
फोटो सौजन्य - Social Media
काय केली आहे पोस्ट? आणि काय आहे कॅप्शन?
अगदी काही तासांपूर्वीच अभिनेत्रीने ती आई झाल्याची बातमी सोशल मीडिया हॅन्डलवर शेअर केली आहे. अभिनेत्री Sambhavna Seth ने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. या संबंधित कॅप्शन देताना अभिनेत्री म्हणते की, “या वर्षी महादिवाळी फार लवकरच आली आहे. गणपती बाप्पा आणि आई लक्ष्मी अगदी दोघे घरी आले आहेत. आज आमचे हृदय आनंदाने माखले आहे. हर हर महादेव!”
अभिनेत्रीने तिच्या बाळांना गणेश आणि लक्ष्मीची उपमा दिली आहे. जे वाचून तिच्या चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे आणि अभिनंदन केले आहे. यासह तिने हॉस्पिटलात तिचे काही भावनिक क्षण शेअर केले आहेत. अभिनेत्रीचे आनंदाश्रू पूर्णपणे त्या क्षणांमध्ये झळकत आहेत.
या पोस्टखाली Actor and Producer Pakkhi Hegade ने कमेंट केले आहे. ती म्हणते ” मी जुळ्यांची मावशी झाली. मी फार खुश आहे संभावना”. तसेच TV क्षेत्रातील अनेक कलाकारांनी तसेच संभावनाच्या चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या असून बाळांना आशीर्वाद दिले आहे.
संभावना सेठचा अभिनय प्रवास!
मनोरंजन विश्वात तिने सर्वप्रथम Bigg Boss 2 मधील सहभागामुळे विशेष ओळख निर्माण केली. त्यानंतर Bigg Boss Halla Bol मधूनही ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. Fear Factor: Khatron Ke Khiladi 4 मध्ये तिने आपल्या धाडसी स्वभावाची झलक दाखवली, तर Dancing Queen या लोकप्रिय रिअॅलिटी शोचे विजेतेपद पटकावत तिने आपल्या नृत्यकौशल्याची छाप उमटवली. उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून ओळख असलेल्या या अभिनेत्रीने अभिनय क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले आहे. Razia Sultan आणि Gudiya Hamari Sabhi Pe Bhari यांसारख्या हिंदी मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. याशिवाय, २००६ साली प्रदर्शित झालेल्या 36 China Town या हिंदी चित्रपटातही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.