिका बोरकर यांचा संगीत कार्यक्रम, वरुण सुखराज, सुमेध, मयुरेश कोण्णूर यांचा आशिष शिंदे यांच्यासोबत संवाद, सुकन्या शांता, दीपा पवार, अलका धुपकर, ॲड. दिशा वाडेकर यांच्यासोबत परिसंवाद, ‘तुही यत्ता कंची’- हेमंत ढोमे, मंदार फणसे, प्रज्ञा पवार, सत्यशोधक जलसाचे विशेष सादरीकरण, मालविका राज, सिद्धेश गौतम, कैलास खानजोडे, प्रशांत कुवर, रोहीणी भडांगे, स्वप्ना पाटसकर विक्रांत भिसे आणि लक्ष्मण चव्हाण आदी कलाकारांचे चित्र आणि शिल्प प्रदर्शन हे यंदाच्या सोहळ्याचे वैशिष्ट्य असणार आहे. सदर सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. स्वप्नील ढसाळ, वैभव छाया, हरेश तांबे यांनी केले आहे.

Web Title: Samashti award announced for knowledge thought and change javed akhtar raju parulekar know all details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 06:51 PM

Topics:  

  • awarded
  • Bollywood
  • Bollywood News
  • Bollywood singer

संबंधित बातम्या

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा
1

ऑनलाइन गेम खेळताना मागितले प्रायव्हेट फोटो, अक्षय कुमारच्या लेकीसोबत घडलं भयंकर; अभिनेत्याचा खुलासा

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री
2

Bigg Boss 19: एका वाईल्ड कार्डमुळे बदलणार खेळ, ‘या’ क्रिकेटपटूची बहीण घेणार ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?
3

संपली नाही ‘कंतारा’ची संपूर्ण कथा, लवकरच येणार तिसरा भाग; काय असेल ऋषभ शेट्टीच्या पुढच्या चित्रपटाचे नाव?

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक
4

Zubeen Garg: जुबीन गर्गच्या मृत्यूचा तपास सुरूच; शेखर ज्योती गोस्वामी आणि अमृतप्रभा महंत यांना केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.