Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 15 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिनेरसिकांसाठी मेजवानी! ९ जानेवारीपासून ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ; ५६ चित्रपटांचा खजाना उलगडणार

९ जानेवारीपासून मुंबई आणि ठाण्यात २२वा 'थर्ड आय' आशियाई चित्रपट महोत्सव सुरू होत आहे. ५६ चित्रपट, सई परांजपे यांचा सन्मान आणि डॉ. व्ही. शांताराम यांच्या अजरामर चित्रपटांची पर्वणी रसिकांना मिळणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 23, 2025 | 06:16 PM
सिनेरसिकांसाठी मेजवानी! ९ जानेवारीपासून 'थर्ड आय' आशियाई चित्रपट महोत्सवाचा पारंभ (Photo Credit - X)

सिनेरसिकांसाठी मेजवानी! ९ जानेवारीपासून 'थर्ड आय' आशियाई चित्रपट महोत्सवाचा पारंभ (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • सिनेरसिकांसाठी आनंदाची बातमी!
  • ९ जानेवारीपासून ‘थर्ड आय’ आशियाई चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ
  • सात दिवस रंगणार प्रदर्शन
Third Eye Asian Film Festival 2026: महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा ‘२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ दिनांक ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत मुंबई (Mumbai) आणि ठाणे (Thane) येथे आयोजित करण्यात येणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपटांचा समावेश असून, यंदा एकूण ५६ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. महोत्सवात निवडलेले हे चित्रपट प्रभादेवीतील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतील मिनी थिएटर आणि ठाण्यातील लेक शोर मॉलमधील सिनेपोलीस चित्रपटगृहात दाखवले जाणार आहेत. बूसान चित्रपट महोत्सवात ज्युरी पुरस्कार पटकावलेल्या ‘ऑन यूअर लॅप’ (पांगकू) या इंडोनेशियन चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
‘२२वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव’ दिनांक ९ जानेवारी ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. याविषयी किरण व्ही. शांताराम यांनी स्वतः माहिती दिली. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवात आशियाई तसेच भारतीय चित्रपटांचा समावेश असून, यंदा एकूण ५६… pic.twitter.com/5OkMzNs1KM — महा MTB (@TheMahaMTB) December 23, 2025


डॉ. व्ही. शांताराम यांचे अजरामर चित्रपटही दाखविणार

‘२२व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो आहे. गेली बावीस वर्षे या महोत्सवाने आशियाई आणि भारतीय चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कलाकृती महाराष्ट्रातील रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. यंदा माझे वडील डॉ. व्ही. शांताराम यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या अजरामर कलाकृतींचे चित्रपट दाखवणे हा आमच्यासाठी विशेष आनंदाचा क्षण आहे’, असे आशियाई चित्रपट फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण व्ही. शांताराम म्हणाले, जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजत असलेले चित्रपट मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर शहरातील प्रेक्षकांना पाहता यावेत या उद्देशाने आशियाई फिल्म फाऊंडेशन संस्थेतर्फे थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन सन २००२ पासून करण्यास सुरुवात झाली. गेली बावीस वर्ष हा चित्रपट महोत्सव मुंबई आणि ठाण्यामध्ये आयोजित करण्यात येत आहे.

हे देखील वाचा: सुपरस्टार प्रभास घेऊन आला क्रांतिकारी शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल! जगभरातील क्रिएटर्ससाठी सुवर्णसंधी

चित्रपटप्रेमींसाठी एक उत्सव

यावर्षी ५६ निवडक चित्रपटांच्या माध्यमातून आम्ही एक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध सिनेमॅटिक अनुभव प्रेक्षकांना देणार आहोत. किर्गिस्तान देशातील चित्रपटांचा विशेष विभाग, मराठी आणि भारतीय चित्रपटांची स्पर्धा आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचे प्रदर्शन यामुळे हा महोत्सव चित्रपटप्रेमीसाठी एक उत्सव ठरणार आहेर अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. संतोष पाठारे यांनी दिली. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग हे महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे.

सई परांजपे यांना विशेष पुरस्कार

केले महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात येणार आहे. दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित जाणार आहे. दिवंगत सुधीर नांदगांवकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विशेष पुरस्कार वित्रपट अभ्यासक निाक्षी शेड्डे यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेले दो आँखें बारा हाथ, डॉ. कोटनीस की अमर कहानी, कुंकू, नवरंग हे चित्रपट दाखवण्यात करण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा: Top 5 Hindi Films 2025: बॉक्सऑफिसवर सर्वाधिक कमाई करत 5 चित्रपटांनी गाजवले वर्चस्व, प्रेक्षकांनीही दिला कौल

Web Title: The third eye asian film festival will begin on january 9th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • cinema lovers day
  • cinema news
  • Mumbai
  • thane

संबंधित बातम्या

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात १.५० रुपयांची वाढ; आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार
1

CNG Price Hike: सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईचा आणखी एक झटका! CNG दरात १.५० रुपयांची वाढ; आता किलोमागे ९१.५० रुपये मोजावे लागणार

Thane Chhath Puja 2026: छठ पूजेनिमित्त ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; महापालिका आणि पोलीस प्रशासनही सज्ज
2

Thane Chhath Puja 2026: छठ पूजेनिमित्त ठाण्यात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; महापालिका आणि पोलीस प्रशासनही सज्ज

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?
3

Devendra Fadnavis: मुंबई विमानतळावरील उड्डाणे नवी मुंबईत हलणार नाहीत! फडणवीसांचा टर्मिनल-१ साठी नवा प्लॅन, प्रस्तावाचा उद्देश काय?

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व
4

Hingla Devi: मुंबईतील वेसावे कोळीवाड्याची ग्रामदेवता आई हिंगळा देवी! जाणून घ्या मंदिराचा इतिहास आणि धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.