Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिग बजेट सिनेमांना टक्कर देत ‘रुखवत’ने दाखवली मराठी चित्रपटसृष्टीची ताकद, दोन दिवसांत किती कमाई केली?

तेजश्री प्रधानच्या 'तदैव लग्नम' चित्रपटाप्रमाणेच आता संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकरच्या 'रुखवत' चित्रपटालासुद्धा महाराष्ट्रात स्क्रिन्स उपलब्ध होत नाहीयेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Dec 29, 2024 | 02:21 PM
बिग बजेट सिनेमांना टक्कर देत ‘रुखवत’ने दाखवली मराठी चित्रपटसृष्टीची ताकद, दोन दिवसांत किती कमाई केली?

बिग बजेट सिनेमांना टक्कर देत ‘रुखवत’ने दाखवली मराठी चित्रपटसृष्टीची ताकद, दोन दिवसांत किती कमाई केली?

Follow Us
Close
Follow Us:

बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांची वर्चस्वशाही कधीपर्यंत चालणार? असा प्रश्न प्रत्येक मराठी चित्रपट निर्मात्याला पडतो. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांची एक स्वतंत्र ओळख आहे, पण बिग बजेट बॉलिवूड चित्रपटांच्या गाजलेल्या वादळात स्थान मिळवणं हे आजकाल अवघड बनलं आहे. मुळातच मराठी चित्रपटांना १५० ते २०० स्क्रीन महाराष्ट्रात दिल्या जातात, ज्यामुळे त्यांना लोकांपर्यंत पोहोचायला वेळ लागतो आणि ते बॉक्स ऑफिसवर धडपडत राहतात. परंतु आता बिग बजेट चित्रपटांच्या वर्चस्वामुळे रुखवत ह्या मराठी चित्रपटाला केवळ ४० स्क्रीन मिळाल्या. अशा परिस्थितीतही, मराठी प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेला प्रतिसाद खरोखरच कौतुकास्पद आहे. मराठी माणसांच्या प्रामाणिक पाठिंब्यामुळे आणि परंपरा व संस्कृतीशी नाते जोडलेल्या कथानकामुळे हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच हाऊसफुल्ल झाला आहे.

“रोमिओ अँड ज्युलिएट” फेम अभिनेत्री ऑलिव्हिया हसीचे निधन, वयाच्या ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘पुष्पा’ आणि ‘बेबी जॉन’ सारख्या बिग बजेट सिनेमांना टक्कर देऊन अल्ट्रा मीडिया & एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती‘रुखवत’ हा चित्रपट थिएटरमध्ये गाजवतोय. ‘रुखवत’ म्हणजे महाराष्ट्रातील जुनी परंपरा, परंतु ही मराठमोळी परंपरा लोकांपर्यंत जास्त पोहचू शकत नाही, यावर अल्ट्रा मीडिया & एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ श्री सुशीलकुमार अग्रवाल यांनी खंत व्यक्त केली आहे. मराठी इंडस्ट्री मध्ये चित्रपटांची सर्वोत्तम आणि दर्जेदार कहाणी असली तरी बिग बजेट सिनेमांमुळे मराठी चित्रपटांना थिएटर्स मध्ये स्क्रीन उपलब्ध होत नाही. यामुळे मराठी मातीतले चित्रपट लोकांपर्यंत पोचले जात नाहीत. रुखवत ह्या चित्रपटासोबत ही हेच झालेले आहे.

प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ हास्यजत्रेचे लेखक सचिन गोस्वामींची पोस्ट, म्हणाले, “निकोप सुदृढ समाजाचा…”

महाराष्ट्रातील परंपरा आणि सांस्कृतिक महत्त्व घेऊन रुखवत हा सिनेमा आलेला आहे. परंतु ह्या चित्रपटाला ही कमी स्क्रीन्स मिळाल्यामुळे हा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचू शकत नाही. आता पर्यंत असे खूप मराठी सिनेमे आले आहेत जे बिग बजेट सिनेमांमुळे खुलून येत नाहीत.

रुखवत ह्या चित्रपटामध्ये खास आकर्षण संतोष जुवेकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यांसोबतचं अशोक समर्थ,अभिजीत चव्हाण आणि राजेंद्र शिसातकर हे ‘रुखवत’ या चित्रपटात खास भूमिकेत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम प्रधान यांनी केले आहे. ज्यांनी आपल्या कथा आणि चित्रणाद्वारे रुखवतमध्ये सांस्कृतिक धारा आणि थ्रिलर कथानक यांचे सुंदर मिश्रण साकारले आहे. रुखवत हा चित्रपट अल्ट्रा मीडिया & एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत, रब्री प्रोडक्शन निर्मित आणि निर्माती ब्रिंदा अग्रवाल द्वारे २७ डिसेंबर पासून सिनेमागृहात प्रदर्शित झालेला आहे.

Web Title: Tadaiv lagnam rukhwat marathi films struggle for screens due to pushpa mufasa movies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2024 | 02:21 PM

Topics:  

  • marathi film
  • santosh juvekar

संबंधित बातम्या

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!
1

‘कुर्ला टू वेंगुर्ला’ चित्रपटातून उलगडणार माती आणि नाती जोडणारी रंजक गोष्ट, चित्रपटाचा टीझर लाँच!

महाराष्ट्र राज्य पूरस्कार मिळाल्यानंतर संतोष जुवेकरची भावुक प्रतिक्रिया, “ज्या साठी केला अट्टहास…”
2

महाराष्ट्र राज्य पूरस्कार मिळाल्यानंतर संतोष जुवेकरची भावुक प्रतिक्रिया, “ज्या साठी केला अट्टहास…”

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!
3

हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे मुंबईत आयोजन, मोठमोठ्या तारकांची लागणार हजेरी!

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित
4

साई बाबांचं दर्शन घेत ‘येरे येरे पैसा ३’च्या टीमने ‘आली रे आली गुलाबाची कळी’ गाणं केलं प्रदर्शित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.