Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“मी करंजीसारखी..”,शिवानी सोनार लग्नानंतर साजरी करणार पहिली दिवाळी, अंबरकडून मिळणार सरप्राइज

अभिनेत्री शिवानी सोनार म्हणजेच तारिणी, तिची पहिली दिवाळी सासरी साजरी करणार आहे , म्हणाली, ''अंबरने माझ्यासाठी काहीतरी सरप्राइझ प्लॅन केलं'',

  • By अमृता यादव
Updated On: Oct 20, 2025 | 04:41 PM
(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळी ही प्रत्येकासाठी खास असते, पण एका नवविवाहित स्त्रीसाठी ती आणखीनच खास भावना घेऊन येते. पहिली दिवाळी सासरी साजरी करणं आणि ते ही नव्या घरात, नव्या माणसांत आपली ओळख निर्माण करणं, आणि जुन्या आठवणींना नव्या आनंदाने सजवणं. अभिनेत्री शिवानी सोनार म्हणजेच तारिणी, तिची पहिली दिवाळी सासरी साजरी करणार आहे आणि तिच्या आनंदाला पारावर उरलेला नाही . शिवानी म्हणाली, “आजपर्यंत मी प्रत्येक वर्षी आई-वडिल आणि भावासोबत घरी दिवाळी साजरी केली आहे, पण यंदा माझं लग्नानंतरचं पहिलं वर्ष आहे आणि पहिली दिवाळी सासरी असल्यामुळे एक वेगळीच उत्सुकता आहे. मी कायम सगळे दिवाळीचे रितीरिवाज पाळले आहेत, मग तो फराळ करणं असो, रांगोळी काढणं, अभ्यंगस्नान, किल्ला बनवणं आणि यंदाही शुटिंग सुरू असतानाही शक्य असेल तेवढं सगळं करणार आहे. यंदाचा दिवाळी पाडवा माझ्यासाठी खास आहे, कारण हा माझा पहिला पाडवा आहे आणि अंबरने माझ्यासाठी काहीतरी सरप्राइझ प्लॅन केलं आहे, त्यामुळे मी खूपच एक्सायटेड आहे.

Colours Marathi Serial:‘बाईपण जिंदाबाद’ नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ सात लोकप्रिय अभिनेत्री एकत्र दिसणार

दिवाळी मधल्या फराळ बद्दल जेव्हा शिवानीला विचारले गेले कि ती कोणत्या पदार्थ सारखी आहे ती म्हणाली “मला असं वाटतं की मी करंजीसारखी आहे, बाहेरून कडक पण आतून गोड. कारण कधी कधी लोकांना वाटतं मी अ‍ॅटीट्यूडवाली, रागीट, आहे, पण तसं काही नाही. जेव्हा मी कुणावर जीव लावते, तेव्हा मी त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या खूप जोडली जाते. यंदाची भाऊबीज खास आहे कारण माझ्या भावाला पहिली नोकरी लागली आहे आणि तो मला यंदा स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून गिफ्ट घेणार आहे. याआधी आईवडिल त्याला गिफ्ट घेऊन द्यायचे आणि तो मला द्यायचा. पण यंदा तो स्वतः कमावून देणार आहे. माझ्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. यंदाची दिवाळी खरंच सगळ्या अर्थाने माझ्यासाठी स्पेशल आहे.”

कलर्स मराठीवर अद्भुत स्वामी लीलांचा प्रवास; सुरु होणार श्री क्षेत्र अक्कलकोट महात्म्य ‘आदेश स्वामींचा – योग अक्कलकोट दर्शनाचा’

Web Title: Shivani sonar talks about first diwali with husband ambar ganpule after wedding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 03:46 PM

Topics:  

  • Diwali 2025
  • marathi actress
  • marathi serial news

संबंधित बातम्या

”पोटात गोळा अन् छातीत धडधड, तरी…”, ‘ही’ मराठी अभिनेत्री 7 वर्षांनी ‘या’ मालिकेतून करणार कमबॅक
1

”पोटात गोळा अन् छातीत धडधड, तरी…”, ‘ही’ मराठी अभिनेत्री 7 वर्षांनी ‘या’ मालिकेतून करणार कमबॅक

Zee Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा झाला कमळीचा अविस्मरणीय वाढदिवस, तारिणीने दिलं खास सरप्राईझ
2

Zee Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात साजरा झाला कमळीचा अविस्मरणीय वाढदिवस, तारिणीने दिलं खास सरप्राईझ

Colors marathi serial:‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवं वळण, शिवाचं सत्य दूर करेल का जगदंबेचा गैरसमज?
3

Colors marathi serial:‘आई तुळजाभवानी’ मालिकेत नवं वळण, शिवाचं सत्य दूर करेल का जगदंबेचा गैरसमज?

Colors Marathi Serial: इंद्रायणीमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीकला विरुद्धच्या लढाईत इंदूला मिळणार आनंदीबाईंची साथ
4

Colors Marathi Serial: इंद्रायणीमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीकला विरुद्धच्या लढाईत इंदूला मिळणार आनंदीबाईंची साथ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.