Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“माझं नशीब म्हणजेच माझं मरण…” शिवाली परबच्या ‘मंगला’चा टीझर रिलीज; ॲसिड हल्ल्याचं गुपित उलगडणार

जन्मा- मरणाच्या आणि नशिबाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा 'मंगला' या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपासून 'मंगला' या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 01, 2024 | 08:34 PM
"माझं नशीब म्हणजेच माझं मरण..." शिवाली परबच्या ‘मंगला’चा टीझर रिलीज; ॲसिड हल्ल्याचं गुपित उलगडणार

"माझं नशीब म्हणजेच माझं मरण..." शिवाली परबच्या ‘मंगला’चा टीझर रिलीज; ॲसिड हल्ल्याचं गुपित उलगडणार

Follow Us
Close
Follow Us:

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ हे बरेचदा ऐकलं आहे. मात्र, एखाद्याच्या जन्माच्या वेळी त्याचं मरण त्याच्या नशिबात लिहिलं असेल असे फार कमी जणांना वाटत असावं. आणि एखाद्याच्या वाटेला असं मरण, असं संकट आलं तर त्या मरणाला लढा देत जिंकण्याची जिद्द त्यांच्यात येते आणि ही लढाई ते पारही करतात. हो जन्मा- मरणाच्या आणि नशिबाच्या गोष्टींची अभूतपूर्व कथा ‘मंगला’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपासून ‘मंगला’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. ऍसिड हल्ल्यामुळे एका सुंदर अशा गायिकेची झालेली वाईट अवस्था या पोस्टरमधून समोर आली. यानंतर आता चित्रपटाच्या टीझरने चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढवून ठेवली आहे. हा ऍसिड अटॅक नेमका का?, आणि यानंतर मंगलाने या संकटावर मात करत दिलेला लढा या चित्रपटात पाहणं रंजक ठरणार आहे.

हे देखील वाचा – हॉरर, सस्पेन्स आणि दमदार स्टार कास्टिंग; सिक्वेलपेक्षाही Bhool Bhulaiyaa 3 एकदम खतरनाक, वाचा एकदा Review

सध्या सर्वत्र या चित्रपटाच्या टिझरने हा हल्ला नेमका का झाला?, हा हल्ला कोणी केला?, अशा अनेक प्रश्नांना फाटा फुटल्या आहेत. अशा या आशयघन व भयावह कथेचा सार घेऊन ‘मंगला’ हा चित्रपट पुढील वर्षी १७ जानेवारी २०२५ पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सत्य घटनेवर आधारित असलेल्या आणि भयावह हल्ल्यातून वाचलेल्या मंगला या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब मार्फत या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये पाहिल्याप्रमाणे चेहऱ्यावर झालेल्या ऍसिड हल्ल्याची खूण सतावत आहे. हे चित्र पाहण्याजोगं नसलं तरी या मागील गहन विषय साऱ्यांना खुर्चीत खिळवून ठेवेल यांत शंका नाही.

‘रैश प्रोडक्शन प्रा.लि’ आणि ‘फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट’ प्रस्तुत ‘मंगला’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा अपर्णा हॉशिंग यांनी उत्तमरीत्या पेलवली आहे. तर चित्रपटाच्या निर्मितीची बाजू अपर्णा हॉशिंग, यशना मुरली, मोहन पुजारी, मिलिंद फोडकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाची कथा आणि पटकथा सौरभ चौधरीची असून संवाद प्रथमेश शिवलकर याचे आहेत. तर संपूर्ण चित्रपटाचे संगीत शंतनु घटक याचे आहे. एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहणं उत्सुकतेचं ठरेल. मंगलाची ही खरीखुरी कथा १७ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर पाहणं रंजक ठरेल.

हे देखील वाचा – सपशेल फसलेली कॉमेडी आणि बुचकळ्यात टाकणारं कथानक; अजय देवगण आणि रोहित शेट्टीच्या Singham Again चा वाचा Review

Web Title: Shivali parab starrer mangla marathi movie teaser released on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2024 | 08:34 PM

Topics:  

  • marathi actress

संबंधित बातम्या

Priya Marathe : “ती आली होती पण आमची भेट होणं नशीबातच नव्हतं”; प्रिया मराठेच्या आठवणी सांगताना मृणाल झाली भावूक
1

Priya Marathe : “ती आली होती पण आमची भेट होणं नशीबातच नव्हतं”; प्रिया मराठेच्या आठवणी सांगताना मृणाल झाली भावूक

कोरोनादरम्यान लग्न, ५ वर्षांचा मोडला संसार; ‘देवबाभळी’ फेम अभिनेत्री पतीपासून घेणार घटस्फोट
2

कोरोनादरम्यान लग्न, ५ वर्षांचा मोडला संसार; ‘देवबाभळी’ फेम अभिनेत्री पतीपासून घेणार घटस्फोट

Priya Marathe : अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स केल्या… दोन वर्ष झगडून… प्रिया मराठेच्या निधनावर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट
3

Priya Marathe : अनेकांनी अत्यंत वाईट कमेंट्स केल्या… दोन वर्ष झगडून… प्रिया मराठेच्या निधनावर प्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट

Priya Marathe: करियर, मैत्री आणि स्ट्रगल ते फिल्मी स्टाईल प्रपोज; ‘अशी’ आहे प्रिया शंतनूची लव्हस्टोरी
4

Priya Marathe: करियर, मैत्री आणि स्ट्रगल ते फिल्मी स्टाईल प्रपोज; ‘अशी’ आहे प्रिया शंतनूची लव्हस्टोरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.