Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारणामुळे सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णीमध्ये होता 10 वर्षांचा अबोला! अभिनेत्रीने सांगितला शुटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

नुकतंच सोनाली व्हायफळच्या पॉडकास्टमध्ये दिसली. मैत्रीबद्दल सांगताना ती म्हणाली की, माझा एक चांगला मित्र आहे जो माझ्याशी तब्बल 10 वर्ष बोलत नव्हता.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 26, 2026 | 06:22 PM
‘या’ कारणामुळे सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णीमध्ये होता 10 वर्षांचा अबोला! अभिनेत्रीने सांगितला शुटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा
Follow Us
Follow Us:

सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णीमध्ये होता 10 वर्षांचा अबोला!

अभिनेत्रीने सांगितला शुटींगदरम्यानचा ‘तो’ किस्सा

मराठी सिनेविश्वाबाबात सांगायचं तर अप्सरा म्हटलं की पहिले डोळ्यासमोर येते ती अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. नुकतंच सोनाली व्हायफळच्या पॉडकास्टमध्ये दिसली. वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारताना सोनाली म्हणाली की आयुष्य खुप छोटं आहे तुम्हाला कधी तुमच्या जवळच्य़ा व्यक्तीला सॉरी म्हणायला वेळ मिळेल की नाही माहित नाही. सोनाली म्हणाली की तिला तिच्या एका मित्राने अजूनही ब्लॉक केलं आहे आणि तो आताही तिच्याशी बोलत नाही. सोनालीने कॅमेऱ्यासमोर सांगितलं की मी मिस करते तुला. यापुढे ती असं देखील म्हणाली की, माझा अजून एक चांगला मित्र आहे जो माझ्याशी तब्बल 10 वर्ष बोलत नव्हता. सांगायला आता काहीच हरकत नाही कारण अनेकदा आम्ही सोशल मीडिया किंवा माध्यमांमध्ये देखील सांगितलं आहे की, सिद्धार्थ जाधव आणि मी खूप चांगले मित्र आहोत.

एकदा असं झालं की,एका सिनेमाचं शुट सुरु होतं आणि शुटींग दरम्यान काहीतरी शुल्लक कारणावरुन सिद्धार्थने माझ्याशी बोलणं बंद केलं आणि तो माझ्याशी 10 वर्ष बोलत नव्हता. नंतर झालं असं की, श्रीदेवीचं जेव्हा निधन झालं तेव्हा त्याने मला फोन केला आणि म्हणाला जाऊदेत मागचे सगळे हेवेदावे आणि राग रुसवा सोडून आपण पुन्हा एकदा छान मित्र म्हणून राहुयात. श्रीदेवीने जेव्हा जगाचा निरोप घेतला तेव्हा सिद्धार्थला साक्षात्कार झाला की, असं कधीतरी मी मेलो किंवा सोनाली गेली तर सॉरी म्हणताच येणार नाही. त्यावर सोनाली म्हणाली की तुला हे समजायला 10 वर्ष लागली पण ठिक आहे निदान तुला हे कळलं तरी. त्यानंतर आमची मैत्री अधिकच घट्ट होत गेली. सिद्धार्थबद्दल सांगताना सोनाली म्हणाली की, तो माझा सहकलाकर आणि खूप जास्त जवळचा मित्र देखील आहे, सिद्धार्थ आणि मी आम्ही अतिशय निर्लज्ज मित्र आहोत. निदान 10 वर्षांनी का होईना आम्ही अजून खूप चांगले मित्र झालो असं सोनालीने सांगितलं. ‘

सालबर्डी’तील ‘मंजुळा’ गाण्यात सोनाली कुलकर्णीचा हटके अंदाज; जाणून घ्या कधी होणार प्रदर्शित?

‘सालबर्डी’ सिनेमात सोनाली मंजुळा या आयटम साँगमधून एका वेगळ्याच लुकमध्ये प्रेक्षकांना दिसणार आहे. खरंतर अप्सरा आली या गाण्याने सोनालीला एक वेगळी ओळख दिली असली तरी, तिच्या आयटम साँगना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला. ‘सालबर्डी’च्या आधीदेखील सोनालीने ‘हाय काय नाय काय’ सिनेमात ‘देही वणवा पिसाटला’ आणि ‘टाईमपास 2’ या सिनेमात ‘मदन पिचकारी’ या आयटम साँगवर अनेकांचे पाय थिरकले. तिच्या या नव्या गाण्याला देखील प्रेक्षक दाद देखील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Marathi Serial : लक्ष्मी निवास मालिका संपणार ? नव्या मालिकेच्या वेळेबाबत झी मराठी वाहिनीचा मोठा निर्णय

Web Title: Siddharth jadhav didnt speak to me for 10 years actress share memory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • marathi actress
  • siddharth Jadhav
  • sonalee kulkarni

संबंधित बातम्या

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग
1

Akshaya Naik: कलेतून केली बाप्पाची सेवा; मालवणीतील मुलांसाठी अक्षया नाईकचे क्लाऊनिंग प्रयोग

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं
2

Hruta Durgule: बाइक राईड, समुद्र अन् मोकळं आकाश; हृताच्या ‘फुलपाखरू’ गाण्याने जिंकली मनं

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं
3

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
4

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.