Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूर्णपणे खचून गेल्यानंतर पुन्हा नव्याने कशा उभ्या राहिल्या? सुरेखा कुडचींनी सांगितला कठीण काळातला अनुभव…

सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नवरात्री उत्सवानिमित्त त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सगळ्यांसोबत शेअर केला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 23, 2025 | 05:17 PM
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Close
Follow Us:

नवरात्री म्हणजे स्त्रीशक्ती, धैर्य आणि प्रेरणेचं प्रतीक. या नऊ दिवसांत देवीच्या विविध रूपांची आराधना करताना प्रत्येक महिलेला आपलं सामर्थ्य जाणवतं. प्रत्येक स्त्री मध्ये एक नवदुर्गा दडलेली असते कठीण प्रसंगावेळी स्त्रीमधील शक्ती त्या प्रसंगाशी सामना करते. ‘सन मराठी’ वरील ‘जुळली गाठ गं’ या मालिकेत दामिनी मुजुमदार हे पात्र साकारणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री सुरेखा कुडची यांनी नवरात्री उत्सवानिमित्त त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला आहे.

‘चंद्रघंटा देवी माझ्या स्वभावाशी जुळणारी आहे’ अभिनेत्री शिवानी सोनारने देवीशी स्वतःची तुलना का केली?

अभिनेत्री सुरेखा कुडची म्हणाल्या की, “सर्वप्रथम प्रेक्षकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! नवरात्री म्हंटल की एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. प्रत्येक स्त्रीमध्ये प्रचंड शक्ती असते. कठीण प्रसंगाला कसं सामोरं जायचं आणि कुटुंबाचं रक्षण कसं करायचं हे तिला उत्तम ठाऊक असतं. स्त्री स्वतःसाठी कमी आणि कुटुंबासाठी जास्त जगते, त्यामुळे माझा प्रत्येक स्त्रीला तिच्या सामर्थ्याला सलाम आहे. माझ्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण ज्याने मला नव्याने जगायला शिकवलं तो प्रसंग म्हणजे माझ्या पतीचं निधन. त्या क्षणी मी खूप खचून गेले. हातात अडीच वर्षांची मुलगी आणि पतीचं जाणं सहन करणं खूप कठीण होतं. प्रत्येक स्त्रीसाठी पुरुषाचा आधार महत्त्वाचा असतो. मी स्वतःच्या पायावर उभी होते, तरीही सोबतीची उणीव जाणवत होती. त्या प्रसंगातून बाहेर पडायला मला जवळपास सहा महिने लागले. त्या काळात माझ्या कुटुंबाने खूप आधार दिला. माझ्या बहिणीने सांगितलं, ‘पुन्हा कामाला सुरुवात कर, आता तुला तुझ्या मुलीसाठी खंबीर राहावं लागेल.’ त्यानंतर मी नव्या जोमाने काम सुरू केलं.”

‘तुझी मेहनत, अभ्यास, भूमिका या पलीकडे तुझ्या संवेदना…’ वीणा जामकरची दिग्दर्शक विजय कलमकरसाठी खास पोस्ट

यापुढे त्या म्हणाल्या की, “मी स्वामींना एकच प्रार्थना केली की, माझ्या मुलीला कधीच काही कमी पडू नये. पैशाअभावी काही देता आलं नाही असं तिला कधी म्हणावं लागू नये, हीच माझी इच्छा होती. आजही तिचं शिक्षण सुरु आहे आणि आमच्यावर स्वामींची कृपा आहे असं मी मानते. नवरात्रीच्या निमित्ताने मला माझ्या सखी-मैत्रिणींना एवढंच सांगावसं वाटतं, स्वतःच्या पायावर उभं राहा. किमान स्वतःचा खर्च भागवू शकाल इतकं तरी काम नक्की करा. आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.”

Web Title: Surekha kudchi shares her experience during a difficult time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 05:17 PM

Topics:  

  • marathi actress
  • marathi serial news
  • Navratri 2025

संबंधित बातम्या

Soham Bandekar Kelvan Video: लगीनघाई! आणि तो क्षण आलाच…सुचित्रा बांदेकरांच्या लेकाचे थाटात पार पडले पहिले केळवण
1

Soham Bandekar Kelvan Video: लगीनघाई! आणि तो क्षण आलाच…सुचित्रा बांदेकरांच्या लेकाचे थाटात पार पडले पहिले केळवण

Movie Trailer: ‘लास्ट स्टॉप खांदा’तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा, चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित
2

Movie Trailer: ‘लास्ट स्टॉप खांदा’तून उलगडणार प्रेमाचा इमोशनल कॉमेडी ड्रामा, चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत नवीन भूमिकेचे नाव केले उघड
3

तेजश्री प्रधानची पोस्ट चर्चेत; फोटो शेअर करत नवीन भूमिकेचे नाव केले उघड

New Serial: ‘मी संसार माझा रेखिते’, नात्यांच्या गुंतागुंतीतून उमटणारी प्रेम आणि एकतेची गोष्ट, लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटी
4

New Serial: ‘मी संसार माझा रेखिते’, नात्यांच्या गुंतागुंतीतून उमटणारी प्रेम आणि एकतेची गोष्ट, लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.