Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे…”, मराठमोळ्या अभिनेत्याने कोल्हापुरी भाषेत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मांडलं मत, Video

सामाजिक विषयावर आपलं परखड मत मांडणाऱ्या स्वप्नील राजशेखर यांनी रस्त्यावरील खड्ड्यावर आपलं मत मांडलं आहे. रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीच्या समस्या, ट्राफिकसह वेगवेगळ्या गोष्टींवर अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला.

  • By चेतन बोडके
Updated On: Jan 07, 2025 | 05:32 PM
"प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे...", मराठमोळ्या अभिनेत्याने कोल्हापुरी भाषेत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मांडलं मत, Video

"प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे...", मराठमोळ्या अभिनेत्याने कोल्हापुरी भाषेत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मांडलं मत, Video

Follow Us
Close
Follow Us:

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांची मन जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. मालिकेतल्या अधिपती, अक्षरा, भुवनेश्वरी आणि अधिपतीच्या वडिलांसह प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यामध्ये अधिपतीच्या वडिलांची भूमिका अभिनेते स्वप्नील राजशेखर साकारत आहेत. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारे स्वप्नील राजशेखर सध्या त्यांच्या उपरोधिक विधानामुळे चर्चेत आले आहेत.

मराठमोळ्या अभिनेत्याचं नाटक पाहण्यासाठी आला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’! भलीमोठी पोस्ट लिहित सांगितला अनुभव

सामाजिक विषयावर आपलं परखड मत मांडणाऱ्या स्वप्नील राजशेखर यांनी रस्त्यावरील खड्ड्यावर आपलं मत मांडलं आहे. कलाकार म्हटल्यावर नेहमीच कायमच रोडवरील प्रवास आलाच. त्यातल्या त्यात रोडवरील प्रवास म्हटल्यावर रस्त्यावरील खड्डे, वाहतुकीच्या समस्या, ट्राफिकसह वेगवेगळ्या गोष्टी आल्याच. याच सर्व गोष्टींचा आधार घेत अभिनेता स्वप्नील राजशेखर यांनी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. अभिनेते स्वप्नील राजशेअर यांनी प्रवास करतानाचा व्हिडीओ शेअर करत रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत आपलं मत काहीशा वेगळ्या अंदाजात आणि कोल्हापुरी भाषेत मांडलं आहे.

 

एक खून अनेक आरोपी, सुभेदारांच्या जावयाच्या हत्येचं रहस्य उलगडणार; ‘जिलबी’चा जबरदस्त ट्रेलर भेटीला

शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये स्वप्नील राजशेखर म्हणतात, “काहीजण रोज उठून रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या नावाने बोटं मोडणाऱ्यांना त्या सगळ्यांना मला एक सांगायचंय, अहो… वर्षानुवर्षे, महिनोंमहिने हे सगळे खड्डे जपलेत, राखलेत हायवेला, शहरातले आणि गावातले ते काही उगाचंच नाहीये. यामागे एक विचार आहे. तो विचार समजून घ्या. किती अशी माणसं आहेत हो… ज्यांचं अगदी बुळबुळीत रस्त्यासारखं आयुष्य आहे. तुमच्या-माझ्या रोजच्या जगण्यामध्ये कितीतरी खड्डे-डबरे येतात. महागडी गाडी खरेदी केलेली असते, हेल्थ विमा काढलेला असतो. दर महिन्याला याचा हफ्ता भरायचा असतो. दर वीकेंडला बायको-मुलांना घेऊन हिल स्टेशनला जावं लागतं, किती मोठा खड्डा पडतो. मावस मेहुणीला महागडं गिफ्ट द्यावं लागतं. आपलं पोरगं पहिलीतून दुसरीत जाताना इंग्रजी शाळेची फी भरावी लागते या सगळ्यात मागे हटून चालणार नाही… म्हणून हे खड्डे.”

“परवा आमचे एक आजोबा गेले असं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून लोक घरी घेऊन जात होते. वाटेत एक खड्डा आला, रुग्णवाहिका आदळली आणि आजोबा दाणकन् उठून बसले. गेलेला माणूस परत आला… लक्षात घ्या, एका माणसाचा जीव वाचला या खड्ड्यांमुळे… लोक उठतात आणि रस्ते बाद आहेत म्हणून शिव्या घालतात पण, आता आपणच समजलं पाहिजे… प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे म्हणून तो ठेवलाय.” अशी उपरोधिक पोस्ट शेअर करत अभिनेत्याने मत मांडलं आहे.

निस्तेज चेहरा अन् विस्कटलेले केस… डेंग्यू झाल्यानंतर टायगर श्रॉफला ओळखणंही झालं कठीण; पाहा Photo

स्वप्नील राजशेखर यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून अभिनेत्याला नेमकं काय म्हणायचंय, त्यांना काय सांगायचंय याचा मतितार्थ सर्वांनाच लक्षात आलेला आहे. त्यांचा हा कोल्हापुरी लहेजा अनेकांना भावला आहे.

Web Title: Swapnil rajshekhar tula shikvin changalach dhada fame actor shares post about road blockage and pathholes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 05:32 PM

Topics:  

  • marathi actor

संबंधित बातम्या

शशांक केतकरसाठी कलाकार एकवटले, ‘या’ निर्मात्याबद्दल अनेकांच्या तक्रारी, अभिनेत्री शिल्पा नवलकर; म्हणाल्या…
1

शशांक केतकरसाठी कलाकार एकवटले, ‘या’ निर्मात्याबद्दल अनेकांच्या तक्रारी, अभिनेत्री शिल्पा नवलकर; म्हणाल्या…

“पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना BLACKLIST…” आस्ताद काळेचा संताप; मराठी इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड
2

“पैसे बुडवणाऱ्या निर्मात्यांना BLACKLIST…” आस्ताद काळेचा संताप; मराठी इंडस्ट्रीतील काळं वास्तव उघड

शिवकालीन इतिहासाचा गौरवशाली अध्याय उलगडणार; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
3

शिवकालीन इतिहासाचा गौरवशाली अध्याय उलगडणार; ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Jay Dudhane Arrest:”मी माझ्या हनिमूनसाठी जात होतो…”, जय दुधाणेने अटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ”मी पळून जाणार…’
4

Jay Dudhane Arrest:”मी माझ्या हनिमूनसाठी जात होतो…”, जय दुधाणेने अटकेनंतर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, ”मी पळून जाणार…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.