विधानसभा निवडणूकीनंतरची तेजस्विनी पंडीतची पोस्ट; म्हणाली, “महाराष्ट्र हरलास तू…”
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडलं. २८८ मतदारसंघांत झालेल्या मतदानाचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यांना २८८ पैकी २३७ जागा मिळाल्या आहेत. पण, राज ठाकरेंच्या मनसेला २०२४ च्या निवडणुकीत एकही खातं उघडता आलेलं नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ‘अनपेक्षित! तुर्तास इतकंच’ असं ट्वीट केलं. मनोरंजनक्षेत्रातून राज ठाकरेंना पाठिंबा देणारे अनेक कलाकार होते. त्यातीलच एक म्हणजे, अभिनेत्री आणि निर्माती तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit). निकालानंतरची तिची पोस्ट आता व्हायरल होत आहे.
अमृताने तिच्या खास लोकांसोबत केला वाढदिवस साजरा! पाहा काही खास फोटो
शेअर केलेल्या पोस्टमध्ये तेजस्विनी पंडित म्हणते, “विजयी उमेदवारांचं अभिनंदन! कोण? कसं? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल, त्यांच्या मायक्रो मॅनेजमेंटला १०० पैकी १०० पण तरीही… राजसाहेब ठाकरे एकनिष्ठ सदैवसोबत… आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू ” अशा शब्दात तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या या पोस्टवर राज ठाकरेंच्या अनेक समर्थकांनी प्रतिक्रिया देत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
विजयी उमेदवारांचं अभिनंदन !
कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल,
त्यांच्या micro management ला १००/१००पण तरीही…….
राजसाहेब ठाकरे 🚩🧡#एकनिष्ठ #सदैवसोबत
.
.
आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू 💔— TEJASWWINI (@tejaswwini) November 23, 2024
सोशल मीडियावर कायमच अभिनेत्री तेजस्विनी पंडित सक्रिय असते. ती नेहमीच वेगवेगळे फोटोज् आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अभिनयाबरोबरच तेजस्विनी तिच्या रोखठोक आणि स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपले मत परखडपणे मांडत असते. अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. शिवाय ती एक प्रसिद्ध बिझनेसवुमनही आहे.
तेजस्विनी मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटातून टॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. दरम्यान, सध्या अभिनेत्री ‘येरे येरे पैसा ३’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यग्र आहे.
सखी गोखलेचा लुक पाहून चाहते चक्रावले! नजर टाका काही फोटोंवर