Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ila Bhate: अजरामर व्यक्तिरेखा आणि अभिनयाचा समृद्ध वारसा! इला भाटेंचा झी मराठीकडून जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

Ila Bhate: इला भाटे यांचा प्रदीर्घ अभिनयप्रवास, चिन्मयी साळवीचा पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार आणि ‘सनई चौघडे’च्या टीमचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा सन्मान अशा अनेक खास क्षणांनी झी मराठी अवॉर्ड्स २०२६चा सोहळा कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही संस्मरणीय ठरला.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 02, 2026 | 02:13 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Ila Bhate : मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे यांना झी मराठी अवॉर्ड्स २०२६मध्ये प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अनेक दशकांचा अभिनयप्रवास, सहजसुंदर अभिनय, प्रभावी आवाज आणि अजरामर व्यक्तिरेखांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. हा पुरस्कार स्वीकारताना आपल्या आजवरच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत त्या भावुक झाल्या. विशेषतः हा आनंदाचा क्षण पाहण्यासाठी आई हवी होती, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

इला भाटे यांनी आपल्या अभिनयातून अनेक पिढ्यांशी नातं जोडलं. ‘असंभव’मधील वसुधा शास्त्री, ‘का रे दुरावा’मधील आऊ, ‘राधा ही बावरी’मधील डॉ. सई प्रधान अशा विविध व्यक्तिरेखांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’मधील ‘घना’साठी मारलेली हाकही प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. त्यांच्या व्यक्तिरेखांमध्ये अनेकांना आई, आजी किंवा घरातील एखादी हक्काची व्यक्ती दिसली. त्यामुळेच त्यांच्या अभिनयाचा आणि माणुसकीचा ठसा प्रेक्षकांच्या मनावर उमटला आहे.

अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी इला भाटे यांनी शैक्षणिक क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला होता. मात्र, रंगभूमीने त्यांना आपल्याकडे खेचून घेतलं. सुरुवातीच्या काळात त्यांच्या आवाजावर टीकाही झाली. मात्र, डॉ. अशोक रानडे यांचे ‘शब्दांशी खेळा, त्यावर प्रेम करा. शब्द हे अभिनयाचं गर्भारूप आहे’ हे मार्गदर्शन त्यांनी लक्षात ठेवलं. याच आवाजाला त्यांनी स्वतःची ओळख बनवलं आणि आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली.

जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना इला भाटे भावुक

झी मराठी अवॉर्ड्स २०२६मध्ये जीवनगौरव पुरस्कार स्वीकारतानाच्या भावना व्यक्त करताना इला भाटे म्हणाल्या, “जेव्हा मी स्टेजवर हा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारला आणि माझ्या आजवरच्या प्रवासाचा व्हिडिओ पाहत होते, तेव्हा मन आनंद, समाधान आणि कृतज्ञतेने भरून गेलं होतं. एवढी वर्षं आपण काम केलं, याचं मलाच आश्चर्य वाटत होतं. माझ्या गुरूंनी नेहमी सांगितलं होतं की, सातत्याने काम करत राहा. त्या क्षणी त्यांच्या शब्दांची आठवण झाली. माझ्या या प्रवासात ज्यांनी ज्यांनी मला साथ दिली, त्या सगळ्यांची आठवण झाली आणि मी मनोमन त्यांना नमस्कार केला.”

पुढे त्या म्हणाल्या, “या सगळ्या भावनांमध्ये सगळ्यात जास्त आठवण आली ती माझ्या आईची. हा क्षण पाहण्यासाठी आज माझी आई हवी होती, असं मनापासून वाटलं. जीवनगौरव पुरस्कार म्हणजे आजवर केलेल्या कामाची पोचपावती, प्रेक्षकांची पसंती आणि त्यांच्याकडून मिळालेली शाबासकी आहे. पण त्याचबरोबर यापुढेही असंच चांगलं काम करत राहण्याची अपेक्षा आणि त्यासाठी मिळणारी नवी ऊर्जा आहे.”

सध्या इला भाटे झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेत आजीची महत्त्वाची भूमिका साकारत आहेत. या भूमिकेला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं. भूतकाळातील कामाबरोबरच वर्तमानात काय करत आहोत आणि भविष्यात काय करू शकतो, हेही महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी

चिन्मयी साळवीला पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

‘सनई चौघडे’ मालिकेत शर्वरीची भूमिका साकारणाऱ्या चिन्मयी साळवीने झी मराठी अवॉर्ड्स २०२६मध्ये पहिल्यांदाच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. हा पुरस्कार मिळाल्यानंतरचा आनंद व्यक्त करताना ती म्हणाली, “एका मोठ्या मंचावर आपल्या कामाची दखल घेतली जातेय, याचा आनंद होता. त्याचबरोबर मनात उत्सुकता आणि थोडी धाकधूकही होती. ‘सनई चौघडे’ या मालिकेला आणि माझ्या भूमिकेला प्रेक्षकांचं जे प्रेम मिळत आहे, त्यामुळे हा अनुभव आणखी खास झाला.”

लहानपणापासून पुरस्कार सोहळे पाहताना एक दिवस आपणही अशा मंचावर नृत्य सादर करावं, असं तिला वाटायचं. यंदा झी मराठीमुळे तिचं हे स्वप्न पूर्ण झालं. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची ट्रॉफी हातात घेतल्यानंतर आजवरचा प्रवास डोळ्यांसमोर आल्याचंही तिने सांगितलं.

