Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हंबीर तू…’; ‘सरसेनापती हंबीरराव’ मधील दिमाखदार शीर्षकगीत प्रदर्शित, चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

प्रचंड ऊर्जा देणारे 'सरसेनापती हंबीरराव' यांच्या गुण वर्णनाचे हे गीत प्रणित कुलकर्णी यांनी लिहिले असून संगीत अविनाश - विश्वजित यांचे आहे. आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजात हे गीत ऐकताना व पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो.

  • By Aparna Kad
Updated On: May 01, 2022 | 03:33 PM
‘हंबीर तू…’;  ‘सरसेनापती हंबीरराव’ मधील दिमाखदार शीर्षकगीत प्रदर्शित, चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Follow Us
Follow Us:

आज १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जन्मदिवस या त्रिवेणी मुहूर्तावर सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या महाराष्ट्राचा महासिनेमाचे शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘सरसेनापती हंबीरराव’ हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर महापराक्रमी, शस्त्र निपुण, युद्धकला पारंगत असे भारदस्त व्यक्तिमत्त्व उभे राहते.

प्रत्येकवेळी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून लढणाऱ्या या महापराक्रमी योध्याचे वर्णन आपल्याला या गीतामध्ये ऐकायला मिळते. प्रचंड ऊर्जा देणारे ‘सरसेनापती हंबीरराव’ यांच्या गुण वर्णनाचे हे गीत प्रणित कुलकर्णी यांनी लिहिले असून संगीत अविनाश – विश्वजित यांचे आहे. आदर्श शिंदे याच्या दमदार आवाजात हे गीत ऐकताना व पाहताना अंगावर रोमांच उभा राहतो.

या विषयी बोलताना संगीतकार अविनाश – विश्वजित म्हणाले “या चित्रपटाची भव्यता पाहता हे गाणे सुद्धा तेवढे भव्य वाटले पाहिजेच पण ते काळानुरूपसुद्धा वाटले पाहिजे हा विचार डोक्यात ठेऊन आम्ही हे गाणे संगीतबद्ध केले. या गाण्यामध्ये आम्ही ती भव्यता आणण्यासाठी विशेषतः ढोल, ताशा, हलगी, डफ, बगलबच्चा अशा विविध प्रकारच्या १६ पेक्षा जास्त तालवाद्यांचा वापर केला. तसेच ८ वादक आणि १५ कोरस गायकांच्या साथीने आदर्श शिंदेच्या आवाजात पहिल्याच प्रयत्नात संगीतबद्ध केलेले हे गाणे कुठलाही बदल न करता चित्रपटाच्या प्रसंगात अगदी चपखल बसले याचे आम्हाला आजही अप्रूप वाटते.”

संदीप मोहितेपाटील प्रस्तुत, उर्वीता प्रॉडक्शन्सच्या शेखर मोहितेपाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांची निर्मिती असलेल्या ‘सरसेनापती हंबीरराव’ हा भव्य, ऐतिहासिक महाराष्ट्राचा महासिनेमा येत्या २७ मे २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रासह जगभरातील शिवप्रेमींच्या भेटीला मोठ्या पडद्यावर येत आहे.

Web Title: Sarsenapati hambirrao mohite title song released nrak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2022 | 03:02 PM

Topics:  

  • entertainment
  • Entertainment News
  • sarsenapati hambirrao

संबंधित बातम्या

Box Office: भारतात हॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटाचा Box Officeवर धडाका! दोन दिवसांतच ‘धुरंधर’ आणि ‘डंकी’ला टाकलं मागे
1

Box Office: भारतात हॉलिवूडच्या ‘या’ चित्रपटाचा Box Officeवर धडाका! दोन दिवसांतच ‘धुरंधर’ आणि ‘डंकी’ला टाकलं मागे

The Paradise Teaser : नॅचरल स्टार नानीचा मोठा धमाका! ‘द पॅराडाइज’चा बहुप्रतीक्षित टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज
2

The Paradise Teaser : नॅचरल स्टार नानीचा मोठा धमाका! ‘द पॅराडाइज’चा बहुप्रतीक्षित टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज

Salman Khan Post: ‘I love you baba!’; संजय दत्तला मिठी मारत सलमान खान झाला भावूक, नेमकं काय घडलं?
3

Salman Khan Post: ‘I love you baba!’; संजय दत्तला मिठी मारत सलमान खान झाला भावूक, नेमकं काय घडलं?

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत मोठा अपघात! डॉक्टरांनी दिला ‘इतके’ आठवडे बेडरेस्टचा सल्ला; नेमकं काय घडलं?
4

Rashmika Mandanna: अभिनेत्री रश्मिका मंदानासोबत मोठा अपघात! डॉक्टरांनी दिला ‘इतके’ आठवडे बेडरेस्टचा सल्ला; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.