Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, नवीन टिझर प्रदर्शित!

या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Mar 11, 2024 | 02:48 PM
महाराष्ट्र दिनी प्रदर्शित होणार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, नवीन टिझर प्रदर्शित!
Follow Us
Follow Us:

ज्यांच्या अवीट सुरांनी साऱ्यांनाच वेड लावले, ज्यांच्या ‘गीतरामायणा’ने प्रत्येक संगीतप्रेमीच्या मनात स्थान निर्माण केले, त्या बाबुजींचा आयुष्यपट लवकरच रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येत आहे. नुकताच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला असून एका प्रतिभाशाली आणि हरहुन्नरी गायकाचे जीवन या चित्रपटातून उलगडणार आहे. टीझरमध्ये ‘माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासात पदोपदी सोसलेल्या जाणिवेतून, ही आर्तता माझ्या स्वरात उतरते, असे एक वाक्य आहे. या वाक्यातूनच ‘बाबुजीं’च्या व्यक्तिमत्वाची ओळख होते.

[read_also content=”नीता अंबानींना समाजसेवेसाठी ‘मानवतावादी पुरस्कार’, मिस वर्ल्ड स्पर्धेत करण्यात आला सन्मान! https://www.navarashtra.com/movies/nita-ambani-honoured-with-beauty-with-a-purpose-humanitarian-award-in-miss-world-finals-nrps-514521.html”]

रिडिफाईन प्रॉडक्शन्स निर्मित, योगेश देशपांडे दिग्दर्शित या चित्रपटात सुनील बर्वे, आदिश वैद्य, शरद पोंक्षे, सागर तळाशीकर, मृण्मयी देशपांडे, अपूर्वा मोडक, अविनाश नारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद योगेश देशपांडे यांचे असून सौरभ गाडगीळ, योगेश देशपांडे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा चित्रपट १ मे अर्थात महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असून आजवरचा हा सर्वात मोठा स्वरमयी बायोपिक ठरेल.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ” एखाद्या नावाजलेल्या व्यक्तिमत्वाचा जीवनपट पडद्यावर दाखवणे नक्कीच सोपे नसते. त्यासाठी सखोल अभ्यास अत्यंत गरजेचा आहे. ‘बाबुजी’ हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व. मला त्यांचा जीवनपट पडद्यावर दाखवायचा होता. यासाठी मी जमेल तितकी त्यांच्याविषयी माहिती मिळवली. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेकांना मी भेटलो. त्यांच्याविषयी काही अशा गोष्टी कळल्या, ज्या अनेकांना माहित नाही. त्यांचे तेच आयुष्य मी पडद्यावर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची गाणी आपल्या सगळ्यांना माहित आहे, परंतु त्यामागचा संघर्ष खूप कठीण होता. त्यांचा हा प्रवास ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’मध्ये पाहायला मिळणार आहे.”

Web Title: Swargandharv sudhir phadkar second teaser out movie will release on 1 may nrps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2024 | 02:48 PM

Topics:  

  • entertainment
  • sunil barve

संबंधित बातम्या

Prahaar Movie Review: न्यायालयात डावपेच, आयुष्यात संघर्ष; राजकुमार रावसमोर मराठमोळ्या ललित प्रभाकरची ताकदीने भूमिका
1

Prahaar Movie Review: न्यायालयात डावपेच, आयुष्यात संघर्ष; राजकुमार रावसमोर मराठमोळ्या ललित प्रभाकरची ताकदीने भूमिका

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक
2

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत
3

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत

Abhijeet Sawant: २० वर्षांनंतर अभिजीत सावंत पुन्हा गाजवणार ‘इंडियन आयडॉल’चा मंच; ‘इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न’ कधी सुरू होणार?
4

Abhijeet Sawant: २० वर्षांनंतर अभिजीत सावंत पुन्हा गाजवणार ‘इंडियन आयडॉल’चा मंच; ‘इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न’ कधी सुरू होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.