Aryan burst into tears when he saw his father Shah Rukh Khan
शाहरुख खानचा (Shahrukh Khan)मुलगा आर्यन खान (Aryan Khan ) लवकरच मनोरंजनाच्या दुनियेत पाऊल ठेवणार आहे. त्यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारी पहिली वेब सिरीजची शूटींग (Web Series) शुक्रवारी सुरू झाली. ही सहा भागांची मालिका असेल, ज्याची निर्मिती त्याचे वडील शाहरुख करत आहेत.
[read_also content=”रेल्वेरुळ झाले वेगळे, चाकं निघाली; गॅस कटरने बोगी कापून बाहेर काढले जात आहेत मृतदेह https://www.navarashtra.com/india/odisha-train-accident-death-toll-rises-to-233-900-people-are-serious-railway-minister-ashwini-vaishnav-presented-nrps-409143.html”]
आर्यन खानने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्याची स्क्रिप्ट पूर्ण झाल्याची घोषणा केली होती. आता 2 जूनपासून त्यांनी पडद्यामागची जबाबदारी स्वीकारली आहे. या मालिकेचे नाव कथितपणे स्टारडम असल्याचे सांगितले जात आहे. रिपोर्ट्सनुसार, टीमने वरळीतील मिलमध्ये ऑफिसची काही दृश्ये शूट केली. आर्यन सकाळी 7 च्या कॉल टाइमच्या खूप आधी सेटवर होता, त्याचे वडील, शाहरुख खान देखील नवोदित दिग्दर्शकाचे अभिनंदन करण्यासाठी सेटवर पोहोचले होते
एका न्यूज पोर्टलनुसार, सध्या या वेब सीरिजवर जवळपास 350 लोक काम करत आहेत. लक्ष्य ललवानी अभिनीत ही मालिका तुम्हाला हिंदी चित्रपटसृष्टीच्या एका काल्पनिक जगात घेऊन जाईल. आर्यन खान दिग्दर्शित प्रकल्प पुढील वर्षी OTT वर प्रदर्शित होईल. जिथे आर्यन खान कॅमेऱ्यामागे त्याच्या करिअरची सुरुवात करणार आहे. त्याचबरोबर किंग खानची मुलगी सुहाना खान लवकरच अभिनय विश्वात पाऊल ठेवणार आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘द आर्चीज’ या ओटीटी चित्रपटात ती दिसणार आहे. या संगीतमय चित्रपटात खुशी कपूर, अगस्त्य नंदा, वेदांग रैना आणि मिहिर आहुजा यांच्याही भूमिका आहेत.