"देवा माझ्या या डार्लिंगला...." अभिनेते अविनाश नारकर यांची परममित्रासाठी खास पोस्ट
मराठमोळे अभिनेते अविनाश नारकर यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. कायमच आपल्या रिल्समुळे चर्चेत राहणारे अभिनेते अविनाश नारकर सध्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आले आहेत. काही तासांपूर्वीच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक रिल शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वीच मराठमोळे अभिनेते अविनाश नारकर यांचा मित्र आणि अभिनेता अमोल बावडेकर यांना एका नाटकाच्या प्रयोगाच्या आधी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यासाठी अविनाश नारकर यांनी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी, मराठी टिव्ही अभिनेते अमोल बावडेकर यांना ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या प्रयोगापूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. या नाटकामध्ये अभिनेते प्रमुख भूमिका साकारत आहेत. अमोल आणि अविनाश हे दोघेही फार चांगले आहेत. अमोल यांची तब्येत व्यवस्थित नसल्यामुळे खास त्यांच्यासाठी अविनाश यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. या व्हिडिओमध्ये अविनाश यांनी खास मित्राच्या तब्येतीसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. हा व्हिडिओ अविनाश यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेला आहे.
यंदाचा योग दिवस अमृतासाठी ठरला खास; निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन साजरा केला खास दिवस
शेअर केलेल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये अमोल यांच्यासाठी अविनाश म्हणतात की, “देवा माझ्या या डार्लिंगला कोणाचीही नजर नको लागून देऊस” शेअर केलेल्या ह्या व्हिडिओमध्ये, अविनाश नारकर आणि अमोल बावडेकर एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. दरम्यान, ‘सुंदर मी होणार’ या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे अभिनेते अमोल बावडेकर यांना १५ जून (रविवारी) रोजी ‘सुंदर मी होणार’ या नाटकाच्या प्रयोगाच्या काही तास आधी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर अमोल यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली. या संदर्भातली माहिती नाटकाचे दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना माहिती दिली होती.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत प्रसिद्ध सिने निर्मात्याचा मृत्यू, DNA टेस्टनंतर पटली ओळख
अविनाश नारकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अमोल बावडेकर १ जुलैपासून नाटकामध्ये काम करण्यासाठी रुजू होणार आहेत, असं सांगितलं आहे. अद्याप अधिकृत रित्या अभिनेते अमोल वाडेकर यांनी चाहत्यांना कुठलीही माहिती दिलेली नाहीत. सध्या ते अमोल विश्रांती घेत आहेत.