स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. आजच्या भागात मालिकेतील सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सध्या स्टार प्रवाहवर तीन मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे. लक्ष्मीच्या पावलांनी, थोडं तुझं थोडं माझं आणि ठरलं तर मग मालिकेचे कलाकार एकत्र येत सत्य समोर आणणार आहे.
मालिकेत आता सगळ्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कालच्या भागाबद्दल सांगायचं झालं तर , मधुभाऊंना प्रतिमा आणि छोट्या तन्वीचा फोटो सापडतो. त्यावेळी मधुभाऊंच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांना कळतं की, सायली हीच खरी तन्वी किल्लेदार आहे. मात्र हे सत्य मधुभाऊंना कळलं आहे हे नागराजला कळून चुकतं त्यामुळे आता आपलं पितळ उघडं पडलं आहे अशी भिती नागराजला जाणवायला लागते आणि हे तन्वीचं सत्य कोणालाही कळू नये म्हणून नागराज मधुभाऊंवर चाकूने वार करतो. त्यावेळी तेवढ्यात तिथे अद्वैत येतो आणि मधुभाऊंना सावरायचा प्रयत्न करतो. त्यावेळी मधुभाऊ अद्वैतला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. त्यावेळी अद्वैत बाहेर सुरु असलेल्या दहीहंडीच्या कार्यक्रमात येतो आणि अर्जुनला सांगतो की, सायलीचे आई बाबा जीवंत आहेत.
आता सायली म्हणजे खरी तन्वी किल्लेदार हे सत्य समोर येणार तेच या मालितेत मधुभाऊंवर हल्ला झाल्याचं दाखवलं गेलं आहे. या हल्ल्यामागे नक्कीच महिपत शिखरे आहे आणि त्यानेच मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला याची सायली आणि अर्जुनला खात्री असते. मधुभाऊंवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सायली आणि अर्जुन महिपत शिखरेला जाव विचारायला त्याच्या घरी जातात. त्यावेळी सायली महिपतला चॅलेंज करते की, मधुभाऊंवर झालेल्या हल्ल्याची शिक्षा तुला मिळणारच. सायली महिपतला म्हणते की, “माझे मधुभाऊ तुझ्यामुळे कोमात गेले आहेत. नव्याने आयुष्य सुरू करणार होते ते पण, तू सगळं त्यांच्यापासून हिरावून घेतलं. अजून किती जणांचा तळतळाट घेशील. तुझी मुलगी जेलमध्ये शिक्षा भोगतेय हे पुरेसं नाहीये का?” सायलीचं बोलणं महिपतला सहन होत नाही. तो सायलीवर हात उचलणार इतक्यात अर्जुन महिपतचा थेट गळा दाबतो.
मालिकेतील या ट्वीस्टमुळे आता खऱ्या तन्वीचं सत्य समोर येणार की मधुभाऊ या जगाचा निरोप घेणार हे आता मालिकेच्या नव्या भागातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे.