प्रसिद्ध अभिनेत्री आणि मराठी सिनेमा सृष्टीतील क्वीन अमृता खानविलकर हीचा नुकताच लाईक आणि सब्सक्राइब सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर आता काल म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी अभिनेत्रीने तिचा ४० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी तिच्या पत्नीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून तिला शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर तिच्या चाहत्यांनी देखील तिला शुभेच्छा दिला आहेत. आता तिच्या वाढदिवसाचे काही न पाहिलेले फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
अमृता खानविलकरच्या वाढदिवसाचे काही अन्सीन फोटो
अमृता खानविलकर ही मराठी सिनेमा सृष्टीमधील एक गाजलेली अभिनेत्री आहे. तिने तिच्या कलेने त्याचबरोबर तिच्या नृत्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
अभिनेत्रीने तिच्या खास वाढदिवशी तिचा पती हिमांशू मल्होत्रासोबतचा एक फोटो आहे यामध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, तर हिमांशू मल्होत्राने सुद्धा निळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे.
मराठी चित्रपट सृष्टीचा प्रसिद्ध सिनेमा चंद्रमुखीमध्ये अमृता खानविलकर आणि प्रसाद ओक हे दोघे एकत्र दिसले होते. दोघेही मराठी चित्रपट सृष्टीमध्ये गाजलेले कलाकार आहेत.
अमृता खानविलकरने फक्त मराठी इंडस्ट्रीमध्येच नाही तर बॉलीवूड आणि हिंदी टेलिव्हिजनमध्ये सुद्धा काम कमावले आहे. त्याचबरोबर काही रिऍलिटी शोमध्ये सुद्धा ती सहभागी झाली होती.
२३ नोव्हेंबर रोजी तिने तिचा वाढदिवस साजरा केला. तिचा खास दिवस तिने तिच्या आईसोबत त्याचबरोबर अभिनेता प्रसाद ओक यांच्यासोबत साजरा करताना दिसली.