अॅटली यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, ’21 सप्टेंबर रोजी त्यांनी विजयला त्यांच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केले होते आणि त्यांनी पार्टीला देखील हजेरी लावली होती. यादरम्यान शाहरुख आणि विजय यांच्यात संवाद झाला तेव्हा त्यांनी दिग्दर्शकाला फोन केला आणि सांगितले की जर तो दोन नायकांना घेऊन चित्रपट बनवत असेल किंवा कोणतेही प्लॅनिंग फायनल करायचे असेल तर दोघेही त्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.

अॅटली पुढे म्हणाले, ‘शाहरुख सरांनी मला सांगितले की, जर मी दोन नायकांसह चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार केला तर ते दोघेही त्यासाठी तयार आहेत. विजय अण्णांनीही ‘अमा पा’ म्हटलं, म्हणून मी त्यावर काम करतोय. हा माझा पुढचा चित्रपट असू शकतो.