आता दिसणार नवी पूर्णा आजी
‘ठरलं तर मग’ मालिका गेली तीन वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. काही दिवसांपूर्वीच पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांचं निधन झाले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. ठरलं तर मगच्या टीमलाही ज्योती ताई आपल्यातून निघून गेल्याचं दु:ख पचवणं आजही अवघड जातंय. पण शो मस्ट गो ऑन….गेले कित्येक दिवस पूर्णा आजी या पात्राला प्रेक्षक मिस करत होते. प्रेक्षकांच्या इच्छेखातर पूर्णा आजी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहेत.
काय म्हणाल्या रोहिणी हट्टंगडी
पूर्णा आजी म्हणजेच रोहिणी ताई म्हणाल्या, ‘ठरलं तर मग’ मालिका माझी आवडती मालिका आहे आणि मी न चुकता पहाते. याच मालिकेत पूर्णा आजीची भूमिका साकारणार आहे. मनात संमिश्र भावना आहेत. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा कुणीतरी साकारलेली भूमिका पुढे नेणार आहे. पूर्णा आजीची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्यासोबत माझी जुनी मैत्री होती.
कधी वाटलं नव्हतं ती अशी अचानक सोडून जाईल आणि तिची भूमिका मी साकारेन. कलाकाराने ती भूमिका एका पातळीवर नेऊन ठेवलेली असते. त्या कलाकाराने केलेलं काम पुढे न्यायचं थोडं जबाबदारीचं काम आहे. माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी तितक्याच दिलदारपणे स्वीकारावं ही इच्छा आहे.’ पूर्णा आजीच्या एण्ट्रीने सेटवरही आनंदाचं वातावरण आहे. सगळ्या टीमने मिळून रोहिणी ताईंचं मनापासून स्वागत केलं आहे. या मालिकेचा आता नवा प्रोमोही आला आहे. यामुळे प्रेक्षकांना आनंद झालाय.
सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी म्हणाली, पूर्णा आजीच्या रुपात रोहिणी ताईंना पाहून खूप भरुन आलं. रोहिणी ताईंसोबत काम करताना खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्यांच्या रुपात विद्यापीठच आमच्या सेटवर आलंय. रोहिणी ताई म्हणजेच पूर्णा आजीसोबत आता मालिकेची गोष्ट पुढे नेताना आनंद होतोय.
‘ठरलं तर मग’ मालिका वेगळ्या वळणावर
सध्या ठरलं तर मग मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. सध्या प्रियाच्या खऱ्या आईवडिलांची एंट्री झाली आहे. याशिवाय दुसरीकडे सायलीसह अर्जुन खूपच रोमँटिक होत आहे. त्यामुळे मालिका सध्या प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. विशेषतः अर्जुन आणि सायलीची एकमेकांशी असणारी जवळीक हादेखील वाढत्या टीआरपीचा एक चांगला भाग असल्याचं दिसून येत आहे.
सायलीच खरी तन्वी! सत्य समोर येणार तेवढ्यात… ; ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्विस्ट; ‘असं’ येणार नवं वळण