"बाहेर पडणं गरजेचं असतं..." तेजश्री प्रधान असं का म्हणाली ?
टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाहवरील अनेक मालिका पाहायला मिळतात. त्यापैकीच एक मालिका म्हणजे, ‘प्रेमाची गोष्ट’. ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका गेल्या अनेक दिवसांपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल पाहायला मिळत आहे. या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, शुभांगी गोखले, योगेश केळकर सह अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारे मालिकेतील कलाकार सध्या त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री तेजश्री प्रधान मालिका सोडत आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
टीआरपीच्या शर्यतीत कायमच अग्रस्थानी राहिलेल्या ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून तेजश्री प्रधानने बाहेर पडण्याचा निर्णय तेजश्रीने घेतला आहे. त्यामुळे तेजश्रीच्या चाहत्यांसह मालिकेच्या प्रेक्षकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच अभिनेत्रीने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली आहे. तेजश्रीने पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटो शेअर कॅप्शन दिले की, “चिअर्स… केव्हातरी कुठुनतरी बाहेर पडणं गरजेचं असतं. तुमची कुवत जाणून घ्या आणि तुमच्या अस्तित्वाचा आदर करा. कारण हे तुमच्यासाठी कोणीही करणार नाही.”
तेजश्रीने मालिका सोडल्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी मालिका का सोडली? यामागचं कारण विचारलं आहे. तर काहींनी तेजश्रीने घेतलेल्या निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमध्ये तेजश्रीने मुक्ताची भूमिका साकारली आहे. तिने साकारलेल्या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. जान्हवी आणि शुभ्राप्रमाणे तेजश्रीने साकारलेली मुक्ता भूमिकाही महाराष्ट्रातल्या घराघरांत प्रसिद्ध झाली आहे.. पण, आता ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेत तेजश्री दिसणार नाहीये. तिच्या जागी मराठीसह हिंदी मालिकाविश्वात झळकलेली अभिनेत्री स्वरदा ठिगळे पाहायला मिळणार आहे.
OTT Release: ‘द साबरमती रिपोर्ट’ या दिवशी ओटीटीवर धडकणार, जाणून घ्या कुठे पाहता येणार चित्रपट!
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेमध्ये आता जान्हवीची जागा स्वरदा ठिगळे घेणार आहे. मालिकेमध्ये प्रेक्षकांना लवकरच मुक्ताच्या भूमिकेत स्वरदा ठिगळे पाहायला मिळणार आहे. तिने २०१३ साली टेलिकास्ट झालेली ‘माझे मन तुझे झाले’ या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होते. यानंतर स्वरदाने काही हिंदी मालिकेत काम केलं आहे. त्यानंतर अभिनेत्रीने ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’मालिकेत ताराराणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली होती. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला होता.