Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील अभिनेत्री जेनिफरचा लैंगिक छळ, नक्की कोण आहे आरोपी?

जेनिफरने असित मोदीवर केवळ लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. असित मोदींशिवाय जेनिफरने प्रोजेक्ट हेड सोहिल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.

  • By साधना
Updated On: May 11, 2023 | 06:18 PM
jennifer mistry bansiwal

jennifer mistry bansiwal

Follow Us
Follow Us:

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आता या मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi) एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं (Jennifer Mistry Bansiwal) असित मोदी आणि मालिकेच्या टीममधील अन्य दोन व्यक्तींवर गंभीर आरोप केले आहेत. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं असित मोदी, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेचे प्रोजेक्ट हेड सोहिल रमानी आणि एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर जतिन बजाज यांच्यावर लैंगिक छळाचा (Sexual harassment) आरोप केला आहे.

लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफरने असित मोदीवर केवळ लैंगिक छळाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. असित मोदींशिवाय जेनिफरने प्रोजेक्ट हेड सोहिल रमाणी आणि कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. जेनिफर ही गेल्या 2 महिन्यांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे शूटिंग करत नव्हती. तिनं 6 मार्चपर्यंत शूटिंग केले.

एका मुलाखतीमध्ये जेनिफरनं सांगितलं, “होय, मी शो सोडला आहे. मी माझा शेवटचा एपिसोड 6 मार्च रोजी शूट केला. सोहिल आणि जतीन यांच्याकडून माझा अपमान झाल्यामुळे मला शो सोडावा लागला.”

पुढे जेनिफरनं सांगितलं,“मी त्यांना सांगितलं की मी 15 वर्षे काम केले आहे आणि तुम्ही मला जबरदस्तीने थांबवू शकत नाही. मी निघताना सोहिल मला धमकावत होता. मी असित मोदी, सोहिल रमानी आणि जतिन बजाज यांच्याविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला आहे.”

 प्रोडक्शन हेडने फेटाळले आरोप
दरम्यान ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे प्रोडक्शन हेड सोहिल रमानी यांनी जेनिफर मिस्त्री बंसीवालानं केलेले आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले, “हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. असा छळ होत असेल तर तिनं आधी ऑथोरिटीजकडे जायला पाहिजे होतं. आमच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये महिलांशी संबंधित सर्व समस्यांसाठी एक समिती आहे. ती तिथे तक्रार करू शकली असती. आम्ही सर्व आरोपांना कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. हा केवळ आमची, आमच्या शोची आणि आमच्या प्रॉडक्शन हाऊसची बदनामी करण्याचा डाव आहे.”

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah fame actress jennifer mistry complaint about sexual harrasment by asit modi and two others from serial team nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2023 | 06:15 PM

Topics:  

  • crime news
  • Entertainment News
  • Taarak Mehta Ka Ooltah Chashmah

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.