ट्रॉफी घरी घेऊन गेल्यानंतर कुटुंबीयांनी केलेल्या स्वागताची आठवण सांगताना चिन्मयी म्हणाली, “मी ट्रॉफी घेऊन घरी गेले, तेव्हा माझे काका, बाबा, काकी, आई, भाची, दादा आणि वहिनी या सगळ्यांनी माझं खूप छान स्वागत केलं. सगळे नाचत होते. अगदी ट्रॉफी डोक्यावर घेऊनही नाचत होते! ते पाहून मला खूप आनंद झाला. खरं सांगायचं तर, पुरस्कार मिळाल्याचा आनंद होताच; पण माझ्या घरच्यांचा आनंद पाहून मला त्याहून जास्त आनंद झाला.”

हा पुरस्कार तिने आपल्या कुटुंबीयांसह ‘सनई चौघडे’च्या संपूर्ण टीमला आणि तिच्यावर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांना समर्पित केला.

राज हंचनाळेसाठी १० बाय १० च्या खोलीत पाहिलेलं स्वप्न पूर्ण

‘सनई चौघडे’ मालिकेत जयची भूमिका साकारणाऱ्या राज हंचनाळेनेही या सोहळ्यातील अनुभव सांगितला. मालिकेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना तो म्हणाला, “झी मराठी अवॉर्ड्सचा अनुभव माझ्यासाठी खूपच सुंदर होता. या सोहळ्यामुळे अनेक जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. झी मराठीसोबतचं माझं नातं खूप जुनं आहे. २०१६ पासूनच्या आठवणी आणि आजवरचा संपूर्ण प्रवास माझ्या डोळ्यांसमोर आला. अशा मोठ्या सोहळ्याचा भाग होता येणं ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.”

पुढे तो म्हणाला, “मुंबईतील एका १० बाय १० च्या खोलीत राहून पाहिलेलं स्वप्न आज पूर्ण झाल्यासारखं वाटलं. मराठी मनोरंजनविश्वातील इतक्या दिग्गज कलाकारांसमोर सादरीकरण करणं हा खूपच उत्साहाचा अनुभव होता. माझ्यासाठी सगळ्यात खास क्षण म्हणजे ‘सनई चौघडे’ मालिकेला मिळालेला सर्वोत्कृष्ट मालिकेचा पुरस्कार. इतक्या दिवसांपासून संपूर्ण टीम घेत असलेल्या मेहनतीचं चीज झालं, असं वाटलं.”

इला भाटे यांचा प्रदीर्घ अभिनयप्रवास, चिन्मयी साळवीचा पहिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार आणि ‘सनई चौघडे’च्या टीमचा सर्वोत्कृष्ट मालिकेचा सन्मान अशा अनेक खास क्षणांनी झी मराठी अवॉर्ड्स २०२६चा सोहळा कलाकारांसाठी आणि प्रेक्षकांसाठीही संस्मरणीय ठरला.

Zee Marathi Awards 2026: ‘सनई चौघडे’ मालिकेने मारली बाजी! झी मराठी पुरस्कार २०२६ मध्ये कोण ठरलं सर्वोत्कृष्ट? वाचा संपूर्ण यादी

Web Title: Ila bhate zee marathi awards 2026 jeevan gaurav puraskar ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • zee marathi

संबंधित बातम्या

Ranbir Kapoor :‘भारताने हे ५ हजार वर्षांपूर्वीच’, एलन मस्कच्या फ्लाइंग कारची पुष्पक विमानाशी तुलना; रणबीरच्या वक्तव्याची चर्चा
1

Ranbir Kapoor :‘भारताने हे ५ हजार वर्षांपूर्वीच’, एलन मस्कच्या फ्लाइंग कारची पुष्पक विमानाशी तुलना; रणबीरच्या वक्तव्याची चर्चा

Phulwara Teaser: घुंगरांचा नाद अन् मातीचा सुगंध! महाराष्ट्राच्या लावणीची झलक दाखवणारा ‘फुलवरा’चा टीझर प्रदर्शित
2

Phulwara Teaser: घुंगरांचा नाद अन् मातीचा सुगंध! महाराष्ट्राच्या लावणीची झलक दाखवणारा ‘फुलवरा’चा टीझर प्रदर्शित

Ulhas Kamathe: ‘चिकन लेग पीस’ वाल्या उल्हास कामटेचं निधन? हार्ट अटॅकच्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य आलं समोर
3

Ulhas Kamathe: ‘चिकन लेग पीस’ वाल्या उल्हास कामटेचं निधन? हार्ट अटॅकच्या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य आलं समोर

Amitabh Bachchan: बुलेटप्रूफ काचेच्या आडून बिग बींचा चाहत्यांना नमस्कार, वडिलांच्या सुरक्षेसाठी अभिषेक बच्चनही ‘जलसा’बाहेर
4

Amitabh Bachchan: बुलेटप्रूफ काचेच्या आडून बिग बींचा चाहत्यांना नमस्कार, वडिलांच्या सुरक्षेसाठी अभिषेक बच्चनही ‘जलसा’बाहेर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.