पुणेकर दुपारी १ ते ४ का झोपतात ? अभिनेत्री नेहा शितोळेने सांगितलं कारण…
पुणेकर म्हटलं की, आपल्यासमोर नजरेसमोर येते त्यांची झोप. असं म्हणतात की, पुणेकर रोज दुपारी १ ते ४ झोपतात. पण रोज ते इतक्या वेळ का झोपतात ? असा प्रश्न आपल्या सर्वांनाच अनेकदा पडतो. या प्रश्नावर आता अभिनेत्री नेहा शितोळेने उत्तर दिले आहे. ‘अशोक मा.मा.’ मालिकेमुळे चर्चेत राहिलेल्या नेहा शितोळेने अलीकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने सांगितलं की, तिला राग आला किंवा रडू आलं तरी ती झोपत असल्याचा खुलासा केला आहे. शिवाय तिने मुलाखतीत पुणेकर दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत का झोपतात ? याचा खुलासा केला आहे.
‘सनम तेरी कसम’ फेम अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून उठवली बंदी? भारतीय वापरकर्ते झाले चकीत
अलीकडेच, ‘सुमन म्युझिक मराठी’ला अभिनेत्री नेहा शितोळेने मुलाखत दिली होती. त्यात तिने सांगितलं की, “मी थेरपिस्टकडे गेले. त्यांची मदत घेतली. शिरीषा साठे म्हणून डॉक्टर आहेत त्या. त्यांनी खरंतर माझ्या भाषेत मला समजावून सांगितलं. त्या बोलतानाही समजा किंवा कधीतरी असं बोलताना मला रडू आलं किंवा काय झालं तर त्या म्हणतात मी आता तुला जवळ घेऊन अजिबात तुला बाबापुता करणार नाही. कारण मला घेणं देणंच नाहीये. आता तू रडतीयेस ह्याच्याशी. मला ह्याच्यानंतर तू रडू नयेस याची काळजी आहे. तर त्यावेळी सुद्धा आपल्याला कडक शब्दातही कोणीतरी काहीतरी सांगणं गरजेचं असतं.”
वीर पहारिया आणि तारा सुतारियाच्या डेटिंग अफवांना उधाण, इंस्टास्टोरीने वेधले लक्ष
“कारण नाहीतर काय होतं जवळ घेऊन ते सबसाइड होतं त्या पॉइंट पुरतं आणि ते राहून जातं तसंच ती गाठ. तू एक्सप्रेस केलंस. ती उकळणं गरजेचं असतं. आणि दुसरी गोष्ट मी झोपते. आय स्लिप ओव्हर थिंग्स. जेव्हा मला भयंकर राग आलेला असतो किंवा खूप कसला तरी त्रास होत असतो आणि रडू येत असतं. खूप काहीतरी असं आतमध्ये आठवून आलेलं असतं तेव्हा दोन गोष्टी असतात की एकतर झोपल्यानंतर तुमची बॉडी शांत होते. श्वास शांत होतो आणि उठल्यानंतर बऱ्याचदा काय होतं ते आठवत पण नाही. पुणेकरांना झोप अत्यंत प्रिय आहे. आणि ती का आहे हे आता मला कळायला लागलंय. कारण मग पुणेकर चारनंतर नव्या जोमाने कामाला लागतात.”