Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“कपड्यावरुन तुम्ही मुलींना जज करणार” ? ‘या’ मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली आम्ही सगळ्या कमेंटस्….

कलाकार सोशल मीडियावर कधी कुठल्या कारणाने ट्रोल होतील काही सांगता येत नाही. बऱ्यचा सेलिब्रिटी या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात पण आता तत्वज्ञान देणाऱ्या ट्रोलर्सना एका मराठी अभिनेत्रीने चांगलीच चपराक दिली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 29, 2026 | 06:26 PM
“कपड्यावरुन तुम्ही मुलींना जज करणार” ? ‘या’ मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर, म्हणाली आम्ही सगळ्या कमेंटस्….
Follow Us
Follow Us:
  • कपड्यावरुन तुम्ही मुलींना जज करणार ?
  • ‘या’ मराठी अभिनेत्रीने ट्रोलर्सना दिलं सणसणीत उत्तर
बॉलीवूड असो की मराठी सिनेसृष्टी कलाकारांच्या खाजगी आयुष्यात अनेकांना रस असतो. हे कलाकार सोशल मीडियावर कधी कुठल्या कारणाने ट्रोल होतील काही सांगता येत नाही. बऱ्यचा सेलिब्रिटी या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतात पण आता तत्वज्ञान देणाऱ्या ट्रोलर्सना एका मराठी अभिनेत्रीने चांगलीच चपराक दिली आहे. ही अभिनेत्री म्हणजे ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील अभिनेत्री मानसी सुरेश. कपड्यांवरुन जज करणाऱ्य़ा नेटकऱ्याची मानसीने सोशल मीडियावर चांगलीच शाळा घेतली आहे.

नेमकं घडलं काय ? 

मानसी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. ती सतत कोणते ना कोणते फोटो पोस्च करत असते. अशातच तिच्या वेस्टर्न आउटफिटवरुन तिला एका नेटकऱ्याने टोमणे मारले. त्यावर मानसीने देखील सडेतोड उत्तर दिलं. एक काळ होता मावश्या साड्या मध्ये दिसायच्या आणि लाड करायच्या, खाऊ घालायच्या आणि आजचा Trend Modern मावश्या, असं म्हणत एका युजरने तिला तिच्या कपड्यावरुन सुनावलं. या अशा कमेंला दुर्लक्ष न करता मानसीने या नेटकऱ्याला समाचार घेतला.

काय म्हणाली मानसी ? 

युजरच्या कमेंटला रिप्लाय देताना मानसी म्हणते की, एक काळ असा होता, जिथे पुरुष पांढरा सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी घालून फिरायचे आता तुम्ही शर्ट पॅन्ट मध्ये का दिसता हो ?एक काळ पुरुष शेतात राबायचा तुम्ही कंपनी मध्ये जॉब का करताय ?एका काळात पुरुष बाई चा खूप आदर करायचा आणि तुमचे विचार बघा, कपड्यांवरून तुम्ही मुलींना judge करणार ?कोण आहात कोण तुम्ही ?आणि राहिला प्रश्न साड्यांचा आम्हाला साडी मध्ये पण लढता येत आणि शॉर्ट्स मध्ये सुद्धा. आता कंमेंट delete करायची नाही हा, असं म्हणत ट्रोल करणाऱ्यांचं तोंड तिने बंद केलं.

‘सनई चौघडे’ मालिकेतील कलाकारांचा अनोखा, प्रेरणादायी श्री तारक मंत्र उपक्रम! ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’त नोंदवला विश्वविक्रम!

मानसी पुढे असं देखील म्हणते की, आम्ही ट्रोलिंगला दुर्लक्ष करतो याचा अर्थ आम्ही वाचत नाही असं नाही. आणि प्रत्येक ट्रोलिंगकडे दुर्लक्ष देखील केलं जाणार नाही. कधी ना कधी कुठलाही कलाकर कायमच या ट्रोलिंगच्या त्रासातून जात असतो. याचा परिणाम म्हणजे कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील याचा वाईट परिणाम होतो. याआधी देखील अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिला एक जण म्हणालं की, तुझं वय झालं हे आता चेहऱ्यावर दिसून येत आहे, ही कमेंट सर्वात जास्त त्रासदायक असल्याचं देखील सोनालीने सांगितलं होतं. एकंदरितच सेलिब्रिटींना कायमच ट्रोल केलं जातं.

भारतीय सिनेमाला लाभलेली पहिला महिला एडिटर; ज्यांच्याशिवाय ‘राजा हरिश्चंद्र’ सिनेमा आजही अपूर्णच

 

Web Title: Savlyachi janu sawali fem actress manasi suresh answer to trollers topic on womens cloaths

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi actress
  • zee marathi

संबंधित बातम्या

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण
1

Sankarshan Karhade: जपानमधील भारतीयांचा देशप्रेमाचा क्षण! संकर्षण कऱ्हाडेंनी स्वातंत्र्यदिनी शेअर केली खास आठवण

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’  ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा
2

Himanshi Khurana News: ‘माझ्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला गेला’ ब्रेकअपनंतर अभिनेत्रीचा मोठा खुलासा

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत
3

Trisha Krishnan: घटस्फोटाच्या चर्चेला पूर्णविराम? संगीताच्या निर्णयानंतर त्रिशा-विजयचा नवा VIDEO चर्चेत

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक
4

Veteran actress Leela Gandhi Viral video : ‘काही देऊ नका पण…’ लीला गांधींच्या ‘या’ शब्दांनी उपस्थित कलाकारही झाले भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.