Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘द साबरमती रिपोर्ट’ची पहिल्या दिवसाची कमाई किती ? चित्रपट फ्लॉप की हिट ?

धीरज सरना दिग्दर्शित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात किती रुपयांची कमाई केली आहे, जाणून घेऊया...

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 16, 2024 | 01:49 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

धीरज सरना दिग्दर्शित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट १५ नोव्हेंबरला बॉक्स ऑफिसवर रिलीज झालेला आहे. विक्रांत मेस्सी, राशी खन्ना आणि रिद्धी डोग्रा स्टारर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल जोरदार क्रेझ आहे. २००२ मध्ये गुजरातच्या गोध्रातील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला नाही. चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात किती रुपयांची कमाई केली आहे, जाणून घेऊया…

हे देखील वाचा – ‘डॉन ३’ मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार खलनायकाची भूमिका, रणवीर सिंगच्या चित्रपटात करणार धमाकेदार एंट्री!

गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर हा चित्रपट शुक्रवारी (१५ नोव्हेंबर रोजी) थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. सॅकल्निक ट्रेड ॲनालिस्टने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी १. २५ कोटींची कमाई केलेली आहे. ५० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाची ओपनिंग खूपच संथ आहे. त्यामुळे हा चित्रपट पहिल्या विकेंडला किती कमाई करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हे देखील वाचा- निर्माता आशुतोष गोवारीकर यांची इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड!

चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरनाने केले आहे. चांगली कथा असूनही या चित्रपटाला प्री बुकिंगचा कोणताही फायदा झाला नाही. निर्मात्यांच्या मते, चित्रपटाला कदाचित विकेंडचा फायदा नक्कीच होण्याची अपेक्षा आहे. २००२ मध्ये गुजरातच्या गोध्रातील साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटाचे कथानक आहे. विक्रांत मेस्सीने चित्रपटामध्ये एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. गुजरातमधील गोधरामध्ये, २७ फेब्रुवारी २००२ मध्ये घडलेल्या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेमुळे संपूर्ण देशात राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटले होते. गोधरा रेल्वे स्टेशनवरून निघालेली साबरमती एक्सप्रेस चेन ओढून थांबवण्यात आली होती. त्यानंतर या ट्रेनच्या एका डब्ब्याला आग लावण्यात आली होती. या आगीमध्ये, ५९ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Web Title: The sabarmati report box office collection day 1 vikrant massey raashii khanna movie earns this much on opening day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 16, 2024 | 01:49 PM

Topics:  

  • entertainment
  • The Sabarmati Report
  • Vikrant Massey

संबंधित बातम्या

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत
1

Independence Day 2026: स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात ‘फौजी’चा देशभक्तीचा हुंकार, विशेष चर्चेत

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक
2

Dwidha: ‘द्विधा’ चित्रपटाच्या ट्रेलरचे दिमाखदार अनावरण, बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक द्वंद्वाची हृदयस्पर्शी झलक

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव
3

Rani Mukerji: इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्नमध्ये राणी मुखर्जीचा सन्मान; अभिनयातील उत्कृष्टतेसाठी विशेष गौरव

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!
4

Scam 2010 : बिर्ला स्टुडिओज आणि अपलॉज एंटरटेनमेंट प्रस्तुत स्कॅम 2010, हंसल मेहतांच्या दिग्दर्शनाखाली घोषणा, लवकरच सोनी लिव्हवर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.