Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘रंजना’ मधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!

चतुरस्र अभिनेत्री रंजना देशमुख  यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

  • By Payal Hargode
Updated On: Jul 23, 2022 | 12:09 PM
‘रंजना’ मधून उलगडणार अभिनेत्री रंजना देशमुख यांचा जीवनप्रवास!
Follow Us
Close
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीतील बऱ्याच अभिनेत्रींनी आपल्या संवेदनशील अभिनयानं रसिकांच्या मनावर आपला वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. आपल्या चौफेर अदाकारीनं ब्लॅक अँड व्हाईटचा जमानाही रंगीन बनवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये रंजना देशमुख यांचं नाव आघाडीवर आहे. देखणा चेहरा, अभिनयातील विविधता, सुरेख संवादशैली आणि मनमोहक नृत्याच्या बळावर रंजना यांनी एक काळ गाजवत प्रेक्षकांवर जणू आपल्या सौंदर्याची मोहिनीच केली होती. त्या काळातील आघाडीच्या दिग्दर्शकांच्या चित्रपटात काम करताना अभिनेत्यांसोबत जोड्या जुळवत त्यांनी बरेच सिनेमे गाजवले. अशा चतुरस्र अभिनेत्री असणाऱ्या रंजना यांचा जीवनप्रवास चित्रपट रूपात मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.

रंजना यांच्या जीवनावर आधारलेल्या ‘रंजना – अनफोल्ड’ या मराठी चित्रपटाची नुकतीच घोषणा त्यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून करण्यात आली आहे. डॅा. श्रीकांत भासी, चेअरमन – कार्निव्हल ग्रुप हे या चित्रपटाची प्रस्तुती करणार असून कार्निव्हल मोशन पिक्चर्स आणि वैशाली सरवणकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. ‘रंजना – अनफोल्ड’ या चित्रपटाद्वारे रंजना देशमुख यांचा प्रवास उलगडण्याचं शिवधनुष्य उचललं आहे.राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग हे या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात करून पुढल्या वर्षी ३ मार्च २०२३ रोजी ‘रंजना – अनफोल्ड’ रसिकांसमोर सादर करण्याची योजना आखण्यात आली आहे.

मुंबईतच जन्मलेल्या रंजना यांनी १९६० ते २००० पर्यंत विविध व्यक्तिरेखा साकारत मराठी रसिकांचं मनोरंजन केलं. वयाच्या पाचव्या वर्षीच ‘हरिश्चंद्र तारामती’ या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून काम करत त्या सिनेसृष्टीत दाखल झाल्या. तरुणपणी ‘असला नवरा नको गं बाई’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्यांनी कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर ‘मुंबईचा फौजदार’, ‘सुशीला’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘गुपचुप गुपचुप’, ‘बहुरूपी’, ‘बिन कामाचा नवरा’, ‘खिचडी’ अशा वेगवेगळ्या विषयांवर आधारलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारत त्यांनी आपल्या कलागुणांचं दर्शन घडवलं. आता पुन्हा एकदा त्या बायोपीकच्या रूपात मराठी रसिकांसमोर येणार आहेत

कार्निवल मोशन पिक्चर्स हे डॉ. श्रीकांत भासी यांचे एक अग्रगण्य प्रॉडक्शन स्टुडिओपैकी एक असून आजपर्यंत अनेक उल्लेखनीय बॉलीवूड आणि प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे, ज्यामध्ये ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ – क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरवर आधारित हिंदी, मराठी, इंग्रजी या भाषांमधील चित्रपट, शिवसेना प्रमख बाळ ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ हा हिंदी आणि मराठी चित्रपट केले असून ‘मेरे देश की धरती’, ‘ब्लँक’ आणि ‘वार छोड ना यार’ या बॉलीवूड चित्रपटांचादेखील त्यात समावेश आहे. ‘सेकंड शो” या मल्याळम चित्रपटातुन कार्निवल मोशन पिक्चर्सने मल्याळम सुपरस्टार दुलकर सलमानला लाँच केले. ‘व्हायोलिन’, ‘मॅटिनी’, ‘हँगओव्हर’, ‘आदि कप्यारे कूटमणी’, ‘मुधुगव’, एडक्कड बटालियन 06′ या प्रादेशिक चित्रपटांची निर्मिती केली असून आता मराठीतील पहिल्यावहिल्या “रंजना…अनफोल्ड” हा चित्रपट घेऊन येण्यास सज्ज होत आहेत.

Web Title: The life journey of actress ranjana deshmukh will unfold from ranjana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2022 | 12:09 PM

Topics:  

  • entertainment

संबंधित बातम्या

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन
1

‘चांद देख लेना’चा BTS व्हिडिओ रिलीज; सलमान खान आणि चित्रांगदाच्या केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
2

अंगावर रोमांच उभे करणारी झलक! ‘राजा शिवाजी’चा फर्स्ट लूक पाहताच सोशल मीडियावर जल्लोष; चाहत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख
3

‘मिमा २०२६’चा दिमाखदार सोहळा; ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांना जीवनगौरव, इंडी संगीताला मिळाली नवी ओळख

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद
4

जॅकी श्रॉफ यांची माथेरानला खास भेट; श्री पिसारनाथ मंदिर येथे दर्शन, बटाटा वड्याचा देखील घेतला आस्वाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.