Nawazuddin Siddiqui Birthday: एकेकाळी वॉचमनची नोकरी करायचा नवाजुद्दीन सिद्दीकी, बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्यासाठी करावा लागला १५ वर्षे संघर्ष
अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकी बॉलिवूडच्या अष्टपैलू कलाकारांपैकी एक आहे. अभिनेत्याने आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मन जिंकले. सध्या झी ५ वरील कोस्टाओ (Costao) चित्रपटामुळे चर्चेत राहिलेल्या अभिनेत्याने एक मुलाखत दिली आहे. नवाझुद्दीन सिद्दीकी स्टारर कोस्टाओ चित्रपट १ मे रोजी ओटीटीवर रिलीज झाला आहे. प्रमोशनदरम्यान अभिनेता सध्या मुलाखत देत आहे. मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने बॉलिवूडची पोलखोल केली आहे. बॉलिवूडच्या कंटेंटवर त्याने भाष्य केलं आहे.
“मुक्कम पोस्ट देवाच घर” हा पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला ठरला पहिला मराठी चित्रपट!
पूजा तलवारला दिलेल्या मुलाखतीत नवाझुद्दीन सिद्दीकी म्हणाला की, ” बॉलिवूड इंडस्ट्री खूप असुरक्षित होत चालली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक वर्ष एकाच धाटणीचे चित्रपट बनवले जातात. त्या आशयाचे चित्रपटपाहून प्रेक्षकवर्ग बोअर होत नाहीत, तोपर्यंत हा प्रकार चालूच असतो. एखादा चित्रपट चालला की, तो चित्रपट चालला म्हणून पुढे लोक तसाच चित्रपट पुन्हा बनवतात. कारण त्यांना हा चित्रपटही चालेल असं वाटत असतं. याचं प्रमाण खूप वाढलं आहे, त्यामुळे लोकांना हा एक फॉर्मुला वाटतो आणि मग सगळे हाच फॉर्मुला वापरतात. त्याहूनही दयनीय गोष्ट म्हणजे आता इंडस्ट्रीमध्ये सीक्वेल्स करायला सुरुवात केली आहे.”
पुढे मुलाखती दरम्यान नवाझुद्दीन सिद्दीकीने सांगितले की, “इंडस्ट्रीमध्ये क्रिएटिव्हीटीची फार कमी आहे. सुरुवातीपासूनच इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर चोरी केले जाते. पूर्वी गाण्यांची चोरी केली, नंतर कथानक चोरलं आणि आता यात भर म्हणून चित्रपटांचे मोठ्या प्रमाणात सिक्वल काढले जात आहेत. चोर म्हटल्यावर ते थोडी क्रिएटिव्हीटी कुठून आणू शकणार आहेत का? आम्ही कधी टॉलिवूडकडून ही गोष्ट चोरली, कधी इथून गोष्ट चोरली, तर कधी तिखून ती गोष्ट चोरली. अनेकदा साऊथच्या चित्रपटांतून बॉलिवूडने गाजलेले सीन्स इकडे रिमेक केले. रिमेकच्या गोष्टीला इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणावर हलक्यात घेतलं जातं.” मुलाखतीच्या शेवटी अभिनेत्याने वैतागून बॉलिवूडला राम राम केल्याचं म्हटलं आहे.