Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

समाज परिवर्तनाचा लढा रुपेरी पडद्यावर, छगन भुजबळ यांच्या हस्ते ‘सत्यशोधक’ चित्रपटाचं पोस्टर लाँच

समता फिल्मस् निर्मित ‘सत्यशोधक’ चित्रपटात महात्मा जोतीराव फुलेंनी समाज परिवर्तनासाठी केलेला संघर्ष, आधुनिक महाराष्ट्राच्या विकास, कामगार चळवळ, महिलांचा शैक्षणिक विकास या सगळ्या गोष्टी दाखवण्यात येणार आहेत.

  • By साधना
Updated On: Sep 05, 2023 | 03:49 PM
satyashodhak poster launch

satyashodhak poster launch

Follow Us
Follow Us:

नाशिक: समता फिल्मस् निर्मित आणि अभिता फिल्म्स प्रस्तुत क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित आगामी ‘सत्यशोधक’(Satyashodhak) चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या हस्ते नाशिक (Nashik) येथील कार्यालयात करण्यात आले.(Marathi Movie)

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, दिलिप खैरे, समता फिल्मस् चे निर्माते आप्पा बोराटे, प्रवीण तायडे, लेखक आणि दिगदर्शक निलेश जळमकर , कार्यकारी निर्माता शिवा बागुल, माळी महासंघाचे प्रमुख बाजीराव अण्णा तिडके, समता परिषदेचे प्रमुख रवी सोनवणे साहेब, सत्यशोधक राजेंद्र बागुल, अभिनेते रोहित सरवार, आदित्य कमोदकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, सुनील पैठणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी ‘सत्यशोधक’ चित्रपटाचा प्रारूप ट्रेलर छगनजी भुजबळ यांना दाखविण्यात आला व लवकरच हा ट्रेलर प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती निर्मात्यांनी दिली. मंत्री छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या सर्व टीमला शुभेच्छा दिल्या.

समता फिल्मस् निर्मित ‘सत्यशोधक’ चित्रपटात महात्मा जोतीराव फुलेंनी समाज परिवर्तनासाठी केलेला संघर्ष, आधुनिक महाराष्ट्राच्या विकास, कामगार चळवळ, महिलांचा शैक्षणिक विकास, आधुनिक इमारतींची बांधणी या सर्वांमध्ये केलेली भरीव कामगिरी तसेच त्यांना या सर्व प्रसंगात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिलेली साथ आणि त्यांनी आयुष्यभर केलेले समाजप्रबोधन हे सर्व पैलू चित्रपटात अत्यंत काळानुरूप दाखविण्यात आले आहे.

या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राज्य पुरस्कार विजेते दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी केले आहे. चित्रपटात महात्मा जोतीराव फुले यांची भूमिका राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप कुलकर्णी यांनी साकारली आहे तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या राजश्री देशपांडे सावित्रीबाई फुले यांच्या भूमिकेत आहेत, तसेच रवींद्र मंकणी, रवी पटवर्धन, गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा या दमदार कलाकारांची त्यांना लाभली आहेत.

या चित्रपटाची पटकथा तयार करण्यासाठी राज्य शासनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचा संदर्भ घेण्यात आला आहे आणि महात्मा ज्योतीराव फुलेंचे गाढे अभ्यासक माननीय साहित्यिक प्रा.हरी नरके यांच्या मार्गदर्शनाखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते संगीत दिग्दर्शक अमित राज यांचे कर्णमधुर संगीत लाभले असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते समीर फातर्फेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.
‘सत्यशोधक’ लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतभर प्रदर्शित करण्यात येणार आहे.

Web Title: Satyashodhak movie poster launch by minister chhagan bhujbal nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2023 | 03:41 PM

Topics:  

  • Chagan BhujBal
  • entertainment
  • Nashik

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा
2

Aishwarya Rai: ५२ व्या वर्षीही ऐश्वर्याचा जलवा कायम; मुकुट अन् ब्लॅक गाऊनमधील रॉयल लूक पाहून चाहते फिदा

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.