Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय सांगता! IPL 2025 मध्ये पाहायला मिळणार ‘हेरा फेरी ३’चा टीझर; सुनील शेट्टीने दिल्या महत्वाच्या अपडेट्स

'केसरी वीर' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'च्या टीझरबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. अभिनेता सुनील शेट्टीने एका मुलाखतीत 'हेरा फेरी ३'च्या टीझरबद्दल चाहत्यांना पूर्णपणे माहिती दिली आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: May 06, 2025 | 07:45 AM
(फोटो सौजन्य - Instagram)

(फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:

अक्षय कुमार, परेश रावल, सुनील शेट्टी या त्रिकूटाच्या अफलातून कॉमिक टायमिंगने सजलेला ‘हेरा फेरी’ आणि ‘फिर हेरा फेरी’ हे दोन्हीही चित्रपट चांगलेच गाजले. आता प्रेक्षकांना आतुरता आहे, ती ‘हेरा फेरी ३’ची… ‘हेरा फेरी’चं दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी तर ‘फिर हेरा फेरी’चं दिग्दर्शन नीरज वोरा यांनी केलं होतं. पण ‘हेरा फेरी ३’चं दिग्दर्शन पुन्हा एकदा दिग्दर्शक प्रियदर्शन करणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते, ‘हेरा फेरी ३’ची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, आता अभिनेता सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी ३’बद्दल एक महत्वाची अपडेट दिली आहे.

मनोरंजनाचा डोस घेऊन येत आहे ‘आंबट शौकीन, कलाकारांची फौज करणार डबल मनोरंजन; पोस्टर रिलीज…

सध्या अभिनेता सुनील शेट्टी आणि सुरज पांचोली ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या निमित्त प्रमोशनमध्ये व्यग्र असून हा चित्रपट येत्या १६ मे रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. ‘केसरी वीर’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी ३’च्या टीझरबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. अभिनेता सुनील शेट्टीने अमर उजाला दिलेल्या मुलाखतीत ‘हेरा फेरी ३’च्या टीझरबद्दल चाहत्यांना पूर्णपणे माहिती दिली आहे. मुलाखतीत सुनील शेट्टी ने सांगितले की, “आम्ही चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात केली असून टीझरही शूट केला आहे. आयपीएलदरम्यान हा टीझर प्रदर्शित होण्याची अपेक्षा आहे आणि हो, मी खूप उत्साहित आहे, कारण तीच टीम आहे. हा चित्रपट नेहमीच इतर चित्रपटांपेक्षा वेगळा राहिला आहे.”

अभिजित सावंतच्या ‘चाल तुरु तुरु’ गाण्याची सोशल मीडियावर तुफान क्रेझ, काही दिवसांतच मिळाले लाखो व्ह्यूज

मुलाखतीत सुनील शेट्टीने शूटिंग सेटवरील वातावरणाबद्दल बोलताना सांगितले की, “जेव्हा आम्ही तिघे (अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल) एकत्र येतो तेव्हा सेटवरील वातावरण मजेशीर असतं. खरे सांगायचे तर तिथे एक वॉर्निंग देणारा बोर्ड लावला पाहिजे, कारण आम्ही तिघे सोबत असलो की सेटवरील वातावरण बदलते. प्रियदर्शन सर नेहमीच बोलतात ती, जर तुम्हाला तिघांना मजा- मस्ती करायची असेल तर शुटिंगनंतर करा.” ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांना अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या त्रिकुटाची जोडी पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट प्रियदर्शन दिग्दर्शित करत आहेत, ज्यांनी २००० मध्ये पहिला हेरा फेरी बनवला होता.

नवाजुद्दीन सिद्दिकीने बॉलिवूडला राम राम ठोकला? केली थेट पोलखोल

‘हेरा फेरी ३’ची वर्षानुवर्षे वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. या चित्रपटाबद्दल बऱ्याच काळापासून अनेक अफवा आणि विलंब होत होता. पण आता कलाकार आणि दिग्दर्शक एकत्र काम करत आहेत. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या अपडेटचा अर्थ असा की, चित्रपटाची रिलीज तारीख देखील लवकरच जाहीर केली जाईल. चित्रपट कधी प्रदर्शित होईल याची प्रत्येकाला उत्सुकता आहे.

Web Title: Suniel shetty gives update on hera pheri 3 akshay kumar film teaser release during ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 07:45 AM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Bollywood
  • bollywood movies
  • Bollywood News

संबंधित बातम्या

“ती पाणी मागत राहिली…” शेवटच्या क्षणी आईला पाणी देऊ शकला नाही ‘हा’ अभिनेता; म्हणाला,”आठवणी अजूनही…”
1

“ती पाणी मागत राहिली…” शेवटच्या क्षणी आईला पाणी देऊ शकला नाही ‘हा’ अभिनेता; म्हणाला,”आठवणी अजूनही…”

देसी गर्लचा ग्लॅमर! प्रियांकाची पांढऱ्या लेहेंग्यातील स्टायलिश एन्ट्री व्हायरल, हात जोडून केले ‘नमस्ते’
2

देसी गर्लचा ग्लॅमर! प्रियांकाची पांढऱ्या लेहेंग्यातील स्टायलिश एन्ट्री व्हायरल, हात जोडून केले ‘नमस्ते’

Dharmendra यांच्या प्रकृतीत सुधार; हेमा मालिनी पतीच्या ९० व्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त
3

Dharmendra यांच्या प्रकृतीत सुधार; हेमा मालिनी पतीच्या ९० व्या वाढदिवसाच्या तयारीत व्यस्त

De De Pyaar De 2 ‘ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? अजय देवगण Thamma चा विक्रम मोडू शकेल का?
4

De De Pyaar De 2 ‘ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? अजय देवगण Thamma चा विक्रम मोडू शकेल का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.