Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी नंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणार सोनाली कुलकर्णी, ‘मलाइकोट्टाई वालिबान’ मधील लूक आला समोर; मोहनलालसोबत स्क्रीन करणार शेअर!

राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित 'मलाइकोट्टाई वालिबान' या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 02, 2024 | 05:11 PM
मराठी नंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी गाजवणार सोनाली कुलकर्णी, ‘मलाइकोट्टाई वालिबान’ मधील लूक आला समोर; मोहनलालसोबत स्क्रीन करणार शेअर!
Follow Us
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या चर्चेत आह. तिच्या आगामी चित्रपट “मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी” मार्चमध्ये प्रदर्शित होणार आहे. सोशल मीडियावर सध्या तिच्या नव्या लूकची चर्चा चालू आहे. हा लूक तिच्या आगामी मराठी चित्रपटातला नसून एका मल्याळम चित्रपटातील आहे. मराठी सिनेसृष्टीत आपलं अभिनय कौशल्य दाखवल्यानंतर आता सोनाली दाक्षिणात्य चित्रपटातून आपली अदाकारी दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

[read_also content=”अभिनेता अंजिक्य ननावरे आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे अडकले लग्नबंधनात, सोशल मीडियावर फोटो शेअर सेलेब्रिटिंसह चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव https://www.navarashtra.com/movies/actress-shivanisurve-ties-the-knot-with-actor-ajinkya-nanaware-nrps-503976.html”]

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नुकतचं तिनं तिच्या सोशल मीडिया अंकाऊटवरुन तिच्या नव्या चित्रपटाचं लूक शेअर केला आहे. ही मराठमोळी अभिनेत्री आता दाक्षिणात्य चित्रपटात आपलं नृत्यकौशल्य दाखवणार आहे.  राष्ट्रीय पुरस्कार विजेते लिजो जोस पल्लीसरी दिग्दर्शित ‘मलाइकोट्टाई वालिबान’ (Malaikottai Vaaliban) या चित्रपटातून सोनाली मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. यात सोनाली सुपरस्टार मोहनलाल (Mohanlal) यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटातील एका गाण्याच्या माध्यमातून तिचा फर्स्ट लूक प्रेक्षकांसमोर आला असून या फ्युजन लावणीत सोनालीची बहारदार अदा पाहायला मिळत आहे. आपल्या मनमोहक नृत्यदाकारीने सोनाली दक्षिणेतील प्रेक्षकांनाही घायाळ करणार असून महाराष्ट्राची ओळख असलेले लावणी नृत्य आता सोनाली दक्षिणात्य चित्रपटात गाजवणार आहे.

 

याबाबत सोनाली म्हणाली की, ” हा माझा पहिलाच मल्याळम चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात अशा दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, खूप आनंदाची गोष्ट आहे. आज या गाण्याच्या माध्यमातून माझ्या लूकवरील पडदा अखेर उठला आहे. जगभरात प्रदर्शित होणारा हा चित्रपट तामिळ, तेलुगू, कन्नड मध्ये २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे तर त्याच्या पुढील आठवड्यात हिंदी भाषेत प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट युके, युएस, कॅनडासह अनेक देशांमध्ये प्रदर्शित होणार असून कॅनडामध्ये प्रदर्शित होणारा हा पहिला भव्य प्रादेशिक चित्रपट आहे. माझ्यासाठी हा एक खास अनुभव आहे. प्रेक्षक मला या नवीन व्यक्तिरेखेत स्वीकारतील, याची खात्री आहे.”

Web Title: Sonali kulkarni will act in malayalam movie sharing screen with actor mohanlal nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 02, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • entertainment

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.