बॉलीवूडचे दिग्गज कलाकार अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan), अनुपम खेर (Anupam Kher) आणि बोमन इराणी (Boman Irani) यांचा आगामी चित्रपट उंचाई (Uunchai) बद्दल सुरुवातीपासूनच उत्सकुता लागलेली आहे. ऑगस्ट महिण्यात, फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने, उंचाईच्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टरचे अनावरण केलं होतं. ज्यामध्ये तीन मित्र पर्वतावर चढताना दिसत आहेत. आता, या चित्रपटाच्या दुसरं पोस्टर समोर आलं असून त्यामधील तीन्ही कलाकारांचे लूक पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
[read_also content=”आयुष्मान खुरानाचा डॉक्टर जी ‘या’ तारखेला होणार रिलीज, पहिलं पोस्टर आऊट https://www.navarashtra.com/movies/ayushmann-khurrana-and-rakul-preet-singh-starrer-doctorg-to-release-on-14-october-nrps-327586.html”]
अमिताभ बच्चन त्यांच्या त्यांच्या इन्स्टांग्रामवरून उंचाईचं नवीन पोस्टर शेअर केलयं. यामध्ये अमिताभ बच्चन मध्यभागी बसलेले, बोमन इराणी त्यांच्या उजव्या बाजूला आणि अनुपम खेर त्यांच्या डाव्या बाजूला बसलेले दिसत आहेत. मागे बर्फाच्छादित पर्वत दिसत असून हा चित्रपट तिघांच्या एव्हरेस्टच्या मोहिमेबद्दल दाखवण्यात आलंय असं दिसतयं. तर, अनुपम खेर त्यांच्या टिफिनमधून काहीतरी खाताना दिसत आहे, तर बोमन इराणी पाणी पिताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी पोस्टर शेअर करत लिहिले, “आमच्या #Uunchai चित्रपटाचे दुसरे पोस्टर तुमच्यासाठी आणताना अभिमान वाटतोय. मला आणि माझ्या मित्रांना @anupampkher आणि @boman_irani बघायला या! तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत मैत्री, साहस आणि जीवन साजरे करा! #SoorajBarjatya आणि @rajshrifilms यांचा @mahaveer_jain_films आणि @boundlessmedia.in, @uunchaithemovie यांच्या संयुक्त विद्यमाने 11.11.22 रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. तारीख लक्षात ठेवा!” या पोस्टवर अभिषेक बच्चनने कमेंट करत हार्ट इमोजी दिलाय तर, तर असंख्य चाहत्यांनी चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त केली.
[read_also content=”‘रॉकेट गँग’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला https://www.navarashtra.com/photos/rocket-gang-first-song-duniya-hai-maa-ki-godi-mein-is-released-nrsr-327580.html”]
उंचाई या चित्रपटात अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी, परिणीती चोप्रा, नीना गुप्ता आणि सारिका यांच्या प्रमुख भूमिका आहेत. राजश्री प्रॉडक्शन अंतर्गत सूरज बडजात्या यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हम आपके है कौन, प्रेम रतन धन पायो, हम साथ साथ है इत्यादी चित्रपट दिग्दर्शित करण्यासाठी ओळखले जाणारे चित्रपट निर्माते या चित्रपटाद्वारे सात वर्षानंतर दिग्दर्शकाच्या खुर्चीवर परतले आहेत.