Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘वेड’ चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या निमित्ताने स्टार प्रवाहचा आगळावेगळा विक्रम, थेट गिनीज बुकमध्ये झाली नोंद

‘वेड’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं. सत्या आणि श्रावणीच्या लव्हस्टोरीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. याच प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला.

  • By साधना
Updated On: Aug 10, 2023 | 07:31 PM
star pravah guinness world record

star pravah guinness world record

Follow Us
Close
Follow Us:

स्टार प्रवाह वाहिनीने विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ‘मराठी परंपरा मराठी प्रवाह’ हे ब्रीदवाक्य जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने आता संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. येत्या 20 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता ब्लॉकबस्टर ‘वेड’ चित्रपटाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. याच सिनेमाच्या निमित्ताने स्टार प्रवाहने एक अनोखा विक्रम रचला आहे.

स्टार प्रवाहच्या या विक्रमाची नोंद प्रतिष्ठित गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस मध्ये करण्यात आली आहे. अभिनेता रितेश देशमुख यांच्या उपस्थितीत हा अनोखा विक्रम रचण्यात आला. ‘वेड’ सिनेमाला बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळालं. सत्या आणि श्रावणीच्या लव्हस्टोरीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं. याच प्रेमाची साक्ष देणाऱ्या भव्यदिव्य हृदयाची कलाकृती साकारून जागतिक विक्रम रचण्यात आला.

तब्बल 1446 छत्र्यांचा वापर करून साकारली कलाकृती
ही भव्यदिव्य कलाकृती साकारण्यासाठी तब्बल 1446 छत्र्यांचा वापर करण्यात आला. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर ही कलाकृती आकारास आली आहे. मराठी सिनेमा आणि मराठी वाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रयोग करण्यात आला आहे.

‘वेड’ सिनेमात सत्या आणि श्रावणीचं छत्रीसोबत वेगळं नातं
‘वेड’ सिनेमात सत्या आणि श्रावणीचं छत्रीसोबत एक वेगळं नातं आहे. त्यामुळेच गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस साठी सुद्धा छत्रीची निवड करण्यात आली. रितेश देशमुख यांनी या कलाकृतीतील अखेरची छत्री स्वहस्ते ठेऊन गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड पूर्णत्वास नेला.

स्टार प्रवाहने ‘वेड’ सिनेमाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर निमित्ताने रचलेला हा विक्रम कौतुकास्पद आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच असा प्रयोग करण्यात आला आहे. स्टार प्रवाह वाहिनीने दिलेल्या या मौल्यवान क्षणांबद्दल मी आणि जिनिलिया आभारी आहोत, अशा शब्दात रितेश देशमुखने आपल्या भावना व्यक्त केल्या.

स्टार प्रवाहचे बिझनेस हेड सतीश राजवाडे म्हणाले, मराठी सिनेमा हा प्रत्येक मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ‘वेड’ सिनेमाने प्रेक्षकांना खरंच वेड लावून दमदार कमाई केली ही या सिनेमाची ताकद आहे. स्टार प्रवाह वाहिनी मराठी परंपरा राखण्याचा कायम प्रयत्न करते आणि म्हणूनच स्टार प्रवाह या महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर महाराष्ट्राचा नंबर वन सिनेमा 20 ऑगस्टला घेऊन येतोय. या सिनेमासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डस रचत स्टार प्रवाह याअग्रगण्य वाहिनीने जगाच्या नकाशावर नाव कोरलं आहे.

प्रेक्षकांना ‘वेड’ सिनेमा रविवार 20 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता स्टार प्रवाहवर आणि 27 ऑगस्टला रात्री 8 वाजता हिंदीमध्ये स्टार गोल्डवर पाहता येणार आहे.

Web Title: Star pravah guinness world record before ved movie premier nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2023 | 07:28 PM

Topics:  

  • Entertainment News
  • star pravah

संबंधित बातम्या

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News
1

Armaan Malik 5 व्या वेळी होणार बाबा? युट्युबरच्या पत्नीने केली पोस्ट शेअर; दिली Good News

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन
2

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन

‘19 व्या वर्षी मला शब्दांना आवर घालायला हवी होती…’ मृणाल ठाकूरने मागितली बिपाशा बासूची माफी, काय आहे प्रकरण
3

‘19 व्या वर्षी मला शब्दांना आवर घालायला हवी होती…’ मृणाल ठाकूरने मागितली बिपाशा बासूची माफी, काय आहे प्रकरण

अर्चना पुरण सिंहच्या मोठ्या मुलाने आर्यमनने योगिता बिहानीसह केला साखरपुडा, Live In मध्ये राहणार दोघे; संपूर्ण घर भावूक
4

अर्चना पुरण सिंहच्या मोठ्या मुलाने आर्यमनने योगिता बिहानीसह केला साखरपुडा, Live In मध्ये राहणार दोघे; संपूर्ण घर भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.